आमचा रोजचा दिवस सकाळी साडेपाच पावणे सहाला सुरू होतो .
जग साखर झोपेत असताना आम्हाला जाग नवऱ्याच्या फोनच्या रिंगने येते
“सर इमर्जन्सी आहे ,सर ऑक्सिजन संपत आलाय सर पेशंट सिरियस झाला आहे
सर पेशंटला इंटीब्यूट करायच आहे.
👇
झोपेतून उठून भयंकर गडबडीत जाताना माझ्या नवऱ्याने एकदा चक्क माझी लहान मुलगी तूडवली होती , तिकडून परिस्थिती सेटल करून यायला त्याला सात-साडेसात होतात ,माझा जेमतेम चहा बनवून होईपर्यंत त्याने पाच ते दहा फोन उचललेले असतात.आपल्याला नाष्टा बनवायला किमान पंधरा- वीस मिनिटे लागतात पण
👇
तो नाश्ता मोजून पाच मिनिटात त्याने संपवलेलाही असतो,तेही फोनवर बोलत बोलतच ,
यानंतर एकदा तो कोविड राऊंड ला गेला की नंतर दुपारी एक पासून आपण तो घरी जेवायला आला आहे का?
यासाठी चार-पाच फोन करायचे , एखाद्यावेळी नशिबाने नवर्याशी बोलणे होते नाहीतर
👇
कोविड सेंटरमधील इतर डॉक्टर्स अथवा स्टाफ यांचे ठरलेलं उत्तर असतं , 'सर राउंड घेत आहेत, पीपीई किट घातलेलं आहे.
फायनली अडीच तीन वाजता तो घरी जेवायला येतो ,आपण घरी असू तर पंधरा-वीस मिनिटे तेवढिच भेट होते, तेही लांबूनच,
👇
तो आईसोलेशन मध्ये राहतो त्या वेगळ्या रूम मध्ये माझ्या सासूबाई,माझ्या मुली त्याला लांबूनच हाय करतात.
कधी हळूच नजर चुकवून मुली धावत गेल्याच तर क्षणात तितक्याच जोरात सगळेच इतके ओरडतात की भेदरतात ती पिल्लं,
आणि नंतर स्वतःच हसून स्वतःच्याच मनाची समजूत घालतो ,
👇
तुमच्यासाठीच स्वतःला वाळीत टाकले आहे मी”
त्या पंधरा मिनिटांमध्येही ठरलेले फोन-
“बेड अवेलेबल आहे का?
ऑक्सीजन अवेलेबल आहे?
रेमेडिसेंविर आहे का ?
व्हेंटिलेटर आहे का?
👇
ऍडमिट पेशंटच्या रिलेटिव्ह चे, फॅमिली डॉक्टर्स चे,पेशंट कार्यकर्ता असेल तर राजकारण्यांचे फोन पेशंट कसा आहे ?
सर्वात बर्डन टाकणारा फोन काहीही करा पण पेशंट वाचलाच पाहिजे डॉक्टर
अरे बाबा ठरलेला प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंट चा मी काय कोणताच डॉक्टर हे सोडून काहीच नाही करू शकत सध्या,
👇
फोनवर बोलत बोलत जेवण कधी संपले हेही कळत नाही तीन-साडेतीन ला गेलेला नवरा रात्री डायरेक्ट बारा-साडेबाराला भेटत तोवर आपण साधारणता नऊपासून पाच दहा फोन केलेले असतात फोन उचलत नाही म्हणून मेसेज टाकून ठेवलेले असतात
“प्लीज जेवायला ये,आय एम वेटिंग फॉर यू, जेवण करून पुन्हा राउंडला जा ना
👇
एकदाही रिप्लाय येणार नाही हे माहीतच असतं
फायनली रात्री बारा साडेबाराला राजे युद्धावरून घरी येतात त्यानंतर आंघोळ त्यानंतर जेवण दिवसाच्या तुलनेने रात्री फोन थोडासा कमी वाजतो,तरीही कमी म्हणजे त्या अर्ध्या तासात पेशंटच्या ऑर्डरर्स साठी का असेना हॉस्पिटलचे तरी पाच -सहा फोन होतातच,
👇
पप्पा ची भरपूर आठवण काढून मुली एव्हाना झोपलेल्या असतात , पप्पा कधीच नसतो आम्हाला झोपवायला अशा तक्रारी मागच्या कोविड वेव मध्ये करणाऱ्या आमच्या मुली सध्या मात्र कोरोना कधी जाणार ?
मग पप्पा आपल्यासोबत झोपेल ना ?
असं समजूतदारपणे बोलतात तेव्हा भरून येतं .
👇
खरेतर प्रत्येक राउंड नंतर पेशंटच्या नातलगांना काउन्सलिंग हे केलेलंच असतं तरीही सो कॉल्ड मुंबईचा भाऊ, पुण्याचा काका कुठला तरी नेता यांचे पुन्हा पुन्हा फोन येतातच एकाच पेशंट साठी इतके फोन ते हे डायरेक्ट फिजिशियन ला ही पद्धतच मुळात चुकीची आहे ,
👇
फिजिशियननी पेशंट पाहायचे की फोनवर एवढ्यांचे शंकासमाधान करायचचं?
