थोडंस संदर्भासहित बोलूया. आपल्या इतिहासकारांनी जे लिहून ठेवलंय जो शोध घेतलाय त्याबद्दल नितांत आदर आहेच. मी कुठेही त्यांचा अनादर करत नाहीय पण ह्या पोस्टमुळे कदाचित अस वाटू शकतं म्हणून लिहितोय कारण ते सगळेच मला कायम वंदनीय आहेत आणि राहतील.
१+
एक भयंकर रात्र आणि त्यात फक्त चिखलात रुतत जाणारे पाय आणि जिवाच्या आकांतने ते ओढट्झ काटे तुडवत विशाळगडाच्या दिशेने धावणारे ते स्वराज्य वेडे. खुद्द राजे सिद्दीच्या वेढ्यातून निसटले. कसे? आषाढातल्या पावसाने आपली जादू दाखवली त्यात राजांचा धूर्तपणा कामी आला
२+
राजे पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावर जाऊन पोहोचले सोबत कोण कोण होते तर नागव्या तलवारी परजून उभे असलेले बांदल- बाजी, फुलाजी. का? कारण त्यांनाच ती वाट माहिती होती. नजरबाज जागोजागी पेरले होते. सोबत कडाडणारी वीज पुढचा रस्ता दाखवीत होती.
३+
राजे विशाळगडावर पोहोचले आणि तोपर्यंत तिथे जौहरच्या छावणीत खबर पोहोचली की 'राजे पळाले'. लगोलग सिद्दी मसूद सैन्य घेऊन आला. तेव्हा बाजी फुलाजी विशाळगड उतरून त्यांनी मसूदला रोखलं ज्यात सर्व बांदल आणि बाजी फुलाजी ह्याना वीरमरण आलं. पण राजांना सुखरूप ठेवलं.
४+
मुद्दा असा आहे की लढाई ही पावनखिंडीत झालीच नाही आणि दुसरा असा की राजे बांदलांसोबत विशाळगडावर पोहोचले आणि मग बांदलांनी पुन्हा खाली उतरून मसूदला रोखलं.
ह्याला पहिला आणि सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे शिवभारत अध्याय २६ - श्लोक ७८, आणि २७ - श्लोक २२, २५, ३०, ३१, ३२.
५+
आता दुसरा पुरावा- शिवचरित्र प्रदीप पृष्ठ - २१
६+
आता तिसरा पुरावा - हे डच कंपनीच्या पत्र व्यवहारातल ५ सप्टेंबर १६६० सालच पत्र आहे.
खेळणा किल्ला - विशाळगड
संदर्भ - शि. प. सा. संग्रह खंड १ पृष्ठ १९४
ह्यात दुमत असू शकत. समकालीन अजून काही पुरावे कोणाला मिळाले तर नक्कीच चर्चा करू शकतो.
आज आपण आताच्या घडीला जगाची डोकेदुखी असलेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेची माहिती करून घेणार आहोत. #आयसिस
२०१५ सालच्या द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकलेख आला होता ज्यात अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशनचे मध्य-पूर्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी मिशेल नागता ह्यांनी मान्यकेलं की "आम्ही त्यांचा विचार मारू शकलो नाही हेचकाय आम्हाला त्यांचा विचारच अजून कळलानाही" ISIS - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
स्थापना - १९९९ साली जमात अल ताहीद वल जिहाद ह्यानावाने झाली.
ऑक्टोबर २००४ साली ह्यांनी अल - कायदा ह्या संघटनेशी हातमिळवणी केली.
#तिसरे_महायुद्ध
आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना अभ्यासू लोकांना आली असेल आणि जे बेफिकीर वागतायत त्यांना All The Best! कारण
"जोवर राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत" - डॉ अनिरुद्ध जोशी.
१/७
'शांतीचा बुरखा पांघरून तिसऱ्या महायुद्धाची डाकिण दार ठोठावते आहे' हे वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग काही दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झालं. @lotuspubl ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक #तिसरे_महायुद्ध. मराठी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
२/७
ह्याच डॉ अनिरुद्ध जोशी ह्यांनी दै प्रत्यक्ष @NewscastGlobal ह्यात तिसरे महायुद्ध ह्या विषयावर दीर्घ लेखमाला लिहिली जी आता पुस्तक रुपात उपलब्ध आहे. २००६ पासून तिसरे महायुद्ध अतिशयोक्ती वाटणाऱ्यांना आता ह्यापुस्तकाच महत्त्व पटू लागलय. जगात स्थित्यंतरे घडवणारी २ महायुद्ध आणि