ज्यांना #COVID19 चे आरोग्यविषयक आणि आर्थिक दुष्परिणाम सोसावे लागले त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करून केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांच्याकडून #Budget2022 सादर करण्यास सुरुवात
चालू वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच्च, 9.2% अपेक्षित आहे
#Budget2021 चा दृष्टिकोन जारी राखत, #Budget2022 येत्या 25 वर्षाच्या अमृत काळासाठी, स्वतंत्र भारताच्या 75 ते 100 व्या वर्षापर्यंत अर्थव्यवस्थेला मार्गदर्शन करण्याचा पाया घालणारा आहे
आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना बळकटी, #Vaccination कार्यक्रमाची गतिमान अंमलबजावणी आणि #COVID19#Pandemic च्या सध्याच्या लाटेचा देशभरात चिवटपणे केलेला सामना सर्वांनी पाहिला आहे
2021-22च्या रब्बी हंगामात गव्हाची आणि 2021-22च्या खरीप हंगामात धानाची अशी 1208 लाख मेट्रिक टन गहू आणि धानाची 163 लाख शेतकऱ्यांकडून खरेदी होईल असा अंदाज आहे
एमएसपीचे सुमारे 2.37 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतील
-वित्तमंत्री
कृषी
पीक मूल्यमापन, जमिनीच्या नोंदीचे डिजिटायझेशन आणि कीटकनाशके आणि पोषकद्रव्ये फवारणीसाठी किसान ड्रोन च्या वापराला प्रोत्साहन देणार
पूर्व किनारपट्टीवर ₹ 44,605 कोटी खर्चाच्या केन-बेतवा लिंकिंग प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल
9लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा, 62लाख लोकांना पिण्याचेपाणी, 103मेगावॉट जलविद्युतनिर्मिती आणि 27मेगावॉट सौरउर्जानिर्मिती ही प्रकल्पाची उद्दिष्टे-अर्थमंत्री
पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांना प्रादेशिक भाषांमध्ये पूरक शिक्षण देणे सर्व राज्यांना शक्य व्हावे यासाठी पीएम-ई विद्या च्या वन क्लास वन टीव्ही चॅनेल कार्यक्रमाची व्याप्ती 12 वरून 200 टीव्ही चॅनेल पर्यंत वाढवणार
दमणगंगा-पिंजाळ,पार- तापी-नर्मदा, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार आणि पेन्नार-कावेरी या 5 नदीजोड प्रकल्पांच्या डीपीआरचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. संबंधित राज्यांमधील लाभार्थ्यांमध्ये सहमती झाली की केंद्राकडून पाठबळ पुरवले जाईल-अर्थमंत्री
2023 मध्ये @RBI कडून #blockchain चा वापर करून डिजिटल रुपी सुरू करण्यात येणार
#DigitalCurrency मुळे अधिक स्वस्त आणि कार्यक्षम चलन व्यवस्थापन प्रणाली निर्माण होईल
गेल्या काही वर्षात डिजिटल बँकिंग आणि फिन -टेक नवोन्मेषामध्ये वेगाने वृद्धी; देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी शेड्युल वाणिज्यिक बँका देशाच्या 75 जिल्ह्यात 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करणार
महिला आणि बालकांना एकात्मिक लाभ देण्यासाठी अलीकडेच मिशनशक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना सुरू करण्यात आल्या. सक्षम अंगणवाड्या खूप लहान बाल्यावस्थेतील विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करून देत आहेत.
5G मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी 2022मध्ये स्पेक्ट्रमचे लिलाव करण्यात येतील. पीएलआय योजनेचा भाग म्हणून 5Gसाठी अतिशय भक्कम परिसंस्था उभारण्याकरिता रचना आधारित उत्पादन योजना सुरू करण्यात येईल
#AatmaNirbharBharat ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षणविषयक साधनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील भांडवली खरेदीच्या 68% भाग देशांतर्गत उद्योगांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
राज्यांना अनुदान आणि मदतीच्या माध्यमातून भांडवली मालमत्तांच्या निर्मितीच्या तरतुदीसह एकत्रितपणे केंद्र सरकारचा 2022-23 मधील एकूण भांडवली खर्च रु. 10.68 लाख कोटी म्हणजे जीडीपीच्या सुमारे 4.1% असेल
जानेवारी 2022 साठी जीएसटी सकल संकलन 140986 कोटी रुपये राहिले, जीएसटी प्रणालीचा स्वीकार केल्यापासूनचे हे सर्वाधिक संकलन आहे; #COVID19 नंतर अर्थव्यवस्था वेगाने सावरू लागल्याने हे शक्य झाले
केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत समानता रहावी यासाठी राज्य सरकारच्या एनपीएस खात्यासाठी नियोक्त्याच्या योगदानासाठीची कर वजावट मर्यादा वाढवून 10% वरून 14% करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक सुरक्षा लाभात वाढ होईल
- अर्थमंत्री
करदात्यांना अतिरिक्त कराचा भरणा केल्यावर अद्ययावत विवरणपत्र दाखल करण्याची परवानगी देण्याची नवी तरतूद मी प्रस्तावित करत आहे. अद्ययावत विवरणपत्र संबंधित मूल्यमापन वर्षाच्या अखेरीपासून 2 वर्षांच्या आत दाखल करता येऊ शकेल-अर्थमंत्री #AatmanirbharBharatKaBudget
व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेवरील कर आकारणीसाठी मी असे प्रस्तावित करते की कोणत्याही व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाद्वारे प्राप्त उत्पन्नावर 30% दराने कर आकारला जाईल
'#COVID19 च्या तिसऱ्या लाटे बाबत मूलभूत तथ्ये' या आमच्या वेबिनार मध्ये सहभागी व्हा.
@icmr_niv संचालक प्रा.प्रिया अब्राहम आणि डॉक्टर @RajeevJayadevan आपले प्रश्न आणि शंकाचे समाधान करतील.
कृपया आपले प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा
🎥
#COVID19 संदर्भात एका राज्यातल्या उत्तम पद्धतीचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे, यासाठी इतर राज्यांसमवेत त्या सामायिक करत केंद्र सरकारने एकप्रकारे मध्यस्थाची भूमिका बजावली
-मनीष देसाई, महासंचालक, पश्चिम विभाग @MIB_India यांची महामारीविरोधातील लढ्यात सरकारच्या प्रयत्नांविषयी माहिती
*⃣New Cases - 18,067
*⃣Recoveries - 36,281
*⃣Deaths - 79
*⃣Active Cases - 1,73,221
*⃣Total Cases till date - 77,53,548
*⃣Total Recoveries till date - 74,33,633
*⃣Total Deaths till date - 1,42,784
*⃣Tests till date - 7,49,51,750
*⃣New Cases - 14,372
*⃣Recoveries - 30,093
*⃣Deaths - 94
*⃣Active Cases - 1,91,524
*⃣Total Cases till date - 77,35,481
*⃣Total Recoveries till date - 73,97,352
*⃣Total Deaths till date - 1,42,705
*⃣Tests till date - 7,47,82,391
एखादे चलन केंद्रीय बँकेने जारी केल्यानंतरच चलन ठरते अगदी #Crypto असेल तरी, @RBI कडून यावर्षी #DigitalCurrency जारी करण्यात येईल, याबाहेरील सर्व काही हे व्यक्तींकडून निर्माण होणारी मालमत्ता आहे, अशा व्यवहारातून (क्रिप्टो विश्वासह) होणाऱ्या नफ्यावर 30% कराची आकारणी होईल-अर्थमंत्री