डाबर रेड - एक नवीन टूथपेस्ट ते १००० कोटींचा ब्रँड
बरीच वर्षे डाबर कंपनी त्यांची ओळख असलेली 'लाल दंतमंजन' विकत होती. त्यांनी हा मंजनचा ब्रँड बराच मोठा केला होता. या ब्रँडचे चाहतेही बरेच होते, आहेत. डाबरने जेव्हा आपला बिझनेस डायव्हर्सिफाय करायला सुरुवात केली तेव्हा #मराठी#Dabur
त्याचा एक भाग म्हणून टूथपेस्ट मार्केटमध्ये प्रवेश करायचे ठरवले. जिथे आधीपासून कोलगेटसारखा ब्रँड वर्षानुवर्षे मार्केट लीडर आहे, 'टूथपेस्ट म्हणजे कोलगेट' असं समीकरण आहे, तिथे दंतमंजन बनवणाऱ्या कंपनीने प्रवेश करणे हेच मोठे आव्हान होते. #म#मराठी#Dabur
त्याहूनही मोठे आव्हान म्हणजे या स्पर्धेत टिकून राहणे. डाबरने ते फक्त साध्यच करून दाखवले नाही तर 'डाबर रेड' हा ब्रँड १००० कोटींवर नेऊन पोहोचविला.याची सुरुवात २००१ मध्ये झाली. 'उगाच या फंदात पडू नका, प्रतिस्पर्धी तुम्हाला कच्चे खाऊन टाकतील.'अशी वॉर्निंग डाबरला देण्यात आली होती. #म
बरं ही वॉर्निंग मॅकेंझीसारख्या मोठ्या फर्मने दिली होती. डाबरने सुरुवात केली, 'तुमची पावडर आता पेस्ट म्हणून येणार' या टॅगलाईनने. डाबरचे ग्राहक टूथपेस्ट वापरण्यासाठी अर्थातच तयार होते. मात्र कोलगेटशी टक्कर घेणे तितके सोपे नव्हते. कोलगेटचा कस्टमर बेस रेडी होता. #म#मराठी#Dabur
त्यांना फक्त एखादे नवे प्रॉडक्ट लाँच करून आपल्या कस्टमर्सला काहीतरी वेगळे देऊन आपल्याकडेच टिकवायचे होते.डाबरला मात्र इतर ब्रँडसच्या कस्टमर्सना आपल्याकडे वळवायचे होते.
डाबरला आपल्या ब्रँडवर विश्वास होता.याआधी जवळपास ७० वर्षे १९३० पासून ते आपली दंतमंजन विकत होते. #म#मराठी#Dabur
पण टूथपेस्ट मार्केट आणि पावडर मार्केट यात जमीन अस्मानाचा फरक होता. सगळ्यात महत्वाचे म्हणजेच डाबरला एका मोठ्या प्रॉब्लेमचे उत्तर शोधायचे होते?डाबर दंतमंजनमधील आयुर्वेदिक घटकांमुळे ती दात घासून थुंकल्यावर त्याचे डाग पडत. जेव्हा पावडर जाऊन पेस्ट आली तेव्हा त्यातले घटक #मराठी#Dabur
तेच राहिले. त्यामुळे पेस्ट वापरल्यानंतरही त्याचे डाग पडू लागले. यावर उपाय म्हणून डाबरने पेस्टचा रंग लालऐवजी पांढरा करता येईल का? याची चाचपणी केली. अर्थात ते केले म्हणजे 'डाबर रेड' हे नावच वापरता आले नसते. त्यामुळे शेवटी बरेच संशोधन होऊन अखेरीस 'डाबर रेड' बनली. #म#मराठी#Dabur
डाबरने पहिल्या वर्षी विक्रीचे टारगेट अगदी छोटे म्हणजे ५ कोटींचे ठेवले होते. मात्र अनपेक्षितपणे ह्या ब्रॅंडने एक वर्षात १५ कोटींचा विक्रीचा आकडा गाठला.
