संक्रमण साखळी तोडण्यासाठी तुम्हाला थोडा त्याग करावा लागेल.
संचार टाळा, यामुळे तुम्ही आणि बाकीचे सुरक्षित राहाल.
😷मास्क आता काळाची गरज बनली आहे, जी कोविड-19 पासून जगाचा बचाव करु शकते.
SARS-CoV-2 हा विषाणू आहे, म्युटेशन हा त्याचा स्थायीभाव आहे. विषाणू जेंव्हा पेशीआक्रमण करतो, तेंव्हा संक्रमण वाढते आणि उत्परिवर्तन (म्युटेशन) घडून येते- डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
व्हेरियंट कोणताही असो, कोविड अनुरुप वर्तन किंवा सार्वजनिक आरोग्य पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता नाही.
व्हेरियंटचा माग आणि त्यावर करायची कृती यात बदल होतो: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
भारतात आपण व्हेरियंटची @WHO ने परिभाषित केलेल्या नावाप्रमाणे जातो.
व्हेरियंटचा पूर्वी काही संबंध होता का आणि अशा प्रकारच्या व्हेरियंटचा सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम, याचा शास्त्रीय अभ्यास केला जातो: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
जेनेटीक मार्कर रिसेप्टर जे अँटीबॉडीजवर प्रभाव करतात त्यांना व्हेरियंटस ऑफ इंटरेस्ट असे म्हटले जाते.
फिल्ड साईट आणि क्लिनिकल सहसंबंधातून तीव्र संक्रमण दिसून आल्यास त्याला काळजी करण्याजोगे व्हेरियंट असे म्हटले जाते: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
पहिला VoC युकेत जाहीर केला होता, आपल्याकडे यापैकी चार आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी डेल्टा व्हेरियंट शोधला आणि जागतिक डेटाबेसकडे प्रस्तुत केला. आपल्या देशातील जिनोमिक निगराणीने इतर देशांनाही मोठी मदत झाली: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
नुकतेच आपल्या लक्षात आहे की, आणखी एक म्युटेशन पुढे आले आहे, जे रिसेपटर बायन्डिंग डोमेनवर प्रभाव करु शकते. डेल्टा प्लस व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटचाच उप-प्रकार आहे: डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
INSACOG चा विस्तार होऊन 300 सेन्टिनल केंद्रांच्या माध्यमातून जिनोमिक नमुने गोळा केले जातात, 28 सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा आणि रुग्णालयाचे नेटवर्क आहे. रुग्णालयांमध्ये नमुने चाचणी होते, ज्यातून आपल्याला तीव्रता, सहसंबंध आणि संक्रमणातील वाढ कळते : डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
राज्यांकडून 65,000 पेक्षाही अधिक नमुने घेतले आहेत आणि प्रक्रिया केली आहे, सुमारे 50,000 नमुन्यांचे परीक्षण केले आहे. यातील सुमारे 50% व्हेरियंट ऑफ कन्सर्न असल्याचे आढळून आले आहे : डॉ रेणू स्वरुप, सचिव, @DBTIndia
भूविज्ञान मंत्रालयाने ठेवलेल्या "Deep Ocean Mission" प्रस्तावाला #Cabinet ची मंजूरी.
संसाधनांसाठी खोल महासागरात संशोधन करणे आणि समुद्रातील संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी खोल समुद्र तंत्रज्ञान विकसित करणे याचा उद्देश: केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar
केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत खत विभागाने ठेवलेल्या 'पौष्टिक आधारित सबसिडी दर' हा प्रस्ताव फॉस्फेटिक & पोटॅसिक खतांसाठी 2021-22 वर्षासाठी लागू करण्यास मंजूरी: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya
कोविड विषाणुमुळे प्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो.
मधुमेह रुग्ण ज्यांना कोविड संसर्ग झाला आहे आणि जे मोठ्या प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करतात, त्यांना या संसर्गाची बाधा होण्याची मोठी शक्यता असते: डॉ राजीव जयदेवन