शिक्षण नव्हतं, पण पोटापुरती शेती होती, तसेच गावातले इतर अनेक जे मुंबईपुण्याला असायचे त्यांची जमीन हे करायचे त्यामुळे त्यांच बऱ्यापैकी भागायचे.
कधी लिखापढीची किंवा सरकारी कामं असतील तर माझे बाबा करून द्यायचे त्यामुळे त्यांच तसं कधी अडायचं नाही.वडिलांचे ते चुलत भाऊ पण चांगलं
२/२१
सख्य होतं.
पुर्वी तसे सगळेच बऱ्यापैकी गुण्यागोविंदाने राहत… थोड्याफार कूरूबरी असल्या तरी नात्यांची विण फार घट्ट असायची.
आत्ताच्यासारखे भले ते वाढदिवसाला, दिवाळीला व्हॅाट्सॲपवर शुभेच्छा देत नसतील, रोज गुड मॅार्निंगची फुलं पाठवत नसतील पण मायेचा ओलावा फारच खोल होता.
समाज
३/२१
माध्यमांचा कचकड्याचा मुखवटा नव्हता, त्यामुळे माणसं खूप खरी होती.
माझी थोरली आई म्हणजे आण्णांची पत्नी. त्या माऊलीच माझ्यावर विशेष प्रेम. मी घरात सर्वात लहान, त्यात फार किडकीडीत, त्यामुळे तिच लक्ष नेहमी मला काहीतरी दुधदुभत खायला घालण्यावर. आण्णा पण तसेच.
मलाही दोघांबद्दल
४/२१
प्रचंड प्रेम होतं आणि आहे.
आण्णा तरी थोडफार गाव सोडून आजूबाजूलाच्या गावात, तालूक्याला किंवा दोनचार वर्षातून मुंबईपुण्याला फिरायचे पण आमची थोरली आई मात्र भावकीतलं कोणाच लग्न असेल तर त्या वेळीच काय ते ट्रक, टेंपोत बसून गाव सोडायची नाहीतर आयुष्यभर ती गाय, बैलं, म्हशी आणि तीची
५/२१
शेतीची काम यात राब राब राबायची.
बर तिला याचं फार काही वैशम्य नव्हतं. तिची ती प्रायोरिटही नव्हती…शेतात कामाला आमची थोरली आई म्हणजे लय जबरा, कडक पण बाहेर गेली की बुजायची, लाजायची, घाबरायची.
पुर्वी दळणवळणाची अपुरी साधने, शिक्षण प्रकारच नव्हता. दोघेही मनानं अत्यंत चांगले पण
६/२१
बाहेर प्रवासाला कधीच पडायचे नाहीत. एक अनामिक भीती आयुष्यभर त्यांच्यात होती. कोणी फसवलं, लुटलं,आपणच चुकलो किंवा अजून बरच काही काही.
माझे वडील तसे शिकलेले, फिरायला त्यांना आवडायचं त्यामुळे त्यांच्यासोबत मलाही लहाणपणी फिरायला मिळायचं. पुढे शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा, शिक्षण आणि
७/२१
कॅालेजमुळे आपसूकच गाव सोडावं लागलं.
गावाला गेलं की घरच्यांना कौतूक वाटायचं तेवढंच थोरल्या आईला पण वाटायचं….ते दोघेही आयुष्यभर गावातच राहिले, परिस्थितीने म्हणा, शिक्षणाच्या कमतरतेने म्हणा, संसाराच्या रहाटगाडग्यात कधी बाहेरच पडता आले नाही. बरं त्यामुळे फार काही त्यांना फरक
८/२१
पडला नाही. २१ व्या शतकाचा कोणताही मागमूस त्यांना नव्हता. त्याची ओढही नव्हती आणि माहितीही नव्हती.
