आता लवकरच अमेरिकेचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष घोषित होतील..मी काल ट्रंप आणि बिडेन यांच्यामधील प्राथमिक फरक सांगितला होता..त्या धाग्याची लिंक खाली आहेच! आज आपण त्या दोघांचा भारताप्रती नक्की काय दृष्टिकोन आहे याबद्दल जाणुन घेऊया.. #म#मराठी#रिम#USAElections2020#Trump2020#Biden2020
१)अमेरिकेतील भारतीय कायम डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देतात ज्याचे उमेदवार सध्या #Biden आहेत.पण ह्यावेळीस #corona पार्श्र्वभूमीवर #trump यांनी चीनला ज्याप्रकारे धारेवर धरले..त्यात कोरोनाला सरळ सरळ चीनी वायरस संबोधणे अथवा ट्रेड वाॅर इ. यामुळे भारतीय ट्रंपच्या बाजुने झुकलेले असावेत
दुसरीकडे बिडेन पाकिस्तान च्या बाजुने कृती करत असल्याचे दिसुन आले ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला ६०० मिलीयन$ ची मदत घोषित केली जी मदत ट्रंपनी आर्ध्यावरच आणलीय.पाकिस्तानच्या मते त्यांना ते पैसे दहशतवाद व आतंकवाद विरोधात वापरायचेत पण वस्तुस्थिती आपणा सर्वांनाच माहीती आहे🙏🙏
२)ट्रंप आल्यापासून भारताला शस्त्र पुरवण्यामध्ये वेग वाढलाय.याचा अर्थ असा नाही की #BarackObama यांच्या काळात शस्त्रपुरवठा होत नव्हता..ओबामा कारकिर्दीत C-17 विमान, चिनुक हेलिकॉप्टर, अपाचे हेलिकॉप्टर भारताच्या मार्गावरच होते व जरी बिडेन आले तरी अमेरिका-भारत शस्त्र संबंध सृदृढ राहतील
३)ट्रंप नी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला सहयोग केला जसेकी भारताचा समावेश MTCR(ज्याचा सदस्य पाकिस्तान नाही)मध्ये करणे,LEMOA,COMCASA,BECA करार करणे अथवा ट्रंपने भारताला NSG(nuclear supplier group)मध्ये घेण्यासाठी खुप प्रयत्न केले पण चीनच्या दबावामुळे ते होऊ शकले नाही.
NSG बद्दल थोडक्यात:-
या ग्रुपचेच सदस्य फक्त जगातल्या बाकीच्या देशाकडुन युरेनियम विकत घेऊ शकतात.भारताकडे तेव्हढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियम नाही आणि जे आहे ते वीज निर्मितीला वापरले जाते.जर आपण सदस्य असतो तर आपला युरेनियम अणुबाँबला व विकत घेतलेला वीज निर्मितीसाठी वापरला असता #म
४)ट्रंप पक्के Anti china आहेत.त्यांनी कोरोनाला उघडपणे चायनीज वायरस बोलणे किंवा चायनासोबत व्यापारयुद्ध घोषित करणे हेच दर्शवते.ज्यावेळीस ट्रंपने चायनाच्या ॲल्युमिनियम व स्टील कारखान्यांवर करवाढ केली त्यावेळी अमेरिकेतील उद्योगपतींनी कमी किंमतीतल्या मालासाठी भारताकडे आपली नजर वळवली..
४(ब)ट्रंप यांच्यामते बिडेन यांचा चीनबद्दलचा दृष्टिकोन मवाळ आहे याचे कारण त्यांचे सुपुत्र..#Hunter बिडेन..
२०१३ साली हंटरने चीनमधल्या एका कंपनीत १.५ बिलीयन$ ची गुंतवणूक केली.२०१७ साली त्या कंपनीने गुंतवणूकीला Sinecure(सायनेक्युअर) घोषित केले.Sinecure म्हणजे एका ठराविक वेळेनंतर
गुंतवणूकदाराला कोणतेही काम न करता घरबसल्या राॅयल्टी इन्कम चालु.जसे गाणी म्हणणार्या गायकाला एकदा गाणं म्हणले की आयुष्यभर कमाई चालु अगदी तसेच.ट्रंप नी हाच मुद्दा प्रचारात वापरला.
