महाराष्ट्रात विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असुन येत्या १ डिसेंबर ला मतदान होईल!
खालील धाग्यात
१)विधानपरिषदेची स्थापना
२) विधानपरिषदेची रचना
३)एकुण किती राज्यात वि.प.असुन उमेदवार पात्रता
४)पदवीधर व शिक्षक मतदार पात्रता
५)मतदान पद्धत #म#threadकर
महाराष्ट्रातील जी विधानपरिषद आहे तसा तिचा इतिहास हा स्वातंत्रपुर्व काळातील आहे.विधानपरिषद अथवा परिषदेसारखी सामाईक संरचना असलेली परिषद 'इंडियन कौन्सिल ॲक्ट-१८६१' नुसार बाॅंम्बे प्रांतात स्थापन करण्यात झाली.
टीप:-त्यावेळी मुंबईला बाॅंम्बे म्हणायचे.
१९३५ ला जो कायदा आला @irajratna
त्यानुसार राज्यात जुलै १९३७ ला विधानपरिषद अस्तित्वात आली.स्थापनेनंतर जी पहिली बैठक झाली ती पुणेमध्ये कौन्सिल हॉल ला २० जुलै,१९३७ ला घेतल्या गेली.दुपारी २ वाजता ही बैठक पार पडली.१९५५ पर्यंत परिषदेचे जे पावसाळी अधिवेशन होते ते पुण्यातच भरायचे..पण ज्यावेळीस 'नागपुर करार' झाला
त्यानंतर हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यायला चालु झाले.
*विधान परिषद स्थापनेवेळीस '२९' सदस्य होते.
*द्विभाषिक मुंबई राज्यात '१०८' सदस्य होते.
*संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर '७८' सदस्य झाले..
राज्याच्या विधीमंडळाची विभागणी दोन सभागृहात केली जाते..
त्याचे वरिष्ठ सभागृह म्हणजे
'विधानपरिषद' असुन ती अस्तित्वात असावीच अशी सक्ती नाही.
राज्य विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह म्हणजे 'विधानसभा' असुन ती अस्तित्वात असायलाच हवी.
*आता आपण विधानपरिषदेची संरचना अभ्यासु🙏🏻😄
राज्यघटनेच्या भाग ६ मधील कलम १६८ ते २१२ मध्ये राज्यविधीमंडळाचा उल्लेख आहे.
त्यामध्ये @AtulAmrutJ
'कलम १७१(१) नुसार,
विधानपरिषदची सदस्यसंख्या कमीतकमी ४० तर जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभा सदस्यसंख्येच्या एक तृतीयांश इतकी हवी.
महाराष्ट्र वि.प.च्या ७८ सदस्यांपैकी १/६ सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करतात तर ५/६ सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात
खाली आपण सविस्तर जाणुन घेऊ.
राज्यपालांतर्फे नामनिर्देशित १/६ सदस्य:-
समाजसेवा,कला,विज्ञान,साहित्य व सहकारी चळवळ या क्षेत्रातील असतात.
अप्रत्यक्ष निवडणूकीद्वारे ५/६ सदस्य:-
१/३:-स्थानिक स्वराज्य संस्था
१/३:-विधानसभा सदस्यांद्वारे
१/१२:-पदवीधर मतदारसंघातुन
१/१२:-शिक्षक मतदारसंघातुन
विधानपरिषद हे स्थायी
सभागृह आहे.
स्थायी म्हणजे ते सभागृह कधीच संपुर्णपणे विसर्जीत होत नाही.त्याचे १/३ सभासद दर २ वर्षांनी निवृत्त होतात.केंद्रात राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे😄
**सध्या भारतामध्ये एकुण '६' विधानपरिषद असुन त्या खालीलप्रमाणे:-
१)उत्तरप्रदेश-१००
२) महाराष्ट्र-७८
३)बिहार-७५
४)कर्नाटक-७५
५)आंध्रप्रदेश-५८
६)तेलंगणा-४०
आता महाराष्ट्र विधान परिषद कशी विभागली आहे ते पाहुया:-
विधानसभेद्वारे सदस्य:-३०
स्थानिक स्वराज्य संस्था:-२२
पदवीधर मतदार संघ:-७
शिक्षक मतदार संघ:-७
राज्यपाल नियुक्त:-१२
एकुण :-७८
आता विधानपरिषद उमेदवाराची व त्यांना मत टाकणार्या मतदारांची पात्रता पाहुया:-
कलम १७३ मध्ये उमेदवाराची पात्रता दिली आहे.
१)तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
२)निवडणुकीला उभारण्यासाठी वयाची ३० वर्ष पुर्ण हवे.
३) निवडणूक आयोगाने नेमलेल्या व्यक्तिसमोर शपथ घेणे अथवा प्रतिज्ञानपत्र देणे.
आता मतदाराची पात्रता पाहुया:-
१)पदवीधर मतदार पात्रता-
भारतातील कोणत्याही विद्यापीठातुन पदवी धारण केलेली असावी.
२)शिक्षक मतदार पात्रता-
राज्यातील माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक संस्था यामध्ये कमीत कमी ३ वर्षे शिक्षक असलेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो.. #म#मराठी
*मतदान पद्धत:-
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.उमेदवारांना आपल्या पसंतीने क्रमांक द्यायचे असतात.सर्वात पहिली पसंती असलेल्या उमेदवारासमोर '१' लिहायचे तर दोन नंबर पसंतीसाठी '२' लिहायचे.
पसंतीक्रमांक लिहताना स्वताचा पेन,पेन्सिल वापरायला परवानगी नाही.
जांभळ्या रंगाचा स्केचपेन मतदारांना मतदारसंघावर दिला जातो,त्याचाच वापर करावा.. अन्यथा मत बाद ठरविल्या जाईल..