काळ बदलला, वेळ बदलली. प्रवासाचा वेग वाढला. विज्ञानाने चमत्कार केले. अगदी चौथी औद्योगिक क्रांती चाललीये. सगळं जग एकत्र आलय. तरी आमच्या थोरल्या आई आणि आण्णांसारखी करोडो माणसं
९/२१
आजही आपल्या आजूबाजूला असतात. ग्रामिण भागातच नाहीत तर अगदी शहरी भागातही.
कित्येक शिकले सवरले माझे मित्र आहेत ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरही पाऊल टाकले नाही.
अनेक जण हजारो लाखो रूपये कमावतात पण आयुष्याच्या रहाटगाडग्यात असे अडकतात की प्रवासाला उसंतच मिळत नाही.
१०/२१
पुर्वी शिक्षण नव्हते, पैसे नव्हते, दळणवळणाची एवढी साधने नव्हती त्यामुळे बरी कारणं तरी होती आता सगळ असूनही -बिझी, बिझी, बिझी!
वन रूम मधून, वन बीएचके, पुढे टू, थ्री, गाडी, सेकंड होम, मोठी गाडी, नवा फोन, इलेक्ट्रॉनिक्स, गॅझेट, खर्चात वाढ, पुन्हा तणाव, EMI वाढतील तसे पुन्हा
११/२१
वाढीव पगाराची नवी नोकरी, पुन्हा नव्याने करीयर सेट करायला धावाधाव…. शांतपणे थांबाच नाही. कोरोनाने तर अजून मोठं कारण दिलय…. यात फिरणं कमी झालं प्रवास कमी झाला तर आयुष्यात प्रगतीच थांबली असं मला वैयक्तिक वाटतं.
प्रवासाने मला खूप काही शिकवलं! खूप फिरलो, गेली वीस-बावीस वर्ष
१२/२१
Life On Wings हे स्टेटसं माझ्या मोबाईलवर, लॅपटॅापवर सतत आहे.
लहानपणी वडिलांनी इंग्रजी शिकवताना एक वाक्य सांगितलेलं - Life is not for resting, but for moving…. हे हृदयात घर करून बसलेय.
आपले जीवन नक्की कसे जगतोय याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ म्हणजे महाराष्ट्रात, भारतात
१३/२१
आणि जगात फिरतानाचा प्रवास, अनुभव…..हे करताना नैतिकमुल्ये, यशअपयशाचा विचार होतो.
नव्या ठिकाणी, नवी लोकं भेटतात, पुढच्या आयुष्यात नक्की काय वेगळे करायचे, स्वतःसाठी, कुटूंबासाठी, कंपनीसाठी, सहकाऱ्यांसाठी, मित्रपरिवारासाठी काय वेगळे करू शकत याचा विचार मिळतो.
परदेशातून परत
१४/२१
आलो की समाजासाठी, देशासाठी काहीतरी करण्याची, पुन्हा परत देण्याची प्रेरणा मिळते.
सिंहावलकन होते, आत्मपरीक्षण होते. नवी उर्जा मिळते. आणि नव्या दमाने काम सुरू होते.
त्या त्या भागतील स्थानिक खाद्यपदार्थ, परंपरा, सण, कलाकृती, आश्चर्ये, ठेवा, तेथील रहिवाशांचे शिष्टाचार आणि
१५/२१
चालीरीती बरेच काही शिकवून जातात. आयुष्य समृद्ध करतात. वेगळ्या दृष्टिकोनातूनही माणसाचे आयुष्य उलगडत जाते.
मुंबईने मला स्वप्न दिली, उर्जा दिली. ओळख दिली, श्वास दिला, ध्यास दिला.
दिल्लीत गेलो तर सत्तेची हवा काय असते ते कळाले. पानिपतात गेलो तर त्वेषाने पेटून उठलो, लढायला बळ
१६/२१
मिळाले.
दक्षिण भारतात संस्कार आणि भक्ती मिळाली. उत्तर भारतात कष्टाळू वृत्ती मिळाली तर पुर्व भारताने नैसर्गिक सौंदर्य जपायला शिकवले. गोव्याने आराम करायला, सुशेगात रहायला शिकवले तर पुण्याने कसे बोलावे ते सांगितले.
