My Authors
Read all threads
माझा हा ट्विटरवर लिहण्याचा पहिला प्रयत्न..! जगभरात तशा खुप भिंती आहेत त्यातील काही प्रसिद्ध भिंती सांगायच्या झाल्या तर चीनची "The great wall of china"सर्वांत प्रसिद्ध भिंत, प्रचंड रचना कदाचित सर्वात सुंदर देखील आहे. परंतु त्याच्या शोभेच्या सौंदर्याने फसु नका;
या लादलेल्या संरचनेत लष्करी प्रेरणा होती.2. बर्लिन वॉल, जर्मनी भिंत अलाइड-व्याप्त पश्चिम बर्लिनला सोव्हिएत-नियंत्रित पूर्व बर्लिन (आणि आसपासच्या पूर्व जर्मनी) पासून कापून टाकली.3. वेस्टर्न वॉल, जेरूसलेम 8,488 मीटर लांबीची भिंत हे पवित्र स्थान आहे.जेथे यहुद्यांना प्रार्थना
करण्याची परवानगी आहे,जरी ज्यू धर्मातील सर्वात पवित्र स्थळ म्हणजे मंदिर माउंट, जे भिंतीच्या पलीकडे बसलेले आहे आणि प्रवेशाच्या निर्बंधास अधीन आहे (हे मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी एक पवित्र स्थळ आहे.
तर गेली काही दिवस चर्चेत असणारी मेक्सिका अमेरिका.याच सीमेवर भिंत बांधकाम सुरू करण्याचे औपचारिक निर्देश देणारे डोनाल्ड ट्रम्प. हेच ट्रम्प सध्या भारत भेटीवर आहेत यात ते भारतात उभारत असलेल्या सर्वात मोठ्या भिंतीच माफ करा चूक झाली क्रिकेट स्टेडियमच उदघाटन करणार आहेत.मी तरी काय करणार
त्याची चर्चा इतकी झाली की चूक ही होणार.
आता मूळ मुद्दा हा की बांधली का जात आहे ?ही एक नुसती भिंत नसून यात भेदभाव आहे. आणि हा भेदभाव आता आला तो याआधी कुणीही केला नाही असेही नाही. हा भेदभाव खूप वर्षांपूर्वी पासून सुरू आहे आणि तो फक्त भारतात आहे असेही नाही पूर्ण जगात सर्वत्र आहे.
भेदभावाचा इतिहास सांगायचं झालं तर सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी सरकारी संरक्षण कराराच्या अंतर्गत काम करणाऱ्या कंपनीने नोकरीच्या बाबतीत भेदभाव करण्यास मनाई करण्याचा कार्यकारीआदेश जारी केला.भेदभाव नष्ट करण्याचा हा जगातील पहिला प्रयत्न असावा.
भेदभाव प्रकार खुप आहेत .
त्यातीलआर्थिक,सामाजिक,लैंगिक,वांशिक,वयवाद आणिदुसर्‍याच्याधर्माबद्दल वांशिकता किंवा राष्ट्रीयत्वाबद्दल नापसंत इ. या सर्व प्रकारच्या भेदभावात आर्थिक भेदभाव महत्वाचे घटक राहिला आहे. रोजच्या जीवनात आपण त्याचा सामना करतो
सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत बघा ना स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचारी लवकर उठतात बस मध्ये निम्या जागा राखीव असतात . ऑफिसमध्ये गेलो तर समान कामासाठी समान पगार भेटलेच असे नाही. तर रात्री शेतकऱ्याला पिकांना पाणी देण्यासाठी रातभर जागावं लागेल का तर भेदभाव..!
उद्योग,सेवा, मनोरंजन या क्षेत्राला दिवसा वीजपुरवठा बाकी राहिला तर तुम्ही घ्या.आर्थिक भेदभावाचा हा प्रकार सहसा त्या वेळी "सत्तेत" असणार्‍या कोणत्याही गटांद्वारे केलाजातो.अर्थशास्त्रज्ञआणि आंतरराष्ट्रीयवाणिज्य सिद्धांतांच्या वाढत्या संख्येने असे सुचवले आहे की
आर्थिक भेदभाव व्यक्ती किंवा गटाकडून केला जातो. भेदभाव ही समस्या पूर्ण जगभर आहे देशदेशात त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. सर्व जगात सद्यस्थितीत एका गंभीर भेदभावला सामोरा जात आहे ते म्हणजे श्रीमंत आणि गरीब आणि हा भेदभाव एक दिवस अजून गंभीर रूप धारण करेल .
अलीकडे ऑस्कर पुरस्कार वितरित करण्यात आले .त्यात बेस्ट सिनेमा अवॉर्ड हा दक्षिण कोरियाच्या Parasite या सिनेमाला मिळाला तर बेस्ट पुरुष अभिनेता म्हणून Joaquin Phoenix यांना Joker साठी या दोन्हीत साम्य एकच की श्रीमंत आणि गरीब यांतील दरी..! दोन्हीही चित्रपटात लढाई ही भेदभावावर
उठवलेल्या आवाजाची. Parasite मध्ये ती एका बाजूला श्रीमंत लोक पावसाचा आनंद लुटतात तिथे गरीबांची पावसाशी लढाई तर Joker मध्ये विकसित म्हणवणाऱ्या देशात उच्चविद्याविभूषित व्यवस्थेतेशी लढा.त्यामुळे या एका भिंतीने काही होणार नाही अश्या या भिंती खुप आहेत.
श्रीमंत-गरीब,काळ-गोरा,सुशिक्षित-अशिक्षित, रोजगार-बेरोजगार,पुरुष-महिला,मुलगा-मुलगी अगदी देखणा-सर्वसाधारण. या भिंती जर पाडायच्या असतील तर त्यातील एक एक विटेची पायरी झाली पाहिजे.आणि त्याहून बेस्ट म्हणजे भिंतींना पण कान असण्या पेक्षा डोळे असते तर बघून तिनेच जीव दिला असता. धन्यवाद🙏.!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Kiran Raskar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!