'एक निर्णय' ज्याने डाबर साम्राज्य घडवले...
या साम्राज्याची सुरुवात १८८४ मध्ये डॉ. एस के बर्मन यांनी केली. एसकेंनी कॉलरा आणि मलेरियावर कलकत्ता येथे घरच्या घरीच औषध बनवायला सुरुवात केली. ते औषध गुणकारी ठरल्याने त्याची लोकप्रियता वाढत गेली.
मग त्यांनी बंगालमधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये आपले औषध विकायला सुरुवात केली. त्यावेळी लोक त्यांना 'डाक्टर बर्मन' म्हणत. या डाक्टर शब्दातला 'डा' आणि बर्मन मधला 'बर' एकत्र येऊन 'डाबर' असे कंपनीचे नाव झाले.
पुढे त्यांचा मुलगा सी एल बर्मन यांनी कंपनीचे स्वतःचे आर अँड डी युनिट आणि दोन मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट सुरु केले.पुढे १९३० आणि १९४० मध्ये सी एल यांची मुले पुरन आणि रतन हे व्यवसायात उतरले.एकाने मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी घेतली आणि दुसऱ्याने सेल्स, डिस्ट्रिब्युशन आणि फायनान्सची.
त्यावेळी सगळे बर्मन कुटूंबीय आपल्या कोलकत्यातील 'डाबर हाऊस' या वडिलोपार्जित घरातच रहात असत. प्रत्येक कुटूंबासाठी वेगळी खोली असली तरी या संपूर्ण कुटूंबासाठी एकच डायनिंग हॉल होता. कुटूंबातील एखादा मुलगा कळत्या वयाचा झाला,
चौथ्या पिढीतल्या विवेक यांनी तो १९६० मध्ये सर्वप्रथम तो मान मिळवला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मायामीमधून बिझनेसची डिग्री घेतली. नंतर त्यांच्या तीन चुलत भावांनी एमआयटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली आणि फिलाडेल्फिया कॉलेज ऑफ फार्मसी इथून शिक्षण घेतले.
डाबरचे अनोखे मार्केटिंग विवेक अमेरिकेतून परतल्यावर त्यांनी डाबरच्या मार्केटिंगवर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला रेडिओ आणि नंतर जेव्हा टीव्ही आले तेव्हा टीव्हीवर त्यांनी कंपनीच्या जाहिराती सुरु केल्या.
एका छोट्या विमानाच्या खालच्या बाजूला डाबर हा शब्द त्यांनी रंगवून घेतला. ज्या गावची यात्रा असेल तिथे यात्रेच्या दिवशी डाबरचे हे विमान आकाशात घिरट्या घालत असे. त्याचवेळी विमानातून डाबरच्या प्रॉडक्ट्सबद्दल माहिती देणारी पत्रके खाली टाकली जात.
लोकांना विमानाचे भलतेच अप्रूप असे.साहजिकच ते विमानातून पडणारी पत्रके गोळा करत. त्यानंतर डाबरच्या स्टॉलवर ह्या लोकांची गर्दी होऊन त्याचा विक्रीवर सकारात्मक परिणाम होत असे. विवेक यांनी याहीपुढे जाऊन काही गावांमधून अगदी हत्तीवर डाबर प्रॉडक्टसच्या जाहिराती #म#मराठी#Dabur
असलेल्या झुली टाकून मार्केटिंग केले.
पुढे बर्मन कुटुंबातीलच आनंद यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्ससमधून फार्मसीमधली पीएचडी मिळवली आणि १९८० मध्ये कंपनीच्या फार्मास्युटिकल डिव्हिजनची सुरूवात केली. त्यांचाच चुलत भाऊ अमित बर्मन याने कंपनीची पॅकेज्ड फ्रुट ज्यूस डिव्हिजन सुरु केली. #म
त्याला 'रियल' हे ब्रॅंडनेम देण्यात आले.आज रियलचा पसारा पाहता त्यावर एक वेगळं आर्टिकल लिहावे लागेल.पुढे १९९४ मध्ये डाबरने आपला आयपीओ आणला आणि कंपनी पब्लिक झाली. सगळं काही सुरळीत सुरु होतं असं वरवर तरी वाटत होतं.पण कंपनी कुठेतरी कमी पडत होती.ते बर्मन्सलादेखील लक्षात येत होतं. #म
साल - १९९८त्या वर्षात कंपनीने २०९ मिलियन डॉलर्सचा रेव्हेन्यू कमावला होता. त्याआधी चार वर्षे १९९४ मध्ये कंपनीचा आयपीओ आला होता. आयपीओ आल्यानंतर चार वर्षे झाली तरी कंपनीची मार्केट व्हॅल्यू फक्त १७९ मिलियन डॉलर्स एवढीच होती. आजतागायत कंपनीचा कारभार #म#मराठी#Dabur
कंपनीचे मालक बर्मन कुटुंबीय हाकत होते. आता काय केले पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी डाबरने मॅकेंझी या जगप्रसिद्ध कन्सल्टिंग फर्मला हायर केले. मॅकेंझीच्या विश्लेषकांनी बर्मन्सना एकच प्रश्न विचारला. #म#मराठी#Dabur
'तुमचे आडनाव बर्मन आहे म्हणून तुम्ही कंपनीचा कारभार चालवण्यासाठी पात्र ठरता का?'