लाँचनंतर पुढची काहीवर्षे तरी डाबर रेड ब्रँड चांगला वाढला. एफएमजीसी सेक्टर असा आहे की कंपनीला सातत्याने #म#मराठी#Dabur
ग्राहकांना काहीतरी नवीन द्यावे लागते. हे नाही केले तर ब्रँड इतरांच्या स्पर्धेत मागे पडत जातो. साधारण २००८ मध्ये डाबरच्या बाबतीत असेच काहीसे घडू लागले. मात्र कंपनी मॅनेजमेंट सतर्क होते. त्यांनी डाबर विकायची भाषा बदलली. तुमच्या दातांना काही झाले तर डाबर रेडमध्ये #म#मराठी#Dabur
असे घटक आहेत की इतर ब्रँडच्या टूथपेस्टच्या तुलनेत आमची पेस्ट तुम्हाला अधिक उपयोगी पडेल अशी कॅम्पेन कंपनीने राबवली.विविध शाळांमध्ये प्रमोशन करून लहान मुलांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले.मोठ्या माणसांना डाबर रेडकडे आकर्षित करून घेण्यासाठी कंपनीने आणखी एक कॅम्पेन राबवली.#मराठी
तुमची जुनी पांढरी टूथपेस्ट घेऊन या आणि डाबर रेड घेऊन जा, अशी ती कॅम्पेन होती. याशिवाय पांढऱ्या टूथपेस्टमध्ये खडू असतो. तुम्हाला दात घासायला खडू हवाय की डाबर रेड? अशी एक कॅम्पेनसुद्धा डाबरने राबवली. यामधून डाबर थेट टूथपेस्ट मार्केटचा दादा कोलगेटसोबत टक्कर घेत होते. #मराठी#Dabur
आपण यात यशस्वी होऊ याची कंपनीला खात्री होती हे इथे नमूद करावे लागेल. या सगळ्याच्या जोरावर डाबर रेडचा मार्केट शेअर २०१०-११ मधील ३.७% वरून २०१३-१४ मध्ये ४.६% पर्यंत जाऊन पोहोचला.
हा आनंद साजरा करतायत तोच टूथपेस्ट मार्केटमध्ये नवा खिलाडी आला. नुसता आलाच नाही येताना #म#मराठी#Dabur
एक मोठे वादळ घेऊन आला. तो खिलाडी म्हणजे पतंजली. पतंजली टूथपेस्ट मार्केटमध्ये येण्याआधी हर्बल, नॅचरल, आयुर्वेदिक टूथपेस्ट ब्रँडचा एकूण वाटा साधारण २% होता. आजघडीला हा वाटा ३०% एवढा आहे. म्हणजे पतंजलीच्या येण्याने डाबर रेडचा एकप्रकारे फायदाच झाला. #म#मराठी#Dabur
त्यात पतंजली एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट्स घेऊन आले. टूथपेस्ट हा त्यांच्यासाठी तुलनेने कमी महत्वाचा प्रॉडक्ट होता. शिवाय वेगळे असे देण्यासारखे त्यांच्याकडे फारसे काही नव्हते. मग पतंजली वापरणाऱ्या ग्राहकांना पर्याय होता तो डाबर रेडचा. पतंजलीच्या कमी होणाऱ्या मार्केट #म#मराठी#Dabur
शेअरचा फायदा डाबर रेडला झाला. २०१५ मध्ये १२% ते आता जवळपास १७% एवढा डाबर रेडचा मार्केट शेअर आहे. या दरम्यान कोलगेटचा मार्केट शेअर ६०% वरून ४८-४९% पर्यंत खाली आलाय हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतीय टूथपेस्ट मार्केटमध्ये डाबर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. #म#मराठी#Dabur
डाबरचे ९ ब्रँड असे आहेत ज्यांना 'पॉवर ब्रँड' असे संबोधले जाते. च्यवनप्राश, हनी, हनीटस, लाल तेल, पुदिन हरा, आमला हेअर ऑइल, वाटिका आणि रियल ज्यूस हे ते ब्रँड. डाबरच्या एकूण सेल्समध्ये ७०% हून अधिक वाटा या नऊ पॉवर ब्रॅण्ड्सचा आहे. #म#मराठी#Dabur
या सगळ्या ब्रँडची २०१९-२० मध्ये ०.२% ने ग्रोथ झाली. त्या तुलनेत डाबर रेड मात्र ४% रेटने वाढला. एप्रिल ते जून २०२१ या काळात भारतात टूथपेस्ट कॅटेगरीची वाढ २.६% ने झाली पण डाबर रेड मात्र तब्बल ८.१% ने वाढला. डाबरच्या ऍन्युअल रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात #म#मराठी#Dabur
