एलआयसीचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. या आयपीओची साईज साधारण ५३,००० ते ९३,००० कोटींच्या घरात असेल असा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. हा आयपीओ भारतीय मार्केटमधील सर्वात मोठा असेल.
तुम्ही एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू, पण या आयपीओचा थेट परिणाम होऊ शकतील असे चार घटक या थ्रेडमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. #म#मराठी#lic#LICIPO
१. CDSL - एलआयसीने आपल्या आयपीओमध्ये १०% कोटा आपल्या पॉलिसीहोल्डर्ससाठी राखीव ठेवला आहे. यातले बरेच लोक असे असणार आहेत की जे पहिल्यांदा डिमॅट अकाऊंट ओपन करतील. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांचे साधारण २९ कोटी पॉलिसीहोल्डर्स आहेत.
आयपीओला अप्लाय करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे बंधनकारक आहे. भारतात सध्या CDSL आणि NSDL या दोनच डिपॉझिटरी आहेत. या दोन्हींपैकी फक्त CDSL ही एकच लिस्टेड कंपनी आहे. CDSL कडे सध्या जवळपास ५.८ कोटी इन्व्हेस्टर अकाऊंट्स आहेत.
एलआयसी आयपीओच्या निमित्ताने २९ कोटींपैकी २०-३०% लोकांनी डिमॅट अकाऊंट ओपन केले आणि त्यातला निम्मा वाटा CDSL ला मिळाला तरी हा आकडा २ कोटी ९० लाख ते ४ कोटी ३५ लाखांच्या घरात असू शकेल.
२. ब्रोकर्स - आयपीओला अप्लाय करताना भलेही ब्रोकर अकाऊंट लागत नसेल. पण जर आयपीओची अलॉटमेंट मिळाली आणि ते शेअर्स विकायचे असतील तर तुम्हाला ब्रोकरची गरज लागतेच लागते. या आयपीओच्या निमित्ताने ब्रोकर्सला बरेच नवे कस्टमर्स मिळतील.
या कस्टमर्सला हे ब्रोकर्स आपली इतर प्रॉडक्टसदेखील विकू शकतील.
३. इंश्युरन्स कंपन्या - एलआयसी आयपीओच्या निमित्ताने भारतातील इंश्युरन्स सेक्टरला नव्याने बूस्ट मिळू शकतो. एलआयसी जरी मार्केट लीडर असले तरी इतर कंपन्याना या बूस्टचा चांगला फायदा मिळू शकेल.
४. इंडेक्सवरील परिणाम - निफ्टी ५० इंडेक्समधील कंपन्यांचे वेटेज हे त्या त्या कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे यावरून ठरवले जाते. म्हणजेच कंपनीत नॉन प्रमोटर होल्डिंग किती आहे यावरून ठरवले जाते. ज्यावेळी एलआयसीचे लिस्टिंग होईल.
तेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन नुसार ती भारतातील पहिल्या तीन कंपन्यांमधील एक कंपनी असेल. त्यामुळे एलआयसीचा समावेश जर इंडेक्समध्ये करायचा झाला तर इंडेक्स वेटेजची रिअलाइनमेंट करावी लागेल आणि
एलआयसी ही भारत सरकारची कंपनी आहे. आता आयपीद्वारे सरकार या कंपनीतला आपला काही हिस्सा विकणार आहे. हा हिस्सा विकला तरीही बराचसा हिस्सा सरकारकडे कायम असणार आहे. #म#मराठी#LIC#LICIPO
मग ही सरकारी कंपनी आयपीओनंतर प्रायव्हेट झाली तर तिचा कारभार कसा चालणार? जे नवे लोक एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील त्यांच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या असल्या तर काय करायचे? असे काही प्रश्न या निमित्ताने उभे राहतील. #म#मराठी#LICIPO
१. सरकार आपला हिस्सा किती आणि कसा कमी करणार?
आयपीओच्या नियमानुसार सरकारला एलआयसीमधील कमीत कमी ५% हिस्सा कमी करावा लागेल. कंपनीचे लिस्टिंग झाल्यावर दोन वर्षात आणखी १०% आणि नंतर पुढच्या पाच वर्षात २५% पर्यंत हिस्सा कमी करावा लागेल.
२००० रुपये भांडवल ते ५०० कोटी रेव्हेन्यू - प्रवास विजय सेल्सचा
नानू गुप्ता. हे नाव बऱ्याच जणांना माहित नसेल. अनेकजणांना हा थ्रेड वाचून पहिल्यांदा हे नाव माहित होईल. पण याच नानू गुप्तांनी विजय सेल्स सुरु केलं असं सांगितलं तर लिंक लागेल. #म#मराठी#VijaySales
तर हे नानू गुप्ता १९५४ साली हरयाणा सोडून मुंबईला नोकरीच्या शोधात आले. आलेल्या माणसाला आपल्यात सामावून घेते तसंच मुंबईने त्यांनाही सामावून घेतलं. शिवणयंत्र आणि फॅन्स बनवणाऱ्या ऊषा कंपनीच्या एका डिस्ट्रिब्युटरकडे नानू सेल्समन म्हणून नोकरी करू लागले. #म#मराठी#VijaySales
काही दिवस नोकरी करून नानू कस्टमर लोकांशी कसं बोलायचं, व्यवहार कसे करायचे हे शिकले. ते झाल्यावर आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हणून त्यांनी नोकरी सोडली. मित्रांकडून २००० रुपये भांडवल उधार घेऊन माटुंग्यामध्ये एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं #म#मराठी#VijaySales
हा थ्रेड काहीजणांनी इंग्रजीत वाचला असेल. पण खास आपल्या मराठी वाचकांसाठी मुद्दाम हा थ्रेड तुम्हाला समजेल अशा भाषेत मांडतो आहोत.