या एका प्रश्नाने डाबरच्या कंपनी मॅनेजमेंटच्या डोक्यात प्रकाश पडला. तोपर्यंत बर्मन घराण्यातील चौथ्या आणि पाचव्या पिढीतील मिळून ८ जण डाबरमध्ये विविध पदांवर काम करत होते. #म#मराठी#Dabur
या आठही जणांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला. विचार करा, स्वतःच्या कंपनीत स्वतःच राजीनामा देऊन बाहेर पडणे किती अवघड ठरले असेल? पण बर्मन्सने तो कठोर निर्णय घेतला. कारण त्यांना कंपनीच्या भविष्याची चिंता होती. #म#मराठी#Dabur
कारण जसेजसे कुटुंबातील सदस्य सज्ञान होत होते तसे त्या प्रत्येकाला कंपनीत नोकरी देणे अवघड होत चालले होते. यातून निर्माण होऊ शकणारा गोंधळ, कुटुंबकलह वेगळाच. बरं या कुटूंबासदस्यांना नोकरीवरून काढूनही कसे टाकणार? त्यांचा परफॉर्मन्स वाईट असला तरी ते करणे शक्य नव्हते. #म#मराठी#Dabur
म्हणून डाबर आता प्रोफेशनल मॅनेजर्स चालवतील आणि बर्मन कुटुंबातील कोणताही सदस्य कंपनीच्या कुठल्याही पदावर असणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
बर्मन्सने काय केलं?आपापल्या पदांवरून राजीनामा दिल्यानंतर बर्मन्सने आपली एक फॅमिली कौन्सिल बनवली. #म#मराठी#Dabur
आजही दर तिमाहीत डाबरचे रिझल्ट जाहीर झाले की ह्या कौन्सिलची मिटिंग होते. आता सध्या जे बर्मन्स डाबरच्या बोर्डावर आहेत ते इतरांना सगळी माहिती देतात. बर्मन्सपैकी काही जणांचे स्वतःचे बिझनेससुद्धा आहेत. कुटूंबातील एखाद्या सदस्यांच्या बिझनेसमध्ये दुसरा सदस्य पैसे लावू इच्छित असेल #म
तर तीही चर्चा याच मिटिंगमध्ये होते. या फॅमिली कौन्सिलवर सध्या एकूण १० सीट्स आहेत. बर्मन फॅमिलीच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पिढीचे सदस्य या कौन्सिलवर आहेत. एक विशेष बाब म्हणजे या फॅमिली कौन्सिलमध्ये बर्मन घराण्यातील एकाही स्त्रीचा समावेश नाही. #म#मराठी#Dabur
स्त्रियांना या कौन्सिलमध्ये समाविष्ट कारण्याबात चर्चा सुरु होती. मात्र सध्यातरी त्याबाबत काही निर्णय घेतलेला दिसत नाही. कंपनीच्या कार्पोरेट हेडक्वार्टरपासून दूर फॅमिली कौन्सिलचे ऑफिस आहे. बर्मन्सने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे मिळालेला नफा डिव्हीडंडच्या #म#Dabur
स्वरूपात वाटायचा आणि ज्या प्रोफेशनल मॅनेजर्सना कंपनीने नोकरी दिली त्यांना स्टॉक्सच्या स्वरूपात इन्सेन्टिव्ह द्यायचा.