डाबर रेडच्या रेव्हेन्यूमध्ये २५.५% ची वाढ झाली. यात भर म्हणून डाबर रेडच्या जोडीला आता कंपनीने दंत रक्षक नावाचा ब्रँड लाँच केला आहे. याद्वारे कंपनी पतंजलीबरोबर टक्कर घेते आहे. डाबर रेडची किंमत १०० ग्रॅमसाठी ५० रुपये होती. पतंजली मात्र १०० ग्रॅमसाठी ४० रुपये आकारायचे. #म#मराठी
आता त्याला टक्कर द्यायला दंत रक्षक ब्रँड लाँच केला आहे. ही टूथपेस्ट लाँच करताना डाबरने आपली जुनीच स्टॅटेजी वापरली. ग्राहक आपली जुनी टूथपेस्ट देऊन त्या बदल्यात डाबर दंत रक्षक टूथपेस्ट फुकटात घेऊन जाऊ शकत होते.
डाबर रेड या नावाचाही एकप्रकारे ब्रँडला फायदा झाला. #म#मराठी#Dabur
सुप्रसिद्ध ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट हरीश बिजूर याचे कारण स्पष्ट करतात. लाल रंगात याचे गुपित दडले आहे. लाल रंगातून कुठेतरी कष्ट करणाऱ्यांचा रंग असा संदेश दिला जातो. लाल हा सामान्य जनतेचा रंग आहे असे कुठेतरी वाटते. आपल्याकडे रेड लेबल टी आहे ज्याच्या नावात रेड आहे. #Dabur
एव्हरेडी बॅटरीजमध्ये लाल रंग आहे.लाईफबॉय साबणात लाल रंग आहे.हे तिन्ही ब्रँड सामान्य जनतेचे,फारसे महाग,प्रीमियम न वाटणारे असे ब्रँड आहेत.डाबर रेडला याचाच फायदा झाला.याशिवाय बदलत्या डिजीटल युगातही डाबर मागे राहिलेले नाही. फक्त डाबर रेडसाठी कंपनीकडून दर आठवड्याला #Dabur#म#मराठी
एक व्हिडीओ लाँच केला गेला. यातून ह्या ब्रँडला जवळपास १५० कोटी इंप्रेशन्स मिळाले.याशिवाय चौबेजीची जाहिरात,चबाते रहो कॅम्पेन,देश का लाल कॅम्पेन यामुळे ब्रँड सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. कुंभमेळ्यामध्ये डाबरने 'डाबर रेड पेस्ट दंत स्नान झोन' तयार करून तिथे फ्री #म#मराठी#Dabur
टूथपेस्ट डिस्पेन्सर बसवले होते.यातून अगदी साधू लोकांपर्यंत पोहोचण्यात ब्रँडने यश मिळवले.डाबरने रेडसोबत आधी असलेल्या मिस्वाक,बबूल ब्रँडसोबत डाबर क्लोव्ह,तुलसी आणि निमअसेही टूथपेस्टचे ब्रँड लाँच केले आहेत.सध्या हे ब्रँड दक्षिण भारत जी डाबरची पारंपरिक बाजारपेठ आहे #मराठी#Dabur
तिथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जात आहेत. याशिवाय डाबरने गेल्यावर्षी भारताचे पहिले आयुर्वेदिक माऊथवॉशसुद्धा लाँच केले. आजघडीला डाबर मिस्वाक हा ब्रँड १०० कोटींच्या घरात पोहोचला आहे तर डाबर रेड हा तब्बल १००० कोटींचा ब्रँड झाला आहे. #म#मराठी#Dabur
लाँच करताना मॅकेंझीने दिलेली वॉर्निंग ऐकून डाबरने टूथपेस्ट आणली नसती तर? पण कंपनी मॅनेजमेंटला आपल्या प्रॉडक्टवर, आपल्या ग्राहकांवर विश्वास होता. त्याला पूरक अशा स्ट्रॅटेजी आखून वेळोवेळी ब्रँड वाढवण्याचे मोठे काम त्यांनी साध्य केले. #म#मराठी#Dabur
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
असे उभे राहिले 'जिओ'चे साम्राज्य
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ऑफिशियल लाँच सप्टेंबर २०१६ मध्ये झाले. त्याआधी एक दीड वर्षे जिओने बिटा लाँच केले होते. यावेळी रिलायन्सचे कर्मचारी, व्हेंडर्स, इतर पार्टनर्स यांना जिओचे सिमकार्ड देण्यात आले होते. #म#मराठी#Reliance