प्रत्येक राज्याच्या शहराच्या आठवणी काहीतरी निश्चित शिकवून
१७/२१
गेल्या.
युरोपने स्वच्छता,आदर आणि विज्ञान तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले.
गल्फमधे श्रीमंती आणि अवाढव्य स्वप्नही पैसा असला की पुर्ण होतात हे कळले.
व्हिएतनाममध्ये जेवण नक्की वाढावे कसे, खावे कसे ते शिकलो.तिथली लढवैय्यी वृत्ती तर अविस्मरणीय.
जर्मनी मधून औद्यगिक संशोधन आणि
१८/२१
जगाच्या पुढे राहणे म्हणजे नक्की काय ते पाहिले.
श्रीलंकेतील स्वच्छता आणि बांगलादेशकडून कमीत कमी वेळात जगात मॅन्युफॅक्चरिंगमधे काय काय चमत्कार करता येऊ शकतात, तर चीन मधली अचंबित करणारी महाकाय मार्केट्स, त्यांची जग काबिज करायची राक्षसी वृत्ती.
सिंगापूर तसेच इतर अनेक
१९/२१
प्रगत देशांमधे स्मार्ट शहर आणि देश म्हणजे नक्की काय ते कळाले.
सर्वात महत्वाचं म्हणजे जगात फिरल्यावर वाचनाचे ठोस महत्व कळाले.
उगीचच मोबाईल स्क्रिनवर आंगठे सुजवून घेण्यापेक्षा प्रवास खर जग दाखवतो “सत्य नेमकं कसं असतं?”हे प्रवास केला की उमगतं.
जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत,
२०/२१
नेमकं काय करायला हवं, काय नको ते कळतं.
तरूण वयात जेवढा शक्य होईल तेवढा प्रवास करा मित्रहो, त्यातून नक्कीच नव्या जगाचा “सर्वसमावेशक” माणूस घडू शकतो.
नंतर संसार, जबाबदाऱ्या, EMI आणि बिझी, बिझी बिझी कल्चर घात करायच्या आत जागे व्हा!
काही महिन्यांपूर्वी अत्यंत अभ्यासपुर्ण मराठी पुस्तक वाचनात आले.
मी अगदी ॲाफीसमधेच थांबून एका बैठकीत संध्याकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत त्याचा फडशा पाडला. पुढचे काही दिवस त्या पुस्तकातील भाग पुन्हा पुन्हा वाचला. त्या लेखकाबद्दल खूप आदर तयार झाला.
काहीही करून त्यांना भेटायचे आणि त्यांना धन्यवाद सांगायचे हे मनोमन ठरवलं.
खरं सांगायच तर मागच्या पाचएक वर्षात माझ्या वाचनात मराठी पुस्तक फार मोजकी येताहेत, आणि त्यात मला नक्कीच सुधारणा करायच्या आहेत. मला ते पुस्तक वाचून अजून काही मराठी पुस्तकं वाचायची प्रेरणाही मिळाली होती.
२/१४
दरम्यान मी त्यांची अजून एक पुस्तक वाचून काढले. लेखकाचा एकंदर आवाका मोठा होताच शिवाय त्यांचे कष्टही त्या लिखाणातून दिसत होते. मी काही जवळच्या मित्रांकडून त्या लेखकाचा नंबर मिळवायचा प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते.
असेच काही दिवस गेले, मी ही कामात बिझी झालो होतो. एक दिवस
३/१४
आमची काही पुर्वी ओळख नव्हती, मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंगमधे तो ही एका कंपनीत काम करायचा. आमची दोघांचीही सकाळी जायची एकच वेळ होती त्यामुळे येताजाता दिसायचा.
मुंबईत येऊन मला एक महिनापण झाला नव्हता. लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती वाटायची, पहिल्यांदा ट्राय करायला गेलो
👇
आणि जाम चेंबलो गेलो, अगदी भूगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचो.
एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे बसमधे शिरलो आणि अचानक युवराज पण त्या बसमधे मला दिसला. मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो. त्यानेही मला लगेच ओळखले. बस सूरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी
👇
प्राथमिक शाळेत असताना वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य डोक्यात फिट्ट झालंय - “जनावरात आणि माणसात एक फरक फार महत्वाचा आहे, माणसाला वाचन करण्याची सर्वोच्च शक्ती लाभलीये… जो तीचा वापर करेल, ज्ञान मिळवेल, शहाणा होईल, सतत वाचत राहील आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करेल तो पुढे जाईल.
१/९
आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीचा याहून सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही….शाळेत शिकून, वाचायला येत असून जर वाचत नसाल तर म्हसरात, कुत्र्यामांजरात आणि तुमच्यात फरक तो काय?”
आज जी मला एखाद्या विषयातील Clarity आहे ती लहानपणी किंवा पाच-दहा वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती आणि
२/९
आज जो Confidence आहे तो ही नव्हताच.
पुढील पाच वर्षांनी या दोन्ही बाबतीत मी कदाचित अजून समृद्ध होईन..... बरेच दोष, चुका समजतील, अजून सुधारणा होतील पण पुर्ण Clarity आणि Confidence येईपर्यंत मी Pause घेतला असता तर हा आयुष्याचा प्रवास कदाचित अवघड आणि खुप धिम्या गतीने झाला असता.
३/९
नुकसान केलेय, काहींचे तर आयुष्य संपुर्ण बदलून गेलेय.
कोविडपुर्व आणि कोविडनंतरचे जग अशी सरळ काळाची विभागणी आता झालीये.
येणाऱ्या काळात चॅलेंजेस अजून कठीण होत जातील. गुणवत्ता, प्रोडक्टिव्हीटी आणि चांगली एफीशियंसी देणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना भविष्य निश्चितच उज्वल असेल.मग
२/१९
आपली तरूण पिढी यासाठी तयार आहे का? ते शहरी भागातले असो, ग्रामिण भागातले असो, या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रोफेशनलिझम रक्तात मुरायला हवे.
आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल बऱ्यापैकी जागरूकता निर्माण करण्यात (निदान वर्तमानपत्र/समाजमाध्यमात तरी) थोडफार यश मिळालेय असे मला वाटतेय.
३/१९
मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव,पोहे, उप्पीट वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही.
बर मला हे पचायलाही सोपे जाते पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह #SaturdayThread#BusinessDots#मराठी 👇
मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.
बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा 👇
भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या 👇
आम्ही दोघेही एकाच वयाचे, समीर (नाव बदललेय) बडोद्याचा मराठी गडी,तिकडेच शिकला. मुंबईत कामाला आला,प्रचंड बुद्धिमान, उच्चशिक्षित,कामाप्रती अत्यंत प्रामाणिक. तो पॅालिश्ड,हसतमुख, टापटीप राहणारा.
रांगडी!
सहज बोललं तरी लोकांना वाटायचं मी भांडतोय….तो मात्र मला समजून घ्यायचा,खुप शिकवायचा.
आम्ही कॅार्पोरेटमधे एकत्र काम करताना मला त्याच्याकडून मॅनेजमेंटच्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.तो फार मायेने समजून घ्यायचा…लिडरशिप साठी लागणारे सर्व गुण त्याच्यात खच्चून भरलेले.
२/१५
पुढच्या आयुष्यात आमचे रस्ते वेगळे झाले, मी पुर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्याने कॅार्पोरेटमधेच थांबायचे ठरवले , त्याला खरच तिथे चांगले भविष्यही दिसत होते.
त्याने पुढे अत्यंत नावाजलेली आणि चांगली कंपनी निवडली, प्रचंड कष्ट आणि कित्येक नवनवीन क्षेत्रात त्या कंपनीला
३/१५