हे सगळं सुरळीत पार पाडण्यासाठी अर्थातच काही काळ जावा लागला. आज २३ वर्षांनंतर डाबरची वाटचाल पाहिली तर आश्चर्य वाटायला नको. #म#मराठी#Dabur
आज कंपनीची मार्केट व्हॅल्यू जवळपास १ लाख कोटी रुपये एवढी आहे. कंपनीचा महसूल ९५०० कोटींच्या घरात आहे. अर्थात हे साम्राज्य उभे करायला तब्बल १३७ वर्षांचा कालावधी जावा लागला हेही विसरून चालणार नाही. #म#मराठी#Dabur
आजकाल एक दोन महिन्यात स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक दुप्पट व्हावी या इच्छेने पैसे लावणाऱ्या नवगुंतवणूकदारांनी डाबरचा प्रवास नक्की लक्षात घ्यावा. #म#मराठी#Dabur
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
डाबर रेड - एक नवीन टूथपेस्ट ते १००० कोटींचा ब्रँड
बरीच वर्षे डाबर कंपनी त्यांची ओळख असलेली 'लाल दंतमंजन' विकत होती. त्यांनी हा मंजनचा ब्रँड बराच मोठा केला होता. या ब्रँडचे चाहतेही बरेच होते, आहेत. डाबरने जेव्हा आपला बिझनेस डायव्हर्सिफाय करायला सुरुवात केली तेव्हा #मराठी#Dabur
त्याचा एक भाग म्हणून टूथपेस्ट मार्केटमध्ये प्रवेश करायचे ठरवले. जिथे आधीपासून कोलगेटसारखा ब्रँड वर्षानुवर्षे मार्केट लीडर आहे, 'टूथपेस्ट म्हणजे कोलगेट' असं समीकरण आहे, तिथे दंतमंजन बनवणाऱ्या कंपनीने प्रवेश करणे हेच मोठे आव्हान होते. #म#मराठी#Dabur
त्याहूनही मोठे आव्हान म्हणजे या स्पर्धेत टिकून राहणे. डाबरने ते फक्त साध्यच करून दाखवले नाही तर 'डाबर रेड' हा ब्रँड १००० कोटींवर नेऊन पोहोचविला.याची सुरुवात २००१ मध्ये झाली. 'उगाच या फंदात पडू नका, प्रतिस्पर्धी तुम्हाला कच्चे खाऊन टाकतील.'अशी वॉर्निंग डाबरला देण्यात आली होती. #म
असे उभे राहिले 'जिओ'चे साम्राज्य
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ऑफिशियल लाँच सप्टेंबर २०१६ मध्ये झाले. त्याआधी एक दीड वर्षे जिओने बिटा लाँच केले होते. यावेळी रिलायन्सचे कर्मचारी, व्हेंडर्स, इतर पार्टनर्स यांना जिओचे सिमकार्ड देण्यात आले होते. #म#मराठी#Reliance
रिलायन्ससारख्या प्रचंड समूहाचे आर्थिक पाठबळ असले तरी जिओ सुरु झाली ती एक स्टार्टअप म्हणूनच. सप्टेंबर २०१६ मध्ये ते सुरुवात, सुरुवातीचे काही क्वार्टर्स लॉस आणि २०१७ च्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये थेट प्रॉफिटेबल असा जीओचा प्रवास झाला. #म#मराठी#Reliance#JioPhoneNext
केवळ १८ महिन्यांत जिओ ही स्टार्टअप प्रॉफिटेबल नक्की कशी झाली? जिओने काय केलं?
आपल्या टेलिकॉम नेटवर्कचे जाळे सबंध भारतात पसरण्यासाठी जिओने अतिशय आक्रमक नियोजन केले. हे केबल नेटवर्क टाकण्यासाठी रिलायन्सने जवळपास ६०० हॉरीझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग मशिन्सचा वापर केला. #म#Reliance
ओलाची राईड सुकर होणार का?
आठवडाभरापूर्वी ओलाने आपली बहुचर्चित इलेक्ट्रिक स्कुटर लॉंच केली. ही गाडी लाँच होण्याआधीपासूनच त्याबद्दल मीडियामधून मोठा हाईप बनवण्यात आला होता. ओला इलेक्ट्रिकचा मालक भाविश अगरवाल स्वतः या प्रोजेक्टमध्ये जातीने लक्ष घालून होता,आहे. #म#मराठी#OlaElectric
याआधी तामिळनाडूमध्ये असलेल्या आपल्या फ्युचर फॅक्टरीच्या पायाभरणीपासून ते पहिली गाडी असेम्बली लाईनवरून बाहेर पडण्यापर्यंत प्रत्येक अपडेट आपल्या भविष्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल अशी काळजी ओलाने घेतली. #म#मराठी
ओलाची गाडी मार्केटमध्ये येण्याआधी इलेक्ट्रिक गाड्या भारतीय बाजारपेठेत नव्हत्या का? तर होत्या. एथर एनर्जी, टीव्हीएस, बजाज या कंपन्या ओलाची गाडी येण्याआधी बराच काळ इलेक्ट्रिक गाड्या विकत आहेत.तरीही ओलाने अशी काही हवा केली की जणू ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कुटर असावी. #म#मराठी
गोल्डमन सॅक्स या जगातील आघाडीच्या वित्तसंस्थेने नुकताच कमोडिटीवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात त्यांनी 'कॉपर इज द न्यू ऑइल' असे म्हणत येणाऱ्या काही वर्षांत कॉपरला आणखी चांगले दिवस येऊ शकतात असे संकेत दिले आहेत. #म#मराठी
या अहवालातील काही महत्वाच्या गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न.
गेल्या काही वर्षात अनेक देश नेट झिरो इमिशनकडे पाऊल टाकताना दिसत आहेत. या नेट झिरो इमिशन या संकल्पनेचा बराच मोठा, सकारात्मक परिणाम ग्रीन मेटल्स आणि त्यातही कॉपरवर होणार आहे. #म#मराठी
नेट झिरो इमिशन म्हणजे अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर येणाऱ्या काळात वाढत जाणार. या ऊर्जा स्रोतांपासून निर्माण केली जाणारी ऊर्जा साठवणे आणि तिचे वहन करणे यासाठी कॉपर हा सर्वाधिक योग्य धातू आहे. केबल्स, बॅटरीज, ट्रान्झिस्टर्स, इन्व्हर्टर्स #म#मराठी
यह बीटा बीटा क्या है?
स्टॉक घेताना ज्या स्टॉकचा बीटा १ पेक्षा कमी आहे असे स्टॉक घ्या असे आपण बऱ्याच ठिकाणी वाचले असेल, किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराने तसे सांगितले असेल. हा बीटा म्हणजे नक्की काय? बीटाची व्हॅल्यू नक्की काय दर्शवते? हे सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न #म#मराठी
अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बीटा हे एखाद्या शेअरची मार्केटच्या तुलनेत असलेली व्होलाटीलिटी म्हणजेच अस्थिरता मोजण्याचे प्रमाण आहे. मार्केटचा बीटा १ धरला जातो आणि प्रत्येक स्टॉकची बीटा व्हॅल्यू ही मार्केटच्या तुलनेत ते किती वर खाली जाऊ शकतात यावरून ठरवली जाते. #म#मराठी
मार्केटच्या तुलनेत शेअरची मुव्हमेंट जास्त होत असेल तर बीटा १ पेक्षा जास्त असतो. हीच मुव्हमेंट मार्केटच्या तुलनेत कमी असेल तर बीटा १ पेक्षा कमी असतो. सर्वसाधारणपणे सगळेच सल्लागार लो बीटा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला देतात. #म#मराठी
भारत सरकारचे हे नवरत्न इन्व्हेस्टर्ससाठी रत्न ठरणार का?
NMDC म्हणजे National Mineral Development Corporation हा एक पीएसयू स्टॉक सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पडझडीत हा स्टॉक ६१ रुपयांपर्यंत पडला होता. #म#मराठी#NMDC
तिथून आजपर्यंत या स्टॉकने १००% हून अधिक परतावा दिला आहे.शुक्रवारी हा स्टॉक १३८ रुपयांवर बंद झाला. सध्या पीएसयू स्टॉक बरेच चर्चेत आहेत. मध्यंतरी पीएसयू बँकांनी चांगली रॅली दिली होती. त्यानंतर इतर पीएसयू स्टॉक्सनेही चांगली वाढ दिली. #म#मराठी
यातही NMDC चा उल्लेख यासाठी की या कंपनीचे प्रॉडक्ट हे आयर्न ओर म्हणजे लोखंड हे आहे.लोखंड, स्टील, साखर यांचा समावेश कमोडिटीमध्ये होतो. मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा कमोडिटी सायकल सुरू झाल्याची चर्चा आहे. #म#मराठी