रिलायन्ससारख्या प्रचंड समूहाचे आर्थिक पाठबळ असले तरी जिओ सुरु झाली ती एक स्टार्टअप म्हणूनच. सप्टेंबर २०१६ मध्ये ते सुरुवात, सुरुवातीचे काही क्वार्टर्स लॉस आणि २०१७ च्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये थेट प्रॉफिटेबल असा जीओचा प्रवास झाला. #म#मराठी#Reliance#JioPhoneNext
केवळ १८ महिन्यांत जिओ ही स्टार्टअप प्रॉफिटेबल नक्की कशी झाली? जिओने काय केलं?
आपल्या टेलिकॉम नेटवर्कचे जाळे सबंध भारतात पसरण्यासाठी जिओने अतिशय आक्रमक नियोजन केले. हे केबल नेटवर्क टाकण्यासाठी रिलायन्सने जवळपास ६०० हॉरीझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग मशिन्सचा वापर केला. #म#Reliance
'एक निर्णय' ज्याने डाबर साम्राज्य घडवले...
या साम्राज्याची सुरुवात १८८४ मध्ये डॉ. एस के बर्मन यांनी केली. एसकेंनी कॉलरा आणि मलेरियावर कलकत्ता येथे घरच्या घरीच औषध बनवायला सुरुवात केली. ते औषध गुणकारी ठरल्याने त्याची लोकप्रियता वाढत गेली.
मग त्यांनी बंगालमधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये आपले औषध विकायला सुरुवात केली. त्यावेळी लोक त्यांना 'डाक्टर बर्मन' म्हणत. या डाक्टर शब्दातला 'डा' आणि बर्मन मधला 'बर' एकत्र येऊन 'डाबर' असे कंपनीचे नाव झाले.
पुढे त्यांचा मुलगा सी एल बर्मन यांनी कंपनीचे स्वतःचे आर अँड डी युनिट आणि दोन मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट सुरु केले.पुढे १९३० आणि १९४० मध्ये सी एल यांची मुले पुरन आणि रतन हे व्यवसायात उतरले.एकाने मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी घेतली आणि दुसऱ्याने सेल्स, डिस्ट्रिब्युशन आणि फायनान्सची.
ओलाची राईड सुकर होणार का?
आठवडाभरापूर्वी ओलाने आपली बहुचर्चित इलेक्ट्रिक स्कुटर लॉंच केली. ही गाडी लाँच होण्याआधीपासूनच त्याबद्दल मीडियामधून मोठा हाईप बनवण्यात आला होता. ओला इलेक्ट्रिकचा मालक भाविश अगरवाल स्वतः या प्रोजेक्टमध्ये जातीने लक्ष घालून होता,आहे. #म#मराठी#OlaElectric
याआधी तामिळनाडूमध्ये असलेल्या आपल्या फ्युचर फॅक्टरीच्या पायाभरणीपासून ते पहिली गाडी असेम्बली लाईनवरून बाहेर पडण्यापर्यंत प्रत्येक अपडेट आपल्या भविष्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल अशी काळजी ओलाने घेतली. #म#मराठी
ओलाची गाडी मार्केटमध्ये येण्याआधी इलेक्ट्रिक गाड्या भारतीय बाजारपेठेत नव्हत्या का? तर होत्या. एथर एनर्जी, टीव्हीएस, बजाज या कंपन्या ओलाची गाडी येण्याआधी बराच काळ इलेक्ट्रिक गाड्या विकत आहेत.तरीही ओलाने अशी काही हवा केली की जणू ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कुटर असावी. #म#मराठी
गोल्डमन सॅक्स या जगातील आघाडीच्या वित्तसंस्थेने नुकताच कमोडिटीवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात त्यांनी 'कॉपर इज द न्यू ऑइल' असे म्हणत येणाऱ्या काही वर्षांत कॉपरला आणखी चांगले दिवस येऊ शकतात असे संकेत दिले आहेत. #म#मराठी
या अहवालातील काही महत्वाच्या गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न.
