आजच्या थ्रेडमध्ये चीन ने जॅक मा यांच्या ॲंटग्रुप IPO बद्दल जी कठोर पाऊलं उचलली आहेत त्याबद्दल लिहीलं आहे..
थ्रेडमध्ये
१)IPO,FPO आणि त्याची ऐतिहासिक किंमत
२)ॲंट ग्रुप,सौदी अरामको व अली पे
४)IPO suspend करण्यामागे नक्की कारणं काय असु शकतात इ.. #म#मराठी#रिम#threadकर#alibaba
तुम्हाला मुळात चीनचे असणारे व जगातील इ-काॅमर्स क्षेत्रातील महाबलाढ्य नाव म्हणजेच 'जॅक मा' माहित असतीलच!!
तर विषय असा आहे की त्यांची #alibaba नावाची इ-काॅमर्स कंपनी आहे.इ-काॅमर्स कंपनी म्हणजे भारतात जशी ॲमेझोन आहे अगदी तशीच ती चीनमध्ये आहे..पण तिच्यासोबत जॅक मा यांची
आणखी एक कंपनी आहे.तिच नाव आहे #ANTGROUP..या ॲंटग्रुपचे जे IPO बाजारात येणार होते त्यावर चीनने बंदी घातली आहे.प्रथम आपण IPO(Initial Public Offering)म्हणजे काय समजुन घेऊ.
जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारात विस्तार करायचा असेल तेव्हा तिला पैसा लागतो..त्यावेळीस ती एकतर बॅंकेकडुन पैसे घेऊ
शकते किंवा IPO करू शकते.जर बॅंककडुन पैसे घेतले तर एकतर बॅंका सहसा देत नाहीत आणि जरी दिले तरी त्यावर व्याज लागणार एव्हढं नक्की..
म्हणुन कंपनी जेव्हा मार्केटमधुन पैसा उभा करायला पहिल्या वेळीस आपला समभाग विकायला काढते त्याला #IPO म्हणतात आणि त्यानंतर ३-४ किंवा कितीही वेळा विकलं की
त्याला FPO(Follow-on Public Offering) म्हणले जाते.आता समजा एखाद्या कंपनीचे १०० शेअर आहेत व त्यातील ते १० शेअर #IPO करत आहेत म्हणजे १०%..तर तो पैसा कंपनीला मिळतो..
ॲंटग्रुप त्यांच्या #IPO मधुन तब्बल ३७बिलीयन$ उभे करणार होती!!!
जी जगातील सगळ्यात मोठी उलाढाल झाली असती🤯 @AtulAmrutJ
आत्तापर्यंत,
सौदी अरेबियामधील तेल उत्पादनची एक कंपनी आहे..
'सौदी अरामको #saudi_aramco'
या बलाढ्य कंपनीने सगळ्यात मोठी उलाढाल केली होती(२९.४बिलीयन$)..२०१९ साली या कंपनीने आपले IPO देऊन बाजारातुन एव्हढे पैसे उभा केले होते!!
अली पे आणि ॲंटग्रुप:-
ज्याप्रमाणे पैसे पाठवण्यासाठी आपण गुगल पे,फोन पे चा वापर करतो त्याप्रमाणे २००४ साली अलीबाबा कंपनीने एक ॲप लाॅंच केले ज्याचे नाव 'अली पे'.
या ॲपने कमी कालावधीत एव्हढी मुसंडी मारली की आज १ अब्ज लोकांनी ते ॲप डाउनलोड केले असुन ७३ कोटी लोकं ते ॲप वापरतात🔥🔥
वाढणारा प्रतिसाद पाहुन या 'अलि पे' चे आणखी विस्तारीकरण करायला अलिबाबा ग्रुपने स्वताच्याच 'ॲंट फायनान्शीअल' ला 'अलि पे' विकलं जे पुढे जाऊन 'ॲंटग्रुप' झाले आणि आज त्यांच्या IPO वर चीन व हाॅंगकाॅंगच्या शेअर मार्केट रेग्युलेटर बाॅडीने तात्पुरती बंदी घातली आहे..🙏🏻🙏🏻
चीन व हाॅंगकाॅंग अलि पे च्या IPO ला का विरोध करत आहेत??🤔
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या..चीनमध्ये आपण सरकारला डावलुन कोणतीच गोष्ट संपुर्णपणे आपल्या हातात घेऊ शकत नाही..सरकारच्या सार्वभौमत्वाला धक्का लागेल अश्या गोष्टी तिथे चालू शकत नाही..आणि त्यात हे ॲप थर्ड-पार्टी.
अश्या प्रकारच्या ॲपमुळे चीनच्या सरकारला धोका वाटु लागला..लोकांवरचा आपला प्रभाव कमी होईल अशी धाकधूक लागली..
दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 'जॅक मा' यांनी चीनच्या फायनान्शीअल रेग्युलेशन ठेवणार्या संस्थेवर ताशेरे ओढले.हे लोक नव्या कल्पनांना वाव देत नाहीत..यांच्या पाॅलिसी
कालबाह्य झाल्या आहेत इ..
यामुळे चीनने बाजारात IPO यायला रोकलं असुन जर जॅक मा चीन सरकारला खुश करण्यात यशस्वी ठरले तरच IPO चा मार्ग सुरळीत होऊ शकतो..कारण चीनमध्ये राहुन तेथील सरकारशी तुम्ही वैर पत्करू शकत नाहीत.
बघु आता काय काय होतय ते. @HemantKMane #म#मराठी#रिम#China#ANTGROUP
महाराष्ट्रात विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असुन येत्या १ डिसेंबर ला मतदान होईल!
