#Thread #अमर_सावरकर #वीर_सावरकर_जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग २):-
इंग्रजांच्या क्रूर आणि निर्दयी जाचातून आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी जो अविरत स्वातंत्र्यलढा झाला त्यात एक मोठं योगदान आहे ते सावरकर कुटुंबाचं.ज्यात तिन्ही भाऊ तर प्राणपणाने लढलेच पण
१
त्यांच्या पत्नींचं योगदान ही सावरकर बंधूंना लाभलं. त्यात बाबारावांच्या पत्नी तर साक्षात पतिव्रतेची आणि सहनशीलतेची मूर्तीच. ह्या मातेने पती अंदमानात असताना पती वियोगात अघोषित जन्मठेपचं भोगली आणि तीच कथा तात्यांच्या पत्नी यमुनाबाईंची.अशा दिव्य लोकांवर ताशेरे ओढणे म्हणजे सुर्यावर
२/
थुंकण्यासारखे आहे.
जर आपण ह्या सावरकर विरोधी लोकांचा 'अर्ज केले म्हणून ते माफीवीर होतात आणि ब्रिटिशांचे गुलाम होतात' हा तर्क विचारात घ्यायचा म्हणलं, तर मग ज्यावेळी सावरकरांची सुटका झाली त्यावेळेपासून त्यांनी सर्व सोडून द्यायला हवं होत. त्यांचं सामाजिक आणि राजकीय जीवन संपुष्टात
३/
यायला हवं होत. पण इतिहास तर काही वेगळंच सांगतो..!
१९२४ साली सावरकरांना स्थानबद्धतेत रत्नागिरीत ठेवण्यात आले. त्याकाळात त्यांच्यावर राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्याची बंदी घालण्यात आली. तेंव्हा सावरकरांनी सगळ्यात महत्वाचे काम हातात घेतले ते म्हणजे 'समाजसुधारणा' करण्याचे.
४/
त्यांनी अंदमानात असताना शुद्धीकरणाची अर्थात परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत हिंदूधर्मात घेण्याची मोहीम चालू केली होती, ती रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात चालू केली. तात्यांचा अगदी स्पष्ट विचार होता की "एखाद्याने स्वखुशीने धर्म स्वीकारला तर ते योग्य आहे पण एखाद्याला बळजबरीने धर्मांतर
५/
करण्यास लोक भाग पाडत असतील ते अत्यंत चुकीचे आहे." त्यांचं एकच म्हणणे होते जोपर्यंत मुस्लिम व ख्रिश्चन लोक हिंदूंना बळजबरी धर्मांतर करण्याचे कमी करत नाहीत तोपर्यंत मी हे शुद्धीकरण चालूच ठेवणार. ह्यात मग धर्मांतर केलेल्या लोकांचे संसार थाटून देणे,त्यांना समाजात मान्यता मिळवून
६/
देणे अशा विविध योजना हाती घेतल्या.त्यानंतर हिंदू समाजाच्या सुधारणेचे काम त्यांनी हातात घेतले.ज्यात अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी काम केले गेले.अस्पृश्यतेमुळे हिंदू समाज विभागून गेला होता त्यामुळे समाजास एकत्र करायचे असेल तर अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे असे सावरकरांचे म्हणणे होते.
७/
त्यासाठी त्यांनी मंदिरात बहुजन लोकांना प्रवेश मिळवून देणे,शाळेमध्ये सर्वांना समान अधिकार, सर्वांचा गणेश उत्सव अशा गोष्टींचा अवलंब केला.तसेच त्यांनी सर्वांना प्रवेश देणारे पतित पावन मंदिर उभारले.ज्याच्या प्राणप्रतिष्ठेत बहुजनांचा देखील सहभाग होता. हळू हळू हेच पतित पावन मंदिर
८/
समाज जागृती कार्यक्रमाचे विद्यापीठ झाले. ज्यात सर्व समाजाचे सहभोजन,स्त्रियांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम अशा कार्यक्रमाद्वारे हिंदूंना एकत्र करण्याचे काम केले.
ह्या सर्व उपक्रमांच्या बातम्या सर्वदूर पसरल्या. त्यावेळी सावरकरांची सगळीकडे स्तुती होऊ लागली. कर्मवीर व्ही आर शिंदे
९/
म्हणतात की "जर सावरकरांच्या विचारांचा अवलंब केला तर अस्पृश्यता काही काळातच भारतातून नष्ट होईल."तसेच काकासाहेब बर्वे म्हणत की "सावरकर म्हणजे गौतम बुद्ध,शिवाजी महाराज आणि स्वामी दयानंद ह्यांचे एकत्र प्राकट्य आहे."
