मोकळ्या हवेत येताच अराजकतेचे तीर सोडणाऱ्या मेहबूबांना हा इतिहास ठाऊकही नसेल!!

आपल्याला ठाऊक आहे का?!

आर्यावर्तात एक जनपद होतं. तिथल्या राजाला कंसवधानंतर जरासंधाकडून पाचारण करण्यात आलं. उद्देश होता कृष्णवधाचा. जनपदाचा राजा असलेल्या गोनंदाने कृष्णाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले.
मात्र कृष्णबंधू बलरामाने हे आव्हान स्वीकारले आणि गोनंदाचा वध केला. गोनंदाला पुत्र नसल्याने त्याचा भाऊ दामोदर हा गादीवर आला. पुढे कृष्ण गांधारप्रदेशात जात असताना त्याने आपल्या भावाच्या वधाचा प्रतिशोध घेण्यासाठी द्वंद्व जाहीर केले. यावेळेस मात्र स्वतः भगवंतांनी दामोदराचा वध केला.
जनपद पुन्हा प्रशासक विरहित झाल्याने तिथल्या नागरिकांनी श्रीकृष्णांना विनंती केली की आपणच आमचे पालन करा. यावर श्रीकृष्णांनी म्हटलं; "हे द्वंद्व मी केवळ क्षत्रिय धर्माचं पालन म्हणून केलं. त्यात राज्य जिंकण्याची महत्वाकांक्षा नव्हती." दामोदर राजाची पत्नी यशोवती ही गर्भवती होती.
कृष्णांनी तिला राजगादी सांभाळण्यास सांगितले. पुढे तिने जन्म दिलेल्या बालकाचे नामकरण गोनंद असे करण्यात आले. आणि तो बाल्यावस्थेतच राजा झाला.

महाभारतीय युद्धांत आर्यावर्तातील सर्व प्रमुख जनपदांचा सहभाग होता मात्र या जनपदाला त्यात जाणीवपूर्वक सामील करण्यात आले नाही.
कारण एकच......तिथला राजा बाल्यावस्थेत असल्याने त्यांना युद्धात सामील करणे हे राजनीतीच्या नैतिकतेत बसणारे नव्हते. ही सारी कथा मुनी वैशंपायन यांनी परीक्षितपुत्र महाराज जन्मेजय यांना कथन केली आहे. हा वृत्तांन्त शब्दबद्ध केला आहे तो नीलमत पुराण आणि कल्हणकृत राजतरंगिणी या ग्रंथांत.
या जनपदाचे नाव आहे काश्मीर! काश्मीर; कश्यप ऋषींच्या नावावर नामकरण करण्यात आलेले आर्यावर्तातील एक जनपद. महाभारत काळापासूनच तिथल्या जनतेविषयी इतका उदार विचार आम्ही केला आहे. काश्मीरी जनतेचं सुख आणि त्यांची समृद्धी यांचा विचार अनादि काळापासून करत आलेले लोकच त्यांची भरभराट करू शकतात.
आझादीचे बिगुल वाजवणाऱ्यांनी हेच लक्षात घेण्याची गरज आहे. काश्मीर हिंदुस्थानचे अविभाज्य अंग आहे.....अनंत काळापर्यंत राहील!!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dr. Pareexit Shevde

Dr. Pareexit Shevde Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @DrPareexitS

14 May
धर्मवीर:

- रामसिंगला लिहिलेल्या पत्रात 'आम्ही हिंदू सत्वशून्य झालो आहोत काय?' इ. अनेक धर्माभिमानाचे उल्लेख.

- जागोजागी देवस्थानांना वर्षासने, दानपत्रे.

- चाफळच्या रामजन्मोत्सवास आक्रमकांकडून उपद्रव होऊ नये यासाठी संरक्षण आदेश.

- बुधभूषण ग्रंथात धर्मशास्त्राचे अनेक दाखले. +
- 'आता हे राज्य हिंदूंचे जाहले' असा अंत्रुजच्या शिलालेखात स्पष्ट उल्लेख.

- पोर्तुगीजांशी तह करताना 'आमच्या लोकांस धर्मांतरित करता येणार नाही.' असे कलम.

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेले देशी गायींचा चाऱ्याचा सारा न घेण्याचे धोरण पुढे सुरू ठेवणे. +
- 'म्लेंच्छक्षयदीक्षित' म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवास्पद उल्लेख करणे.

- औरंगजेबचा 'यवनाधम' म्हणून उल्लेख करत तो गायी मारतो आणि मंदिरे भ्रष्ट करतो याबाबत संताप व्यक्त करणे. +
Read 8 tweets
9 Apr
@CMOMaharashtra @OfficeofUT @uddhavthackeray

उद्धवजी…...केवळ १० मिनिटे देऊ शकाल?