खालील धाग्यात
१)विधानपरिषदेची स्थापना
२) विधानपरिषदेची रचना
३)एकुण किती राज्यात वि.प.असुन उमेदवार पात्रता
४)पदवीधर व शिक्षक मतदार पात्रता
५)मतदान पद्धत #म#threadकर
महाराष्ट्रातील जी विधानपरिषद आहे तसा तिचा इतिहास हा स्वातंत्रपुर्व काळातील आहे.विधानपरिषद अथवा परिषदेसारखी सामाईक संरचना असलेली परिषद 'इंडियन कौन्सिल ॲक्ट-१८६१' नुसार बाॅंम्बे प्रांतात स्थापन करण्यात झाली.
टीप:-त्यावेळी मुंबईला बाॅंम्बे म्हणायचे.
१९३५ ला जो कायदा आला @irajratna
त्यानुसार राज्यात जुलै १९३७ ला विधानपरिषद अस्तित्वात आली.स्थापनेनंतर जी पहिली बैठक झाली ती पुणेमध्ये कौन्सिल हॉल ला २० जुलै,१९३७ ला घेतल्या गेली.दुपारी २ वाजता ही बैठक पार पडली.१९५५ पर्यंत परिषदेचे जे पावसाळी अधिवेशन होते ते पुण्यातच भरायचे..पण ज्यावेळीस 'नागपुर करार' झाला
आजच्या या थ्रेडमध्ये #Tata कंपनी व #Apple कंपनीबद्दल माहिती सांगितली आहे..tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खालील धाग्यात
1)डील बद्दल..
2)#Titan चा सहभाग 3) तमिळनाडूच का?
इ..
टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड
आता लवकरच अमेरिकेचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष घोषित होतील..मी काल ट्रंप आणि बिडेन यांच्यामधील प्राथमिक फरक सांगितला होता..त्या धाग्याची लिंक खाली आहेच! आज आपण त्या दोघांचा भारताप्रती नक्की काय दृष्टिकोन आहे याबद्दल जाणुन घेऊया.. #म#मराठी#रिम#USAElections2020#Trump2020#Biden2020
१)अमेरिकेतील भारतीय कायम डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देतात ज्याचे उमेदवार सध्या #Biden आहेत.पण ह्यावेळीस #corona पार्श्र्वभूमीवर #trump यांनी चीनला ज्याप्रकारे धारेवर धरले..त्यात कोरोनाला सरळ सरळ चीनी वायरस संबोधणे अथवा ट्रेड वाॅर इ. यामुळे भारतीय ट्रंपच्या बाजुने झुकलेले असावेत
दुसरीकडे बिडेन पाकिस्तान च्या बाजुने कृती करत असल्याचे दिसुन आले ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला ६०० मिलीयन$ ची मदत घोषित केली जी मदत ट्रंपनी आर्ध्यावरच आणलीय.पाकिस्तानच्या मते त्यांना ते पैसे दहशतवाद व आतंकवाद विरोधात वापरायचेत पण वस्तुस्थिती आपणा सर्वांनाच माहीती आहे🙏🙏
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची ऐतिहासिक ४५% भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
मनरुपी समुद्रात घटनेरूपी मंथन घडले की विचारांची रत्ने बाहेर पडतात..त्यामध्ये सकारात्मक रत्नांसोबत विषरुपी नकारात्मक रत्नही बाहेर पडतो...हे मंथन कासवाच्या रुपात असलेल्या संस्कारांच्या खंबीर पाठीवर घडत असते..
संस्कारांची खंबीर पाठ असुनही विष का बाहेर पडावे..कारण ते अटळ आहे..
प्रत्येक गोष्ट सकारात्मक घडत गेली तर🤔🤔 आयुष्याला अर्थ तो काय?
अश्रुंना अर्थ तो काय?
'उभारी घ्या,खचु नका'..हे शब्द काल्पनिकच राहीले नसते का जर सगळ चांगलच घडल असत तर??
वाईट प्रसंगामुळे स्वत्वाची जाणीव होते,आपण कोण आहोत याचा प्रत्यय येतो..ती ही झाली नसती कदाचित..जर वाईट घडलच
देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या व्यक्तीला मारणारा आज देशातल्या एका विशिष्ट वर्गासाठी नायक,देशभक्त ठरलाय.आजच्या थ्रेडमध्ये
१)#नथुराम_गोडसे
२)#गांधीजी व हत्या
३) वल्लभभाई पटेल व त्यांचा RSS विरोध
४)फाशीवेळीस गोडसेची परिस्थिती #रिम#MahatmaGandhi
नथुराम विनायकराव गोडसे चा जन्म 19मे,1910 ला झाला.त्यांच्या जन्मावेळीस भारतात क्रांतिकारी चळवळी चालु झाल्या होत्या.थोड्या कालावधीने गांधीजीं चे भारतात आगमन झाले आणि त्यांनी 1920 ला 'असहकार आंदोलन' पुकारले.नथुरामचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्टल ऑफिसमध्ये कामाला होते.
त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी.नथुराम चे 'नथुराम' नाव पडण्यामागे एक गोष्ट आहे.त्यांचे खरे नाव 'रामचंद्र' होते.पण नथुराम जन्माला यायच्यापुर्वी ३ मुले जन्माला आली आणि अल्पावधीतच मरण पावली.घरच्यांना वाटले की आपल्याला कोणतातरी शाप असावा त्यामुळे मुले दगावत आहेत..म्हणुन त्यांनी 'रामचंद्र'