ह्या समाजसुधारणेबरोबर त्यांनी मराठी भाषा शुद्धीकरणाची चळवळ
१०/
चालवली. मराठीत आक्रमित झालेल्या इंग्लिश व उर्दू शब्दांना प्रतिशब्द तयार केले. सगळ्यांना नवीन माहिती करून दिली व वापरण्याची सक्ती केली. हे त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळातील त्यांच्या अफाट कामाचं संक्षिप्त वर्णन.
१९३७ ला त्यांची संपूर्ण मुक्तता झाली. त्याबरोबरच त्यांनी हिंदू
११/
महासभेचे कार्य हाती घेतले.या काळात त्यांनी संपूर्ण भारत पादाक्रांत केला. सगळीकडे त्यांचं खूप भव्य प्रमाणात स्वागत होत असे. त्यांच्या स्वागताला इतकी गर्दी होई की सभेच्या ठिकाणी जायला कधी कधी २-२ तास वेळ होई. १९३७ पासून पुढे ते सलग सहा वेळा हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिले.
१२/
त्याकाळी काँग्रेस तिच्या मुळ उद्दीष्टांपासून भिन्न वागत होती. मुस्लिमांचे लांगुलचालन करणे ह्यातच काँग्रेस धन्यता मानत असे. तसेच मुस्लिम लीगचे कार्यक्रम पण हिंदूंना त्रासदायक होऊ लागले होते. अशा काळात सावरकरांनी सर्व हिंदूंना आधार दिला. "एखादा देश हा त्याच्या बहुसंख्य असलेल्या
१३/
लोकांच्या संस्कृतीवरच ओळखला जात असतो त्यामुळे भारत हे एक 'हिंदूराष्ट्र' म्हणूनच ओळखले जायला हवे."असे तात्यांचे स्पष्ट मत होते.तात्यांनी आपल्याला हिंदूची अगदी स्पष्ट व्याख्या दिली आहे. ते म्हणतात,
आसिंधूसिन्धुपर्यन्ता,यस्य भारत भूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव सवै हिन्दुरिति स्मृतः।।
अर्थात सिंधू सागरापासून ते सिंधूनदीपर्यंत असलेली ही भूमी ज्याची 'पितृभू' आहे तोच 'हिंदू' आहे. तसेच त्यांनी अखंड भारताचा कायमच पुरस्कार केला. अंदमानात प्रचंड कष्ट,नंतर स्थानबद्धता असे अनेक आघात सहन करून पण सावरकर हिंदू रक्षणार्थ हिमालयासारखे अचल उभे राहिले. अशा अहोरात्र भारतीय
१४/
लोकांसाठी खचलेल्या ह्या दिव्य पुरुषास काही बुद्धिहीन लोकं हवे त्या भाषेत टीका करतात हे अत्यंत लाजिरवाणे आहे.
अहो जर सावरकर देशभक्त नसले असते तर एवढी कठोर शिक्षा भोगून परत त्यांनी एवढं कष्टमय जीवन कशाला जगलं असतं.? सगळं सोडून आरामात राहता आलं असतं ना त्यांना..!
१५/
सावरकर जर देशभक्त नसते तर बाकी देशभक्तांनी त्यांच्यासाठी गौरवोद्गार कशाला काढले असते. काही उदाहरणे आपण पाहू. क्रांतिवीर भगत यांनी तात्यांचं '१८५७ चा स्वातंत्र्य लढा' ह्या पुस्तकाच्या २००० प्रती छापून लोकांमधे वाटल्या होत्या.तसेच त्यांच्या
१६/
सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तात्यांच 'हिंदूपदपादशाही' हे पुस्तक वाचण्याची सक्ती असे. ज्यावेळी भगत सिंह व इतर लोकांना फाशी झाली त्यादिवशी सावरकरांच्या घरावर भगव्या ऐवजी काळा झेंडा होता.तसेच त्यांनी या वीरांवर कविता देखील केली.
१९४० साली सावरकरांची आणि सुभाषचंद्र बोस
१७/
यांची मुंबई इथे भेट झाली.त्यात ते म्हणतात की "सावरकरांची सुटका झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्यासारख्या नेत्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात नवी उर्मी येईल."पुढे १९४२ मध्ये रेडिओ वर बोलताना ते म्हणाले की "मला खूप आनंद वाटत आहे की वीर सावरकर युवकांना आझाद हिंद फौजेत येण्यासाठी
१८/
आग्रह करत आहे." त्याचप्रमाणे असफ अली म्हणतात की "सावरकरांच्या रुपात मला शिवाजी महाराजांचा आभास होतो."
सगळ्यात महत्वाचं भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या एका पत्रात म्हणातात की "सावरकर हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत..!" तसेच त्यांनी सावरकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डाक
१९/
तिकीट ही जाहीर केले होते.
आता वाचकांनी ठरवावे की ह्या वरील लोकांवर विश्वास ठेवायचा की खोट्या आरोपांवर...!! स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे सकळ गुणांची खाण होती.म्हणजे एक एक गुण वर्णन करायचा म्हणलं तर खंड तयार होतील पुस्तकांचे.
२०/
मातृभूमीसाठी प्राणांतिक प्रेम,एक उत्तम लेखक,कवी,वक्ता,हिंदू हितार्थ जीवनभर काम, राजकीय आणि सामाजिक दूरदृष्टी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक समाजसुधारक.अशा ह्या थोर महापुरुषाच्या ऋणातून भारत कधीही उतराई होऊ शकणार नाही.!
धन्यवाद.! #VeerSavarkar @ShefVaidya@smitprabhu@thatPunekar
संदर्भ:-
१) माझी जन्मठेप - स्वा सावरकर
२) माझ्या आठवणी - स्वा सावरकर
३) Echoes from Andamans - Veer Savarkar
४) सावरकर चरित्र - शी ल करंदीकर
५) Savarkar and His Times - Dhananjay Keer
६) Struggle for Freedom - R C Majumdar
७) Swarajya,OpIndia and StandPointIndia's Articles
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा भाग १ ची लिंक:-
#वीर_सावरकर_जयंती #VeerSavarkar
मनातील सावरकर विचारमार्तंड मावळू देऊ नका...!
कालचा २८ मे चा सूर्योदय आपल्यासोबत सावरकर विचारांची किरणे सोबत घेऊन आला. काल तात्यारावांची जयंती आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने साजरी केली. दिवसभर अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने सावरकरांचे विचार
१/
मांडले. हे सर्व पाहून सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला असेल तर तो या मातृभूमीला कारण तिच्या एका थोर पण उपेक्षित पुत्राची गाथा काल लोकांच्या ओठावर आणि हृद्गत झाली होती संपूर्ण दिवस. अगदी सगळचं सावरकरमय झालं होत सगळं.!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्त्व सहजासहजी कवेत येईल असं
२/
व्यक्तिमत्त्व नाहीये.तात्याराव कळायला आयुष्य खर्ची घातलं तरी त्यांचा थांग लागणं कठीण.
सावरकर हा विचारांचा महासागर आहे, आपण फक्त आपल्या बुद्धीसीमेनुसार त्यातील विचारामृत आपल्या भांड्यात भरून घेण्याचा प्रयत्न करावा व त्याचं सेवन पूर्ण जन्मभर करावं.
पण सावरकर विचार फक्त
३/
#Thread #SavarkarJayanti #सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग १) :-
इसवी सन १८५७ पासून ते भारताने स्वातंत्र्य मिळवेपर्यंत अनेक थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या समरकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन, आपल्या 'स्वातंत्र्यलक्ष्मीचे' आराधन केले.
१/
त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
बालपणीच आपल्या कुलदेवतेसमोर "सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.!" या घेतलेल्या शपथीचं निर्वहन तात्यांनी शरीरास आत्यंतिक कष्ट सोसवून केलं. बऱ्याच प्रसंगी अशी वेळ येई की वाटे आता प्राणदोर तुटतो की काय.!
२/
पण मनात सतत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच ध्येय त्यांना परत आपल्या कर्मात अग्रेसर करी.
अशा या स्वातंत्र्यवीराची बदनामी करण्याचे कारस्थान केवळ आपल्या काही ऐहिक सुखासाठी काही लोक करत आहेत. कारण काय सांगतात तर सावरकरांनी अंदमान मध्ये असताना माफीनामे लिहिले होते म्हणून ते काही
३/
#Thread #KnowYourDharma #Hinduism
Scriptures of Sanatan Hindu Dharma:-
As Sanatan Hindu Dharma is based on philosophy of "एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति।" i.e. Truth is one and explained in many ways. Also we have system of "बहुऋषिमतम्" meaning many scholars have many views. 1/
So we have large numbers of Dharmic Sahitya or scriptures.
