My Authors
Read all threads
JOKER जगभरातील एक अजरामर पात्र. सर्वात जास्त अभ्यासलेले आणि मानसशास्त्र तज्ज्ञांच्या कुतुहलाचे एक काल्पनिक पात्र.मी सांगतोय तो जोकर आहे The Dark Night मधील Heath ledger यांच्या अभिनयाने आणि Christopher Nolan यांच्या लिखाणाने त्यातूनच तयार झालेल्या चित्रपटाची .! कथा सांगायची तर
ही आहे गोथम या शहराची जिथे हे जोकर नावाच संकट कसं उभं राहिलं?त्याला जबाबदार कोण?तसेच शक्तिशाली असलेल्या बॅटमॅनला गुडघे टेकायला लावून त्याची घेतलेली मानसिक आणि शारीरिक परीक्षा यात दाखवण्यात आली आहे. जरी चित्रपटात जोकर हा खलनायक असला तरी तो खूप काही शिकवून जातो.
जणू काही मला तो नायकच भासतो असे भासण्यात त्याचे विचार, कामाची पद्धत आणि जीवनाकडे बघण्याची एक आधुनिक आणि आगळी वेगळी कला. तसा तो सतत अराजकतेच्या ,हिंसेच्या दुनियेतील मनोरुग्ण वाटत असला तरी त्याचे विचार आहेत. त्याची कार्यशैली आणि विचार सांगायचे झाले तर
चित्रपटाच्या अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत तो "Why so serious" असे म्हणतो त्याच्या म्हणन्याचा अर्थ काढल्यास जोकर आपलं काम अतिशय शांत डोक्याने आणि समजून करतो. जर आपण अति गंभीरपणे जगलो तर त्यात जास्त चुका करू शकतो.He Doesn't Play by Rule तो जास्त बंधन पाळत नाही.
सर्वसामान्य लोकांसारखा जगत नाही तसा विचार ही करत नाही.इथं तो भावून जातो प्रवाहाच्या विरुद्ध जातो. स्वतःचे निर्णय घेण्यास रोखत नाही जे त्याला योग्य वाटते तेच तो करतो.He Doesn't Plan तो कधीच गरजेपेक्षा जास्त नियोजन करत नाही.
Bruce Leeसुद्धा हेच म्हणतो"If You Spend too much time Thinking About A thing you will never get it done"जोकर ही नियोजन करतो पण तो लगेच पुढे येणाऱ्या गोष्टीबद्दल दीर्घकालीन करत नाही जर असा तो करत राहिला तर आपल्या भविष्यात गुंतून राहील त्यानं त्याच्या वर्तमानावर वाईट परिणाम होईल.
Enemies Complete Himगोथम शहरातील गुन्हेगारी लोकांवर निर्माण केलेली दहशत बॅटमॅन सारख्या सुपरहीरोला दिलेले खुल आव्हान.हेच आव्हान पुढे बॅटमॅनच्या खचलेल्या मानसिकतेत दिसून येत.सोप्या भाषेत सांगायचे तर कोणत्याही माणसाचा दर्जा , श्रेष्ठत्व हे त्याचे दुश्मन किती व कसे आहेत यावरून समजते.
एका दृश्यात तर बॅटमॅन विचारतो "Why do you wanna kill me?" त्यावर खास शैलीत उत्तम उत्तर देतो "I don't want to kill you..! What would I do without you? You complete me" जोकरला बॅटमॅनला मरायचे नसते तर त्याच्यासोबत स्पर्धा करायची असते.असच जीवनात स्पर्धा महत्त्वाची आहे
त्याने जीवनाला ऊर्जा, ते जगण्याची प्रेरणा मिळते.ती राहावी.तशी म्हण ही आहे मराठीत "निदकाचे घर असावे शेजारी" जोकर कोणताही नियम,कायदा,पाळत नाही त्याच्यासाठी जबाबदारी,प्रेम, आपुलकी,मानवतावाद,या सर्व गोष्टी ढोंग वाटते.
ना त्याला कुठल्या पैशाची गरज. त्याचं म्हणणं की आपण सतत किती चांगले आहोत हे स्वतःचे रूप जगासमोर दाखवून जीवन जगत असतो. हाच माणसातील ढोंगीपणा त्याला उघड करायचा असतो.शेवटी चित्रपटात एक दृश्य आहे. दोन जहाजावरील लोकांना अट घालतो की जर तुम्हाला जगायचं असेल तर दुसऱ्या जहाजवरील लोकांना.
मारावे लागेल. तरच ते वाचतील.! इथून सुरुवात होते Survival Instinct या संकल्पनेची आपल्या मनुष्य जातीत जगण्याचे स्वतःचा जीव वाचवण्याची सहज प्रवृत्ती उपजत असते.तशी ती निसर्गाच्या सर्व सजीव गोष्टीत असते.तशी ती निसर्गाच्या सर्व सजीव गोष्टीत असते.खर तर जोकरला माणसाने आपल्यातील
संयम, नैतीकता,प्रेम, जिव्हाळा सर्व सोडून आपल्यातील राक्षस बाहेर निघावा आणि तो जगाला दिसावा हेच वाटते. असा राक्षस प्रत्येकात असतो तो कधी ना कधी बाहेर येतोच.अराजकतेच्या परसस्थितीत आणि मुळात असलेल्या Survival Instinct मुळे तो आतील राक्षस नक्कीच बाहेर येईल या हेतूने तो असे वागत असतो.
आपण मनुष्य प्राणी असून आपल्यात असलेल्या मानवतावादी दृष्टिकोन,नैतीकता,प्रेम यामुळे पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ बनलो आहोत आजच्या अराजकतेच्या परिस्थितीत माणसातील हेच गुण खुप कामी येणार आहेत. हे कधीच विसरता कामा नये..!जोकरजे साध्य करू इच्छितो तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
आपल्यातील राक्षस जागा होऊ नये हीच अपेक्षा..!स्त्री-पुरुष,गरीब-श्रीमंत,जात, धर्म, हे सर्व भेदभाव विसरून एकजुटीने या विषाणूचा सामना केला तर नक्कीच लवकर जिंकू. विषाणू गेला की पुन्हा तोच भेदभाव आपल्याला नक्कीच न समजता हळू हळू मारून टाकेल.
मनुष्य प्राण्याला जगायचं असेल तर मानवतावाद,सर्व समानता हेच रामबाण औषध आहे..!
धन्यवाद 🙏
✍️©किरण रासकर
आवडला असेल तर Share करा. विचारही मांडा.भेदभाव वरीलthreadreaderapp.com/thread/1230889… माझा पहिला थ्रेड जरुर वाचा.मुख्य म्हणजे घरीच राहा स्वतःची काळची घ्या.शासनाला सहकार्य करा.
#म #मराठी
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Kiran Raskar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!