छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळते. #सरपंच, #उपसरपंच, #ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला #ग्रामपंचायत म्हणतात.
कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या ठरते :
६०० ते १५०० - ७ सभासद
१५०१ ते ३००० - ९ सभासद
३००१ ते ४५०० - ११ सभासद
४५०१ ते ६००० - १३ सभासद
६००१ ते ७५०० - १५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद असता
निवडणूक - राज्य निवडणूक आयोग ही निवडणुक पार पाडते 👇
ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :
👉 भारताचा नागरिक असावा.
👉 २१ वर्ष पूर्ण झालेली असावीत.
👉 गावच्या मतदान यादीत नाव असावे.
सरपंच व उपसरपंच यांची निवड :
निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच ची निवड पहिल्या सभेच्या वेळी केली जाते.
👇
मुख्य कामे :
👉 ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
👉 ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
👉 कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणे.
👉 ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
👇
👉 व्हिलेज फंड सांभाळणे.
👉 ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
👉 ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
👉 गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
👉 जन्म-मृत्यूची नोंद करणे.
👇
ग्रामपंचातीची कामे व विषय :
*कृषी
*समाज कल्याण
*जलसिंचन
*ग्राम संरक्षण
*इमारत व दळणवळण
*सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
*सामान्य प्रशासन
हे विषय गावपातळीवर ग्रामपंचायत सांभाळते ,
व यासंबंधीचे कामे करते.
👇
ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निर्मिती करण्यात आली आहे.
बैठक : आर्थिक वर्षात (२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोंबर)
अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच
👇 @MarathiBrain
ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे साधन #ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर #व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर #जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान #विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारे अनुदान .
महाराष्ट्रातल्या १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे ,
निवडणूक कार्यक्रम असा..
उमेदवारी अर्ज २३ ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत.
उमेदवारी अर्जाची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी.
उमेदवारी ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येईल.
निवडणूक चिन्ह वितरण ४ जानेवारीला आहे.
👇
मतदान व मतमोजणी : #मतदान १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
फक्त गडचिरोली जिल्ह्य़ात मतदानाची सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. #मतमोजणी १८ जानेवारी रोजी होईल.
25 नोव्हेंबर 2008 ,
इयत्ता आठवीत होतो
दोन दिवसांपूर्वीच तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत आमच्या टीम ने दोन राऊंड जिंकले होते ,
मांगील 2 वर्षाची मेहनत होती यंदा जिल्हास्तर गाठायचच होत , ह्या जिद्दीने आम्ही खेळत होतो .
👇
मी त्या टीम चा कॅप्टन होतो , आज आम्ही मित्र जमून उद्या कसं खेळायचा कोण आणि केव्हा रेड करेल अशी सर्व ठरवून घेत होतो,
व नेहमी प्रमाणे संध्याकाळी सर्व उद्याच आयोजन करून घरी गेलो,
तसच आठच्या सुमारास जेवण व उद्याच्या स्पर्धेची तयारी करून ठेवली,
👇
सकाळी मला 6 वाजेच्या बस ने टीम सोबत बाजूच्या रेल्वे स्टेशन च्या गावी जायचं होत म्हणून लवकरच झोपलो , रात्री तेच मॅच बद्दल विचार करत करत एकदम झोप आली , तितक्यात आई ने सकाळ झाली म्हणून उठवलं , लगेच घाईघाईत तयार झालो , आई ने टिफीन रेडी करून दिलेला आणि निघालो ,
👇
भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात.
👇
यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट ही आला आहे ज्यात जॉन अब्राहम यांची भूमिका निभावतो. #Romeo_Akbar_Walter
त्यात त्यांनी कशी महत्वाची महिती भारताला पुरवली याची कल्पना येते.
👇
मुस्लीम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं.
👇
74 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. 👇
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” 👇
या अजरामर आणि ऐतिहासिक भाषणातून नेहरूंनी देशाला स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न दिले. मात्र हा प्रसंग साकार होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या आयुष्याचा होम करावा लागला ,अन तेंव्हा हे तिरंगी 🇮🇳 दृश्य साकार झाले.👇
#थ्रेड #खरंच_याला_महत्त्व_द्यायचं_का
कोरोनामुळे आपल्याला आपल्या मुख्य गरजा काय आहे हे लक्षात आलंच आहे,
आपण काही गोष्टींना विनाकारण महत्व द्यायचो असा अनुभव अनेकांना आलाच असेलच,
अश्याच अजुन काही गोष्टी ज्याना आपण खूप जास्त महत्त्व देतो
पण यांना इतकं महत्त्व द्यावं का ? 🤔
1/6
ज्या गोष्टींचे जगात कुठेही नवल वाटल नाही अश्या गोष्टी आपण भारतात मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतो
त्यातील हे ह्या काही गोष्टी 👇: 1. गोरेपणा - ह्या वर आपण भारतीय इतकं महत्त्व देतो की ह्यामुळे भारतात बऱ्याच कंपन्या गोरे व्हायची क्रीम विकून लाखो कोटी कमावतात .
2/6
2. रिअॅलिटी शो - यात सर्व ठरवून प्लॅनिंग ने केलं जातं तरीही आपण ते खरं समजून बघत बसतो
व त्या अभिनेत्याला हीरो मानायला लागतो. 3. पदवी - आपल्या कडे अजूनही पदवीला अनन्यसाधारण महत्त्व देतात
म्हणून फक्त आणि फक्त पदवी मिळवण्यासाठी बरेचजण खटाटोप करतांना दिसतात.
3/6
#खेळाडूपणा #थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे
हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
नंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले, "की तू असे का केले?" इव्हानने उत्तर दिले "माझे #स्वप्न आहे की एखाद्या दिवशी आपण अश्या जगात राहू जिकडे लोक आपल्या फायद्यापेक्षा जे बरोबर असेल ते करतील. मी त्याला जिंकू दिले नाही, तो #जिंकणार होता.
#थ्रेड #कर्ण #एक_वेगळा_विचार #जिवन
" कर्ण " महाभारतातील एक शूर राजा
सर्वोत्कृष्ट धनुर्धर , दानशूर अश्या अनेक कारणांनी आपण त्याला ओळखतो.
त्यांच्या शुरतेच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असणार परंतु कर्ण व जीवन यांची सांगळ घालण्याचा हा प्रयत्न म्हणून कर्ण एक वेगळ्या रीतीने मांडतोय
1/11
महाभारतात कर्ण हि व्यक्तीरेखा "असून अडचण व नसून खोळंबा" या तत्वात बसणारी आहे.मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे? मी अद्भुत आहे? आणि मी असामान्य व्यक्ती आहे? हे लहानपणापासून जाणले असतानाही त्या व्यक्तीरेखेनी स्वतःला संकुचित ठेवले
तो अजेय होता, तसेच जो पर्यंत त्याच्याकडे कवच-कुंडले आहेत
तो पर्यंत त्याला कोणीही युद्धात हरवू शकणार नाही याची जाणीव आसताना, त्याने दुर्योधनाने दिलेल्या राजपद स्वीकारण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर मिळवण्याचा का प्रयत्न केला नाही? त्याने ठरवले असते तर कितीतरी राज्ये युद्धात जिंकून तो स्वामी होऊ शकला असता, तशी कधी महत्वाकांक्षा दिसली नाही