बाजारात एखादी अवाढव्य कंपनी असते. तिला आपला पसारा आणखी वाढवायचा असतो. त्यासाठी ती कंपनी छोट्याछोट्या कंपन्या टेकओव्हर करत जाते. #म#मराठी#एचयूएल
आपला व्यवसाय वाढवण्याची ही मार्केटमधील जुनी स्ट्रॅटेजी आहे.
नव्वदच्या दशकात हिंदुस्थान लिव्हरने (आताची एचयूएल) हीच स्ट्रॅटेजी वापरून टाटा ऑइल मिल्स कंपनी टेकओव्हर केली. #मारिको#एचयूएल
त्यामुळे टाटाचं हेअर ऑइल टाटा निहार आता हिंदुस्थान लिव्हरकडे आलं. या निमित्ताने हेअर ऑइल मार्केटमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
त्यावेळी निहार ऑइलचा मार्केट शेअर होता जेमतेम ७% आणि हेअर ऑइल मार्केटचे दादा होते, पॅराशूट ऑइल. त्यांचा मार्केट शेअर होता ४८%. #निहार
आयटीसीसारखी बलाढ्य कंपनी आपल्या प्रॉडक्टसच्या पॅकेजिंगवर किती बारीक लक्ष देते याचं एक उदाहरण.
परवा फ्लाईटमध्ये आयटीसीच्या 'बी नॅचरल' ब्रँडचा ज्यूस घेतला. ज्यूस संपवल्यानंतर साहजिकच रिकाम्या बाटलीवरील डिटेल्सवर लक्ष गेलं. तेव्हा आयटीसीच्या पॅकेजिंगमागील कल्पकता लक्षात आली. #ITC
Use the alphabets from the blanks to know that B Natural is made with 100% _ _ _ _ _ N fruit, 0% concentrate.
गोष्ट तशी छोटी आणि साधी. पण आयटीसीच्या पॅकेजिंग विभागाने यातही कल्पकता पणाला लावलेली दिसते. साहजिकच ज्युसची बाटली वापरणारा माणूस ह्या रिकाम्या जागा भरून त्यातून 'इंडिया' हा शब्द तयार करणार. #म#मराठी#ITC
इतकी वर्ष तुम्ही खात असलेली किटकॅट चॉकलेट नसून वेफर आहे.
किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. 'हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट' ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या.
मात्र १९९९ मध्ये याच किटकॅट मुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता. एवढा की किटकॅट बनवणार नेस्ले कंपनी थेट कोर्टात गेली होती.
त्यांनी किटकॅट हा वेफरचा प्रकार असून त्यावर फक्त चॉकलेटचं कोटिंग आहे असं सांगत किटकॅटला १०% टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसवलं.
टॅक्सवाले लोकसुद्धा लेचेपेचे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, 'किटकॅट हे चॉकलेट आहे ज्याच्या आतमध्ये वेफर आहे.' त्यामुळे त्याला २०% टॅक्स लागला पाहिजे. #म#मराठी
एलआयसीला जेव्हा तोटा होतो...
अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्या यांची सध्याची स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबद्दल काही न बोललेलं बरं. मात्र त्यांची एक कंपनी अशी आहे की जी बुडाल्याने स्वतः अनिल अंबानी यांच्यापेक्षा दुसऱ्या एका कंपनीचा जास्त मोठा तोटा होणार आहे. #म#मराठी#एलआयसी
ती कंपनी म्हणजे रिलायन्स कॅपिटल आणि यामध्ये तोटा होणार आहे तो म्हणजे भारतातील सर्वात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कंपनी एलआयसीचा. कसा?
एलआयसीचा रिलायन्स कॅपिटलमध्ये २.९८% स्टेक आहे. या आकडेवारीनुसार ते रिलायन्स कॅपिटलमधील सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ठरतात. #म
स्वतः अनिल अंबानी यांच्याकडे कंपनीचा १.५१% स्टेक आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सकडे कंपनीचे एकूण ५७.५३% शेअर्स आहेत.
रामकृष्ण रेड्डी चिंता यांच्याकडे कंपनीचा २.१६% स्टेक आहे तर ते डायरेक्टर असलेली कंपनी आरकेआर इन्व्हेस्टमेंटकडे १.४३% स्टेक आहे. #म#मराठी#अंबानी#रिलायन्सकॅपिटल#एलआयसी