Scriptures of Sanatan Hindu Dharma can be broadly classified into four groups which are 'श्रुती'(Shruti),'स्मृती'(Smriti), 'पुराण'(Puaranas) and 'शास्त्र'(Shastras). That's why before beginning of every Puja in Sankalp
2/
we say 'श्रुतीस्मृतीपुराणोक्त शास्त्रोक्त फल प्राप्त्यर्थं।' which means 'may we get the फल i.e. result as prescribed by Shruti,Smriti,Puran and Shahstra.'
3/
#Thread #शंकराचार्य #ShankaraJayanti
आद्य शंकराचार्य अवतार कार्य :-
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
जगताचे पालनहार भगवान श्रीकृष्ण आपल्याला अर्थात त्यांच्या भक्तांना वरील वचन देतात की,
१/
ज्या ज्या वेळी धर्मला ग्लानी येईल त्या त्या वेळी मी अवतार घेऊन धर्माचे अधिष्ठान कायम राखेल. आपण इतिहास पाहिल्यास ह्या वचनाची प्रचिती आपणाला अनेकदा आलेली दिसते. अशीच काहीशी परिस्थिती भगवान आद्यशंकराचार्यांच्या अवतारास कारणीभूत ठरली. सगळीकडे बुद्ध धर्माचे स्तोम माजले होते.
२/
तसेच आपला सनातन धर्म अनेक संप्रदायात विभागला गेला होता.अनेक भेद,अनेक मत-मतांतरं निर्माण झाले होते.धर्म अगदी त्राहि त्राहि करतं होता आणि अशातचं आपल्या भक्तांना दिलेले वचन पाळण्यासाठी भगवान साम्बसदाशिवाने अवतार घेतला.
शंकर दिग्विजय ग्रंथात शंकराचार्य यांच्या जन्माच वर्णन करणारा
३/
#Hindu #KnowYourDharma
Sanatan Hindu Dharma and Secularism :-
Now a days we hear lot about secularism and how it's in danger due to Hindu Dharma.Many people cry day and night saying that ''India is secular country and it's secularism is in danger." So what is the meaning of 1/
secularism? and does secularism really in danger due to Hindu Dharma?
The term "secularism" was first used by the British writer George Holyoake in 1851.Holyoake invented the term "secularism" to describe his views of promoting a social order separate from religion, without 2/
actively dismissing or criticizing religious belief. In Hindi secularism can be called as 'धर्मनिरपेक्षता' - neutral view to all the religions which is misdefined as 'Sarv Dharm Sambhav' i.e. all religions are same. I want to ask one simple question to these people who say all
3/
#Thread #हनुमान
बुद्धीतील जांबुवंताच्या उपदेशाची गरज..!!!
रावणाने सीतेचे हरण केले.राम अत्यंत शोकाकुल अवस्थेत लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधार्थ फिरत असता महारुद्र हनुमानाची भेट झाली.पुढे सुग्रीवाची भेट झाली आणि सगळी वानरसेना सीतेला शोधायला निघाली.अंगद,जांबुवंत,नल,नील
१/
अशा वीर योध्यांसमवेत महाबली हनुमान ही निघाले. शोधात भटकत असता वानरांची सेना दक्षिण समुद्र किनारी येऊन ठेपली आणि तिथे थोर भगवद्भक्त जटायूच्या भावाची अर्थात संपातीची भेट वानरांना झाली आणि त्याने सगळी सीतेच्या हरणाची कहाणी वानरांना सांगितली.आता सीतेला रामांचा संदेश द्यायचा म्हणजे
२/
समुद्र ओलांडून लंकेत जावे लागणार. मग सगळ्यात चर्चा चालू झाली की कोण एवढा समर्थ आहे की समुद्र ओलांडून जाऊन सीतेस रामांचा संदेश पोचवू शकेल. ही चर्चा चालू असताना हनुमंतराय मात्र एका बाजूला शांत उभे होते. त्यांच्यात हाच समुद्र काय पण सप्तसमुद्र एकावेळी ओलांडून जाण्याचं सामर्थ्य
३/