देशातील तीन राज्यांत #कोविड19 पासून लढण्यात अधिकृतपणे आयुर्वेदाची मदत घेण्यास सुरुवात झाली आहे. सदर राज्यांत शासनाद्वारे वेगवेगळ्या पातळीवर हे काम सुरू झाले आहे; ही अत्यंत समाधानाची बाब.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने यासंबंधी प्रत्येक राज्याला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील आता केंद्राची वाट न बघत बसता याबाबत निर्णय घ्यावा. मा. मुख्यमंत्री महोदयांनी केवळ १० मिनिटे दिल्यास हा संपूर्ण विषय; संदर्भ-आकडेवारीसह+
काही निवडक वैद्यांना सोबत घेऊन मी स्वतः मांडण्यास तयार आहे. अन्य कोणताही मार्ग न दिसत असल्याने आणि आता अधिक वेळ दवडणे योग्य नसल्याने नाईलाजाने सोशल मीडियाचा मार्ग निवडत आहे. मला खात्री आहे; खुद्द मा. मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय पोहचल्यास ते १० मि. आयुर्वेदाकरता नक्की देतील.
Read 5 tweets
16 Jan
समर्थांनी आम्हाला काय दिलं?

नियमित बलोपासना करण्याची शिकवण दिली.

'कोण पुसे अशक्ताला | रोगीसे बराडी दिसे |
कळा नाही कांती नाही | युक्ती बुद्धी दुरावली ||' +
प्रयत्न करणाऱ्याला साक्षात देव मदत करतो; हा धीर दिला.

'सदा सर्वदा देव सन्निध आहे। कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।'
आचार-विचारांची शुद्धता दिली.

'मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे ।।'

मूर्खलक्षणे सांगितली!

'आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥'
Read 9 tweets
15 Jun 19
"या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य नाही" 

- कृष्णाजी अनंत सभासद

महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी #शिवराज्याभिषेक करण्यास नकार दिला/विरोध केला हे धादांत असत्य. कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.

उलटपक्षी; १/क्ष
३५० वर्षे एकही हिंदू राजा न झाल्याने समग्र राज्याभिषेक विधी येथील ब्राह्मणांना ज्ञात नसल्याने तसेच समर्थ रामदास स्वामींनी गागाभट्ट यांचे नाव सुचवल्याने त्यांना #शिवराज्याभिषेक_सोहळा पार पाडण्यास पाचारण करण्यात आले.

(संदर्भ: भट्टवंश)
गागाभट्टांचे मूळ हे आपल्याच मातीतले; महाराष्ट्रातील पैठण इथले!! रामेश्वरशास्त्री भट्ट हे गागाभट्टांचे पणजोबा. ते द्वारकेच्या यात्रेला गेले आणि त्यानंतर पुढे कशी येथे स्थायिक झाले. अतिशय विद्वान असे हे घराणे.
Read 9 tweets
21 Jul 18
#thread

A classic case how #Ayurveda is being defamed deliberately and how rumours are spread intentionally.
@DrShrinidh @ViIlageldiot
@DrSamarthk

How an Ayurvedic tonic caused severe liver disease in a farmer who never drank alcohol.
scroll.in/pulse/886955/h… via @scroll_in
First of all; Dashamoolaristam (the accused medicine in the write-up) isn't used as 'digestive' in #Ayurveda It is primely used in Vata diseases. It contains self generated alcohol which is different than the distilled one.
Here mentioned farmer is said to be taking 4-5 ounces (approx 148 ml) four times a day which makes it around 592 ml a day!

Theraputic dose of the same is 10-20 ml twice a day.

So in this case; it was consumed in around 15 times more quantity than the expected!
Read 8 tweets
8 Nov 17
#Thread : #diabetes & rice

Study conducted by the International Rice Research Institute (IRRI) and the University of Queensland says, #Diabetic patients may consume Indian varieties of rice like Swarna, Mahsuri as they have low GI.

#DiabetesMonth
#SwasthaBharat
Rice variety like brown rice could be consumed by #Diabetic patients as well. This is customary in many parts of southern India.

#DiabetesMonth
#SwasthaBharat
Traditionally Indians consume aged rice; which has low GI as compared to the new one. If you consuming new rice grain; just roast it a bit before cooking. It makes it easy to digest says #Ayurveda. The process also helps reducing the GI.

#DiabetesMonth
#SwasthaBharat
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!