गेल्या काही वर्षात अनेक देश नेट झिरो इमिशनकडे पाऊल टाकताना दिसत आहेत. या नेट झिरो इमिशन या संकल्पनेचा बराच मोठा, सकारात्मक परिणाम ग्रीन मेटल्स आणि त्यातही कॉपरवर होणार आहे. #म#मराठी
नेट झिरो इमिशन म्हणजे अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर येणाऱ्या काळात वाढत जाणार. या ऊर्जा स्रोतांपासून निर्माण केली जाणारी ऊर्जा साठवणे आणि तिचे वहन करणे यासाठी कॉपर हा सर्वाधिक योग्य धातू आहे. केबल्स, बॅटरीज, ट्रान्झिस्टर्स, इन्व्हर्टर्स #म#मराठी
यह बीटा बीटा क्या है?
स्टॉक घेताना ज्या स्टॉकचा बीटा १ पेक्षा कमी आहे असे स्टॉक घ्या असे आपण बऱ्याच ठिकाणी वाचले असेल, किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराने तसे सांगितले असेल. हा बीटा म्हणजे नक्की काय? बीटाची व्हॅल्यू नक्की काय दर्शवते? हे सोप्या भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न #म#मराठी
अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बीटा हे एखाद्या शेअरची मार्केटच्या तुलनेत असलेली व्होलाटीलिटी म्हणजेच अस्थिरता मोजण्याचे प्रमाण आहे. मार्केटचा बीटा १ धरला जातो आणि प्रत्येक स्टॉकची बीटा व्हॅल्यू ही मार्केटच्या तुलनेत ते किती वर खाली जाऊ शकतात यावरून ठरवली जाते. #म#मराठी
मार्केटच्या तुलनेत शेअरची मुव्हमेंट जास्त होत असेल तर बीटा १ पेक्षा जास्त असतो. हीच मुव्हमेंट मार्केटच्या तुलनेत कमी असेल तर बीटा १ पेक्षा कमी असतो. सर्वसाधारणपणे सगळेच सल्लागार लो बीटा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असा सल्ला देतात. #म#मराठी
भारत सरकारचे हे नवरत्न इन्व्हेस्टर्ससाठी रत्न ठरणार का?
NMDC म्हणजे National Mineral Development Corporation हा एक पीएसयू स्टॉक सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पडझडीत हा स्टॉक ६१ रुपयांपर्यंत पडला होता. #म#मराठी#NMDC
तिथून आजपर्यंत या स्टॉकने १००% हून अधिक परतावा दिला आहे.शुक्रवारी हा स्टॉक १३८ रुपयांवर बंद झाला. सध्या पीएसयू स्टॉक बरेच चर्चेत आहेत. मध्यंतरी पीएसयू बँकांनी चांगली रॅली दिली होती. त्यानंतर इतर पीएसयू स्टॉक्सनेही चांगली वाढ दिली. #म#मराठी
यातही NMDC चा उल्लेख यासाठी की या कंपनीचे प्रॉडक्ट हे आयर्न ओर म्हणजे लोखंड हे आहे.लोखंड, स्टील, साखर यांचा समावेश कमोडिटीमध्ये होतो. मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा कमोडिटी सायकल सुरू झाल्याची चर्चा आहे. #म#मराठी