बिडेन म्हणतात की ट्रंप दाखवतेत तेव्हढ चीन वाईट नाही आणि लोक पण तसच मानायचे पण कोरोनामुळे सगळ बदलल आहे..
थोडक्यात काय तर ट्रंप आले तर चीनची कंबर तोडणार एव्हढ नक्की..आणि भारताला त्याचा आपसुकच फायदा होईल
पण बिडेन आले तर ते चीनसोबत soft trade चालु ठेवतील.. याचा अर्थ असा नाही की आपल्याला वाटतय म्हणुन तोच उमेदवार येईल..यामागे आणखी अनेक खाचाखळगा आहेत..खाली आणखी सांगायचा प्रयत्न केला आहे..
ट्रंपचा चीनला विरोध असल्याने इतिहासात बहुतांश पहिल्यांदाच भारताकडुन रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.त्यात #HowdyModi व #NamasteTrump सारखे कार्यक्रम केले पण फटकळ ट्रंपने #HydroxyChloroquine चे विधान व भारताला #filthyindia देखील म्हणले आहे
दुसरीकडे कृष्णवर्णीयांवर व भारतीयांवर प्रभाव टाकायला बिडेननी #KamalaHarris यांना उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडले ज्यामुळेदेखील भारतीय मतं प्रभावित होऊ शकतील..व तसेच बिडेनने मुस्लिमांच्या मतांना वळवायचा पुरेपुर प्रयत्न केले असुन त्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या जसेकी भारतातल्या
#CAA_NRC ला विरोध करणे अथवा कलम-३७० वेळीस काश्मिरमध्ये मानवाधिकारच पतन झालय अस म्हणणे..तसेच बांगलादेश मधील रोहिंग्या समाजावर होणार्या अन्यायावर भाष्य करणे असो अथवा चीनमधील उगर मुस्लिमांबद्दल सहानुभूती दाखवणे..
ट्रंपच्या बाजुने श्वेतवर्णीय मतदार आहेत तर बिडेनच्या बाजुने कृष्णवर्णीय मतदार..एक घटना सांगतो, मे-जुनच्या दरम्यान एक फोटो फेमस झाला होता ज्यात एक पोलिस एका कृष्णवर्णीय माणसाच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलाय व तो माणुस ओरडतोय "I can't breathe"..शेवटी त्याचा गुदमरून मृत्यु झाला..
या घटनेमुळे ट्रंप विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली व मोठमोठे खेळाडु,लोकांनी या घटनेचा निषेध नोंदविला..त्यात ट्रंप कोरोना परिस्थिती हाताळायला संपुर्णपणे अपयशी ठरले आहेत..पाहु आता काय होतय ते..
वेळेअभावी थ्रेड लिहायला उशीर झालाय..दिलगिरी व्यक्त करतो🙏😓 @MarathiDeadpool
आजच्या या थ्रेडमध्ये #Tata कंपनी व #Apple कंपनीबद्दल माहिती सांगितली आहे..tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खालील धाग्यात
1)डील बद्दल..
2)#Titan चा सहभाग 3) तमिळनाडूच का?
इ..
टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची ऐतिहासिक ४५% भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
मनरुपी समुद्रात घटनेरूपी मंथन घडले की विचारांची रत्ने बाहेर पडतात..त्यामध्ये सकारात्मक रत्नांसोबत विषरुपी नकारात्मक रत्नही बाहेर पडतो...हे मंथन कासवाच्या रुपात असलेल्या संस्कारांच्या खंबीर पाठीवर घडत असते..
संस्कारांची खंबीर पाठ असुनही विष का बाहेर पडावे..कारण ते अटळ आहे..
प्रत्येक गोष्ट सकारात्मक घडत गेली तर🤔🤔 आयुष्याला अर्थ तो काय?
अश्रुंना अर्थ तो काय?
'उभारी घ्या,खचु नका'..हे शब्द काल्पनिकच राहीले नसते का जर सगळ चांगलच घडल असत तर??