आजच्या थ्रेडमध्ये चीन ने जॅक मा यांच्या ॲंटग्रुप IPO बद्दल जी कठोर पाऊलं उचलली आहेत त्याबद्दल लिहीलं आहे..
थ्रेडमध्ये
१)IPO,FPO आणि त्याची ऐतिहासिक किंमत
२)ॲंट ग्रुप,सौदी अरामको व अली पे
४)IPO suspend करण्यामागे नक्की कारणं काय असु शकतात इ.. #म#मराठी#रिम#threadकर#alibaba
तुम्हाला मुळात चीनचे असणारे व जगातील इ-काॅमर्स क्षेत्रातील महाबलाढ्य नाव म्हणजेच 'जॅक मा' माहित असतीलच!!
तर विषय असा आहे की त्यांची #alibaba नावाची इ-काॅमर्स कंपनी आहे.इ-काॅमर्स कंपनी म्हणजे भारतात जशी ॲमेझोन आहे अगदी तशीच ती चीनमध्ये आहे..पण तिच्यासोबत जॅक मा यांची
आणखी एक कंपनी आहे.तिच नाव आहे #ANTGROUP..या ॲंटग्रुपचे जे IPO बाजारात येणार होते त्यावर चीनने बंदी घातली आहे.प्रथम आपण IPO(Initial Public Offering)म्हणजे काय समजुन घेऊ.
जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारात विस्तार करायचा असेल तेव्हा तिला पैसा लागतो..त्यावेळीस ती एकतर बॅंकेकडुन पैसे घेऊ
आजच्या या थ्रेडमध्ये #Tata कंपनी व #Apple कंपनीबद्दल माहिती सांगितली आहे..tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खालील धाग्यात
1)डील बद्दल..
2)#Titan चा सहभाग 3) तमिळनाडूच का?
इ..
टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड
आता लवकरच अमेरिकेचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष घोषित होतील..मी काल ट्रंप आणि बिडेन यांच्यामधील प्राथमिक फरक सांगितला होता..त्या धाग्याची लिंक खाली आहेच! आज आपण त्या दोघांचा भारताप्रती नक्की काय दृष्टिकोन आहे याबद्दल जाणुन घेऊया.. #म#मराठी#रिम#USAElections2020#Trump2020#Biden2020
१)अमेरिकेतील भारतीय कायम डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देतात ज्याचे उमेदवार सध्या #Biden आहेत.पण ह्यावेळीस #corona पार्श्र्वभूमीवर #trump यांनी चीनला ज्याप्रकारे धारेवर धरले..त्यात कोरोनाला सरळ सरळ चीनी वायरस संबोधणे अथवा ट्रेड वाॅर इ. यामुळे भारतीय ट्रंपच्या बाजुने झुकलेले असावेत
दुसरीकडे बिडेन पाकिस्तान च्या बाजुने कृती करत असल्याचे दिसुन आले ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला ६०० मिलीयन$ ची मदत घोषित केली जी मदत ट्रंपनी आर्ध्यावरच आणलीय.पाकिस्तानच्या मते त्यांना ते पैसे दहशतवाद व आतंकवाद विरोधात वापरायचेत पण वस्तुस्थिती आपणा सर्वांनाच माहीती आहे🙏🙏
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची ऐतिहासिक ४५% भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
मनरुपी समुद्रात घटनेरूपी मंथन घडले की विचारांची रत्ने बाहेर पडतात..त्यामध्ये सकारात्मक रत्नांसोबत विषरुपी नकारात्मक रत्नही बाहेर पडतो...हे मंथन कासवाच्या रुपात असलेल्या संस्कारांच्या खंबीर पाठीवर घडत असते..
संस्कारांची खंबीर पाठ असुनही विष का बाहेर पडावे..कारण ते अटळ आहे..
प्रत्येक गोष्ट सकारात्मक घडत गेली तर🤔🤔 आयुष्याला अर्थ तो काय?
अश्रुंना अर्थ तो काय?
'उभारी घ्या,खचु नका'..हे शब्द काल्पनिकच राहीले नसते का जर सगळ चांगलच घडल असत तर??
वाईट प्रसंगामुळे स्वत्वाची जाणीव होते,आपण कोण आहोत याचा प्रत्यय येतो..ती ही झाली नसती कदाचित..जर वाईट घडलच
देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या व्यक्तीला मारणारा आज देशातल्या एका विशिष्ट वर्गासाठी नायक,देशभक्त ठरलाय.आजच्या थ्रेडमध्ये
१)#नथुराम_गोडसे
२)#गांधीजी व हत्या
३) वल्लभभाई पटेल व त्यांचा RSS विरोध
४)फाशीवेळीस गोडसेची परिस्थिती #रिम#MahatmaGandhi
नथुराम विनायकराव गोडसे चा जन्म 19मे,1910 ला झाला.त्यांच्या जन्मावेळीस भारतात क्रांतिकारी चळवळी चालु झाल्या होत्या.थोड्या कालावधीने गांधीजीं चे भारतात आगमन झाले आणि त्यांनी 1920 ला 'असहकार आंदोलन' पुकारले.नथुरामचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्टल ऑफिसमध्ये कामाला होते.
त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी.नथुराम चे 'नथुराम' नाव पडण्यामागे एक गोष्ट आहे.त्यांचे खरे नाव 'रामचंद्र' होते.पण नथुराम जन्माला यायच्यापुर्वी ३ मुले जन्माला आली आणि अल्पावधीतच मरण पावली.घरच्यांना वाटले की आपल्याला कोणतातरी शाप असावा त्यामुळे मुले दगावत आहेत..म्हणुन त्यांनी 'रामचंद्र'