#वीर_सावरकर_जयंती #VeerSavarkar
मनातील सावरकर विचारमार्तंड मावळू देऊ नका...!
कालचा २८ मे चा सूर्योदय आपल्यासोबत सावरकर विचारांची किरणे सोबत घेऊन आला. काल तात्यारावांची जयंती आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने साजरी केली. दिवसभर अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने सावरकरांचे विचार
१/
मांडले. हे सर्व पाहून सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला असेल तर तो या मातृभूमीला कारण तिच्या एका थोर पण उपेक्षित पुत्राची गाथा काल लोकांच्या ओठावर आणि हृद्गत झाली होती संपूर्ण दिवस. अगदी सगळचं सावरकरमय झालं होत सगळं.!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्त्व सहजासहजी कवेत येईल असं
२/
व्यक्तिमत्त्व नाहीये.तात्याराव कळायला आयुष्य खर्ची घातलं तरी त्यांचा थांग लागणं कठीण.
सावरकर हा विचारांचा महासागर आहे, आपण फक्त आपल्या बुद्धीसीमेनुसार त्यातील विचारामृत आपल्या भांड्यात भरून घेण्याचा प्रयत्न करावा व त्याचं सेवन पूर्ण जन्मभर करावं.
पण सावरकर विचार फक्त
३/
बोलण्यापुरते मर्यादित राहिले तर तो त्या विचारांचा अपमान होईल. सावरकर हे प्रत्येकाच्या मनामनात तर पोहचायलाचं हवेत पण त्यासोबतच ते कृतीतून उतरणे जास्त महत्वाचे तिचं खरी त्यांना आदरांजली होईल.
आज समाज अनेक भेदांमुळे छिन्नविच्छिन्न झालेला असताना, केवळ तात्यारावांच्या विचारांची
४/
कडीचं या सर्व समाजाला योग्यरितीने बांधून ठेवू शकते. त्यामुळे तिचा अंगीकार करून "तोडूनिया सकळ भेदांचे बंधन।एक सावरकर नित्य धरा।।" असे म्हणून आपण सर्वांनी धर्माच्या छत्राखाली एकत्र येऊन, विघातक शक्तींचा नाश करणे हेच मुख्य ध्येय मानव म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाचे हवे..!
आज संपूर्ण
५/
विश्वात निराशेचा अंधकार पसरलेला असताना मनामध्ये सावरकर विचारांचे स्फुलिंग पेटवून या सर्व तमावर विजय मिळवण्याची नितांत गरज आहे..! ज्या तात्यांनी अंदमानात प्राणांतिक अत्याचार झाले तरी सुद्धा आपल्या मातृभूमीच्या सेवेचे ध्येय थोडेसुद्धा डळमळू दिले नाही, तर मग आपणाला जर तात्यांचा
६/
अनुयायी म्हणवून घेण्याच्या पात्रतेच व्हायचं असेल तर या सर्व संकटांना तोंड द्यायलाच हवं. तस बघायला गेलं तर आपली संकटे 'जवा' एवढी लहान आहेत तात्यांच्या पर्वतासमान संकटांपुढे..! तर सावरकरांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण संकटांना सामोरे जायला हवे आणि नक्कीच एकवेळ अशी
७/
येईल की वीरश्रीची माळ आपल्या गळ्यात पडल्यावाचून राहणार नाही..!
आज जरी २८ मेचा सूर्य मावळला असला तरी आपल्या मनातील सावरकरांच्या विचारांचा 'सूर्य' आपण कोणीच मावळू देऊ नये
८/
उलट त्या विचार मार्तंडाने सगळी सृष्टी प्रकाशित करून टाकावी आणि मग नक्कीच आपण स्वतःस एक आदर्श सावरकर भक्त म्हणवून घेऊ शकू..!
धन्यवाद..!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread #अमर_सावरकर #वीर_सावरकर_जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग २):-
इंग्रजांच्या क्रूर आणि निर्दयी जाचातून आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी जो अविरत स्वातंत्र्यलढा झाला त्यात एक मोठं योगदान आहे ते सावरकर कुटुंबाचं.ज्यात तिन्ही भाऊ तर प्राणपणाने लढलेच पण
१
त्यांच्या पत्नींचं योगदान ही सावरकर बंधूंना लाभलं. त्यात बाबारावांच्या पत्नी तर साक्षात पतिव्रतेची आणि सहनशीलतेची मूर्तीच. ह्या मातेने पती अंदमानात असताना पती वियोगात अघोषित जन्मठेपचं भोगली आणि तीच कथा तात्यांच्या पत्नी यमुनाबाईंची.अशा दिव्य लोकांवर ताशेरे ओढणे म्हणजे सुर्यावर
२/
थुंकण्यासारखे आहे.
जर आपण ह्या सावरकर विरोधी लोकांचा 'अर्ज केले म्हणून ते माफीवीर होतात आणि ब्रिटिशांचे गुलाम होतात' हा तर्क विचारात घ्यायचा म्हणलं, तर मग ज्यावेळी सावरकरांची सुटका झाली त्यावेळेपासून त्यांनी सर्व सोडून द्यायला हवं होत. त्यांचं सामाजिक आणि राजकीय जीवन संपुष्टात
३/
#Thread #SavarkarJayanti #सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग १) :-
इसवी सन १८५७ पासून ते भारताने स्वातंत्र्य मिळवेपर्यंत अनेक थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या समरकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन, आपल्या 'स्वातंत्र्यलक्ष्मीचे' आराधन केले.