सीसीसी , डीसीएचसी सगळे मिळून सत्तर-ऐंशी पेशंट धरले आणि रोजचा किमान एक फोन धरला डॉक्टरला नातलगांचा तरी वेडा होईल तो माणूस काही दिवसांमध्ये ,
पुण्या-मुंबईत बसून काळजीच्या नावाच्या शेळ्या हाकणारे ,
👇
हे रिलेटिव्ह बिल भरायच्या वेळी मात्र हात वर करतात भांडायला येतात
त्यातुन चुकून पेशंट गेलेला असेल तर मग विचारायलाच नको.
मला प्रश्न पडतो पेशंट ऍडमिट होता तेव्हा कुठे गेले होते हे सगळे घरात राहून वीस-बावीस स्कोअर होईपर्यंत कुठे गेले होते हे सगळे?
बिल भरायच्या वेळी मात्र दंगा फिक्स👇
अशा रीतीने गेले एक ते दीड महिना जास्तीत जास्त तीन ते चार तास झोप मिळते , कधीकधी खूप वाईट वाटत जेव्हा हॉस्पिटलचा स्टाफ पॉझिटिव्ह येतो , स्वतःच्या लहान मुलाबाळांना घरी सोडून अहोरात्र आपल्यासोबत सेवा देणारी ही लोक ,
👇
अशात नातलगानी बिलासाठी केलेला राडा,शेवटी फक्त क्रेडिट घेण्यासाठी-मिरविण्यासाठी राजकारण्यांनी केलेले फोन आपल्या नोकऱ्या सुरक्षित रहाव्या म्हणून प्रशासनाने काढलेली पत्र मानसिक खच्चीकरण होत रोज त्यांचं
अक्षरशा कधीकधी तो म्हणतो मला होत नाहीये आता थकलोय मी रोजच्या ह्या गोष्टींना,
👇
मग त्याने डिस्चार्ज केलेला एखादा पेशंट तीन-चार महिने ऑक्सिजन वर काढलेला स्वतःच्या पायांनी चालत फॉलोअपला चालत येतो आणि हात जोडतो, त्याची फॅमिली म्हणते डॉक्टर खरंच देव आहात तुम्ही आमच्यासाठी, तेव्हा जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं त्याला ,
👇
एखादा पेशंट दगावतो तेव्हा तो काही डॉक्टरांनी मुद्दाम मारलेला नसतो,माणसं मारायची नाही तर जगवायची शपथ घेतलेली असते त्यांन पण डॉक्टर ही एक माणूस आहेतो काही देव नाही की प्रत्येक पेशंट वाचवूच शकेल
अरे आजही येऊन बघितलं कोणी तर माझ्या नवऱ्याच्या हाताला जखमा झालेल्याआहेत
👇
किमान चाळीस पन्नास मास्क घरात अडकवलेले दिसतील त्याचे अक्षरशा छोटीशी पोनी घालायला येईल एवढे वाढलेले केस कोणीही कापायला तयार नाहीये ,
आज प्रत्येक डॉक्टरची हीच अवस्था आहे…
👇
पेशंट मरतो तेव्हा स्टाफ डॉ. ही रडतातच मृत्यू समोर दिसत असताना पेशंटला ट्रीट केलेलं असत त्यांनी तू जगणार आहेस, तू बरा होणारच आहेस, हा आधार दिलेला असतो तरीही तुम्ही त्याच्या नावाने ओरडतात..
👇
माझे सासरे सहा महिन्यापूर्वी 32 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवूनही पोस्टकोविड कॉम्प्लिकेशन नी गेले.त्यानंतर माझ्या नवऱ्याला त्या शॉक मधून बाहेर काढायला आणि आता ते या जगात नाहीत हे एक्सेप्ट करायला लावायला आम्हाला किमान चार महिने गेले ,
👇
नुकतेच कोविड ने डॉक्टर पती गमावलेल्या आईचा बत्तीस वर्षाचा तरुण मुलगा चार वर्षांच्या 2 मुलींचा बाप जेव्हा बायकोला म्हणतो हे सगळ्या एटीएमचे पासवर्ड, हे टर्म इन्शुरन्स चे पेपर्स हे एल.आय.सी चे पेपर,अजून बाकी डिटेल्स हे या डायरीत लिहितोय मला काही झालं तर शहाण्यासारखं नीट राहायचं
👇
स्वताला,घराला जपायच तेव्हा आमचाही जीव तुटतच असेल ना त्याला कोविड ड्युटी वरच जाऊ द्यायला नको वाटत आम्हालाही कधी कधी
समाज म्हणून,प्रशासन म्हणून,नैतिकता म्हणून आपण डॉक्टरांच्या पाठीशी नक्की कधी उभा राहणार आहोत?
छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळते. #सरपंच, #उपसरपंच, #ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला #ग्रामपंचायत म्हणतात.
कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या ठरते :
६०० ते १५०० - ७ सभासद
१५०१ ते ३००० - ९ सभासद
३००१ ते ४५०० - ११ सभासद
४५०१ ते ६००० - १३ सभासद
६००१ ते ७५०० - १५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद असता
निवडणूक - राज्य निवडणूक आयोग ही निवडणुक पार पाडते 👇
25 नोव्हेंबर 2008 ,
इयत्ता आठवीत होतो
दोन दिवसांपूर्वीच तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत आमच्या टीम ने दोन राऊंड जिंकले होते ,
मांगील 2 वर्षाची मेहनत होती यंदा जिल्हास्तर गाठायचच होत , ह्या जिद्दीने आम्ही खेळत होतो .
👇
मी त्या टीम चा कॅप्टन होतो , आज आम्ही मित्र जमून उद्या कसं खेळायचा कोण आणि केव्हा रेड करेल अशी सर्व ठरवून घेत होतो,
व नेहमी प्रमाणे संध्याकाळी सर्व उद्याच आयोजन करून घरी गेलो,
तसच आठच्या सुमारास जेवण व उद्याच्या स्पर्धेची तयारी करून ठेवली,
👇
सकाळी मला 6 वाजेच्या बस ने टीम सोबत बाजूच्या रेल्वे स्टेशन च्या गावी जायचं होत म्हणून लवकरच झोपलो , रात्री तेच मॅच बद्दल विचार करत करत एकदम झोप आली , तितक्यात आई ने सकाळ झाली म्हणून उठवलं , लगेच घाईघाईत तयार झालो , आई ने टिफीन रेडी करून दिलेला आणि निघालो ,
👇
भारतात एक असा गुप्तहेर झाला आहे की, तो मृत्यूनंतर देशाचा हिरो ठरला. ते गुप्तहेर म्हणजे रवींद्र कौशिक. भारताचे 'ब्लॅक टायगर' म्हणून ते ओळखले जातात.
👇
यांच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट ही आला आहे ज्यात जॉन अब्राहम यांची भूमिका निभावतो. #Romeo_Akbar_Walter
त्यात त्यांनी कशी महत्वाची महिती भारताला पुरवली याची कल्पना येते.
👇
मुस्लीम बनून पाकिस्तानात दाखल झालेल्या रवींद्र कौशिक यांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. परंतु, दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारला त्यांचं शव स्वीकारण्यासही नकार द्यावा लागला होता. कौशिक हे भारताचे नागरिक नसल्याचं पहिल्यांदा भारत सरकारनं सांगितलं होतं.
👇
74 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता… या प्रवासात आपण कोठुन कुठपर्यंत आलोय याच सिंहावलोकन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.. 👇
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट पडद्याला बाजूला सारून स्वतंत्र्याचा सोहळा रंगमंचावर मांडण्यात आला. सूत्रसंचालकाची भूमिका पंतप्रधान पंडित नेहरू यांनी चोखपणे निभावली..”अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता..” 👇
या अजरामर आणि ऐतिहासिक भाषणातून नेहरूंनी देशाला स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न दिले. मात्र हा प्रसंग साकार होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या आयुष्याचा होम करावा लागला ,अन तेंव्हा हे तिरंगी 🇮🇳 दृश्य साकार झाले.👇
#थ्रेड #खरंच_याला_महत्त्व_द्यायचं_का
कोरोनामुळे आपल्याला आपल्या मुख्य गरजा काय आहे हे लक्षात आलंच आहे,
आपण काही गोष्टींना विनाकारण महत्व द्यायचो असा अनुभव अनेकांना आलाच असेलच,
अश्याच अजुन काही गोष्टी ज्याना आपण खूप जास्त महत्त्व देतो
पण यांना इतकं महत्त्व द्यावं का ? 🤔
1/6
ज्या गोष्टींचे जगात कुठेही नवल वाटल नाही अश्या गोष्टी आपण भारतात मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतो
त्यातील हे ह्या काही गोष्टी 👇: 1. गोरेपणा - ह्या वर आपण भारतीय इतकं महत्त्व देतो की ह्यामुळे भारतात बऱ्याच कंपन्या गोरे व्हायची क्रीम विकून लाखो कोटी कमावतात .
2/6
2. रिअॅलिटी शो - यात सर्व ठरवून प्लॅनिंग ने केलं जातं तरीही आपण ते खरं समजून बघत बसतो
व त्या अभिनेत्याला हीरो मानायला लागतो. 3. पदवी - आपल्या कडे अजूनही पदवीला अनन्यसाधारण महत्त्व देतात
म्हणून फक्त आणि फक्त पदवी मिळवण्यासाठी बरेचजण खटाटोप करतांना दिसतात.
3/6
#खेळाडूपणा #थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे
हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
नंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले, "की तू असे का केले?" इव्हानने उत्तर दिले "माझे #स्वप्न आहे की एखाद्या दिवशी आपण अश्या जगात राहू जिकडे लोक आपल्या फायद्यापेक्षा जे बरोबर असेल ते करतील. मी त्याला जिंकू दिले नाही, तो #जिंकणार होता.