वाईट प्रसंगामुळे स्वत्वाची जाणीव होते,आपण कोण आहोत याचा प्रत्यय येतो..ती ही झाली नसती कदाचित..जर वाईट घडलच
देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेल्या व्यक्तीला मारणारा आज देशातल्या एका विशिष्ट वर्गासाठी नायक,देशभक्त ठरलाय.आजच्या थ्रेडमध्ये
१)#नथुराम_गोडसे
२)#गांधीजी व हत्या
३) वल्लभभाई पटेल व त्यांचा RSS विरोध
४)फाशीवेळीस गोडसेची परिस्थिती #रिम#MahatmaGandhi
नथुराम विनायकराव गोडसे चा जन्म 19मे,1910 ला झाला.त्यांच्या जन्मावेळीस भारतात क्रांतिकारी चळवळी चालु झाल्या होत्या.थोड्या कालावधीने गांधीजीं चे भारतात आगमन झाले आणि त्यांनी 1920 ला 'असहकार आंदोलन' पुकारले.नथुरामचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्टल ऑफिसमध्ये कामाला होते.
त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी.नथुराम चे 'नथुराम' नाव पडण्यामागे एक गोष्ट आहे.त्यांचे खरे नाव 'रामचंद्र' होते.पण नथुराम जन्माला यायच्यापुर्वी ३ मुले जन्माला आली आणि अल्पावधीतच मरण पावली.घरच्यांना वाटले की आपल्याला कोणतातरी शाप असावा त्यामुळे मुले दगावत आहेत..म्हणुन त्यांनी 'रामचंद्र'
माझा आजचा धागा मी खुप उद्वीग्न मनाने लिहीत आहे..ज्या देशात हजारो लाखोंनी बलात्कार,अन्याय होतात आणि करणारे उघडपणे फिरतात, त्या देशात एका बलात्कार झालेल्या मुलीचा २ दिवसांपूर्वी मृत्यू झाला🙏🙏..खाली मी विस्तृत घटना सांगण्याचा प्रयत्न केला आहे..सर्वांनी नक्की वाचा🤕🤕 #म#मराठी
१)घटना
२)पोलिस प्रतिक्रिया
१)उत्तरप्रदेश मधील हातरस गावामध्ये १४ सप्टेंबरला समाजाला काळीमा फासणारी घटना घडली..एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला.जिच्यावर बलात्कार झाला ती दलित समाजाची होती आणि कृत्य करणारे upper cast वाले हरामखोर.(वस्तुस्थिती सांगतोय)..
मुलीच्या
कुटुंबाने आणि त्या पिडीतने २३ सप्टेंबरला सांगितल्याप्रमाणे पिडीत,तिची आई आणि भाऊ गुरांसाठी गवत कापायला गेले.तिचा भाऊ आणि आई थोड्याश्या अंतरावरच असताना अचानक मागुन येऊन ४ जणांनी तिच्यावर झडप टाकली..तिच्या गळ्यात आणि डोक्यावर ओढणी टाकुन तिला आत लांबपर्यंत ओढत घेऊन गेले🙏🙏
आत्ताच अधिवेशन संपुष्टात आलं..#CAG(comptroller and Auditor General of India) ने सरकारचा लेखाजोखा मांडला..त्यामध्ये त्यांनी 'स्वच्छ विद्यालय अभियान' अंतर्गत जे शौचालय बांधण्यात आले त्यासाठी सरकारच्या कामावर ताशेरे ओढले असुन कामावर नापसंती दर्शविली आहे. #म#रिम#स्वच्छ_भारत_अभियान
सुरूवातीला आपण CAG म्हणजे काय जाणुन घेऊ:-
राज्यघटनेतील कलम 148 ते 151 मध्ये कॅगबद्दल माहिती दिली आहे..आपण सामान्य जनता जो कर भरतो तो सरकारचा महसुल असुन सरकार ते पैसे कोठे,कसे आणि किती वापरते ह्या सर्वाची तपशीलवार माहिती कॅग आपल्याकडे ठेवते आणि अधिवेशन आले की सभागृहाला माहिती देते
या अधिवेशनात कॅगने मांडलेला रिपोर्ट आपल्याला सगळी खरी परिस्थिती दाखवुन देतयं.2014 ला जी 'स्वच्छ भारत अभियान' योजना चालु झाली त्यात शाळांमध्ये ही शौचालय बांधण्याबद्दल निर्देश देण्यात आले होते..सरकारने देशाला वेगळीच माहिती दिली आणि कॅगने पाहणी केल्यावर वेगळीच माहिती पुढे आली🙏