१/
त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
बालपणीच आपल्या कुलदेवतेसमोर "सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.!" या घेतलेल्या शपथीचं निर्वहन तात्यांनी शरीरास आत्यंतिक कष्ट सोसवून केलं. बऱ्याच प्रसंगी अशी वेळ येई की वाटे आता प्राणदोर तुटतो की काय.!
२/
पण मनात सतत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच ध्येय त्यांना परत आपल्या कर्मात अग्रेसर करी.
अशा या स्वातंत्र्यवीराची बदनामी करण्याचे कारस्थान केवळ आपल्या काही ऐहिक सुखासाठी काही लोक करत आहेत. कारण काय सांगतात तर सावरकरांनी अंदमान मध्ये असताना माफीनामे लिहिले होते म्हणून ते काही
३/
#Thread #KnowYourDharma #Hinduism
Scriptures of Sanatan Hindu Dharma:-
As Sanatan Hindu Dharma is based on philosophy of "एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति।" i.e. Truth is one and explained in many ways. Also we have system of "बहुऋषिमतम्" meaning many scholars have many views. 1/
So we have large numbers of Dharmic Sahitya or scriptures.
Scriptures of Sanatan Hindu Dharma can be broadly classified into four groups which are 'श्रुती'(Shruti),'स्मृती'(Smriti), 'पुराण'(Puaranas) and 'शास्त्र'(Shastras). That's why before beginning of every Puja in Sankalp
2/
we say 'श्रुतीस्मृतीपुराणोक्त शास्त्रोक्त फल प्राप्त्यर्थं।' which means 'may we get the फल i.e. result as prescribed by Shruti,Smriti,Puran and Shahstra.'
3/
#Thread #शंकराचार्य #ShankaraJayanti
आद्य शंकराचार्य अवतार कार्य :-
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
जगताचे पालनहार भगवान श्रीकृष्ण आपल्याला अर्थात त्यांच्या भक्तांना वरील वचन देतात की,
१/
ज्या ज्या वेळी धर्मला ग्लानी येईल त्या त्या वेळी मी अवतार घेऊन धर्माचे अधिष्ठान कायम राखेल. आपण इतिहास पाहिल्यास ह्या वचनाची प्रचिती आपणाला अनेकदा आलेली दिसते. अशीच काहीशी परिस्थिती भगवान आद्यशंकराचार्यांच्या अवतारास कारणीभूत ठरली. सगळीकडे बुद्ध धर्माचे स्तोम माजले होते.
२/
तसेच आपला सनातन धर्म अनेक संप्रदायात विभागला गेला होता.अनेक भेद,अनेक मत-मतांतरं निर्माण झाले होते.धर्म अगदी त्राहि त्राहि करतं होता आणि अशातचं आपल्या भक्तांना दिलेले वचन पाळण्यासाठी भगवान साम्बसदाशिवाने अवतार घेतला.
शंकर दिग्विजय ग्रंथात शंकराचार्य यांच्या जन्माच वर्णन करणारा
३/
#Hindu #KnowYourDharma
Sanatan Hindu Dharma and Secularism :-
Now a days we hear lot about secularism and how it's in danger due to Hindu Dharma.Many people cry day and night saying that ''India is secular country and it's secularism is in danger." So what is the meaning of 1/
secularism? and does secularism really in danger due to Hindu Dharma?
The term "secularism" was first used by the British writer George Holyoake in 1851.Holyoake invented the term "secularism" to describe his views of promoting a social order separate from religion, without 2/
actively dismissing or criticizing religious belief. In Hindi secularism can be called as 'धर्मनिरपेक्षता' - neutral view to all the religions which is misdefined as 'Sarv Dharm Sambhav' i.e. all religions are same. I want to ask one simple question to these people who say all
3/
#Thread #हनुमान
बुद्धीतील जांबुवंताच्या उपदेशाची गरज..!!!
रावणाने सीतेचे हरण केले.राम अत्यंत शोकाकुल अवस्थेत लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधार्थ फिरत असता महारुद्र हनुमानाची भेट झाली.पुढे सुग्रीवाची भेट झाली आणि सगळी वानरसेना सीतेला शोधायला निघाली.अंगद,जांबुवंत,नल,नील
१/
अशा वीर योध्यांसमवेत महाबली हनुमान ही निघाले. शोधात भटकत असता वानरांची सेना दक्षिण समुद्र किनारी येऊन ठेपली आणि तिथे थोर भगवद्भक्त जटायूच्या भावाची अर्थात संपातीची भेट वानरांना झाली आणि त्याने सगळी सीतेच्या हरणाची कहाणी वानरांना सांगितली.आता सीतेला रामांचा संदेश द्यायचा म्हणजे
२/
समुद्र ओलांडून लंकेत जावे लागणार. मग सगळ्यात चर्चा चालू झाली की कोण एवढा समर्थ आहे की समुद्र ओलांडून जाऊन सीतेस रामांचा संदेश पोचवू शकेल. ही चर्चा चालू असताना हनुमंतराय मात्र एका बाजूला शांत उभे होते. त्यांच्यात हाच समुद्र काय पण सप्तसमुद्र एकावेळी ओलांडून जाण्याचं सामर्थ्य
३/