बहुतांश #COVID रुग्ण 2 - 4 आठवड्यात बरे होतात. मात्र, काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यानंतरही लक्षणे राहतात, ती Acute Post COVID Syndrome म्हणून ओळखली जातात, तर, 12 महिन्यानंतरही दिसून येणाऱ्या लक्षणांना Post COVID Syndrome असे म्हणतात: डॉ निखिल बांते
विषाणू केवळ फुफ्फुसांवर परिणाम करत नाही, तर यकृत, मेंदू आणि मूत्रपिंडावरही आघात करतो. म्हणून यातून पूर्णपणे बरे होण्यास जास्त कालावधी लागतो: डॉ बांते
LIVE
विषाणुमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती अति सक्रिय होते, विषाणू आणि शरीराच्या लढाईत शरीरात अनेक रसायनांचा वापर होतो, ज्यामुळे अवयवांमध्ये जळजळ निर्माण होते. काही रुग्णांमध्ये हा दाह जास्त काळ राहतो: डॉ निखिल बांते
COVID मधून बरे झाल्यानंतर जर बोलताना त्रास जाणवत असेल, शरीराच्या एका भागात अर्धांगवायू /अशक्तपणा जाणवत असेल तर हे स्ट्रोकचे लक्षण आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे: डॉ बांते
जे #COVID19 रुग्ण ऑक्सिजन उपचारावर होते, त्यांनी बरे झाल्यानंतर फुफ्फुसांची तपासणी करावी. यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता लक्षात येईल: डॉ बांते
#COVID19 मधून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवतो, मात्र लक्षात घ्या हा ह्रदयविकार नाही. बरे झालेल्या रुग्णांमध्ये केवळ <3% रुग्णांमध्ये हा त्रास जाणवतो: डॉ बांते
#PostCovid संसर्गामध्ये दुसरा प्रकार म्हणजे जिवाणू संक्रमण, काही रुग्णांमध्ये बुरशीजन्य संक्रमणही आढळते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे हे घडते. तसेच मूत्रमार्गात संसर्गही आढळतो: डॉ बांते
ज्या व्यक्तींना पचनाचा त्रास आहे, त्यांनी एकच वेळ आहार घ्यावा.
प्रथिने- आहारात प्रथिनांचा वापर असावा. रोगाशी लढताना मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा ऱ्हास झालेला असतो. यासोबत भाज्यांचा आहारात समावेश करावा, यामुळे फायबर मिळते- @IshiKhosla1
Protective Foods
आहारात रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करावा (Rainbow Diet)
दुपारच्या जेवणात सलाड आणि कच्च्या भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात करावा.
तेल आणि स्निग्ध पदार्थ- दही, तूप, मोहरी तेल, ओमेगा-3 मिळते. याचा अतिशय समतोल वापर करावा.
भूविज्ञान मंत्रालयाने ठेवलेल्या "Deep Ocean Mission" प्रस्तावाला #Cabinet ची मंजूरी.
संसाधनांसाठी खोल महासागरात संशोधन करणे आणि समुद्रातील संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी खोल समुद्र तंत्रज्ञान विकसित करणे याचा उद्देश: केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar
केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत खत विभागाने ठेवलेल्या 'पौष्टिक आधारित सबसिडी दर' हा प्रस्ताव फॉस्फेटिक & पोटॅसिक खतांसाठी 2021-22 वर्षासाठी लागू करण्यास मंजूरी: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya
कोविड विषाणुमुळे प्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो.
मधुमेह रुग्ण ज्यांना कोविड संसर्ग झाला आहे आणि जे मोठ्या प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करतात, त्यांना या संसर्गाची बाधा होण्याची मोठी शक्यता असते: डॉ राजीव जयदेवन
आजच्या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. फेब्रुवारी महिन्यात बैठक घ्यायची होती. मात्र, संसदेचे अधिवेशन आणि त्यानंतर काही राज्यांतील निवडणुका यामुळे बैठक होऊ शकली नाही: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
▪️ #COVID शी निगडीत उपकरणे, सरकारला देणगी म्हणून खरेदी केली असतील किंवा राज्य प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार एखाद्या संस्थेला देण्यात येणार असतील त्यांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत IGST मधून सूट देण्यात येईल: केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman
#Amphotericin-B (म्युकरमायसोसवरील उपचारासाठी) देखील IGST च्या यादीतून वगळण्यात आले आहे, संक्रमणाचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय घेण्यात आला : केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman