१)#BPCL खासगीकरण,कंपनी माहिती
२)#share सरकारला फायदा
३)BPCL अस्तित्व
२०२०-२१ बजेटनुसार सरकारला खासगीकरणातुन २.१लाख करोड रु. उभे करायचे आहेत पण सध्या ते अशक्यच आहे..सरकारने #BPCL विकायला काढलीय पण आश्र्चर्याची गोष्ट #RelianceIndustries ने बिडींगमध्ये सहभाग घेतला नाही.रिलायन्स सोबत
जगभरातील नावाजलेल्या कंपन्या जसेकी #saudi_aramco,इंग्लंडची #BP(british petroleum) व फ्रांन्सची #total यांनीही बिडींगमध्ये निरूत्साह दाखवला आहे.
**BPCL बद्दल थोडी माहिती:-
१८८६ साली भारत पेट्रोलियमची नोंद स्काॅटलॅंडमध्ये करण्यात आली कारण तेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते..
आज आपण जी भारत पेट्रोलियम (BPCL) पाहतोय तिचे सुरूवातीचे नाव 'Rangoon(रंगुन) oil and exploration company' असे होते.त्यावेळीस आसाम व बर्मा(आजचा म्यानमार) मध्ये तेलाच्या खाणी शोधण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली होती.आज कंपनीत १२,१५७ कामगार काम करतात.#BPCL मध्ये सरकारची‌ ५२.९%
भागिदारी आहे.अर्थमंत्री सितारामनजी यांच्या म्हणण्यानुसार बिडींग(बोली)चा पहिला टप्पा पार पडला असुन दुसर्या टप्प्यात प्रवेश झाला आहे.बोली लावणार्या कंपन्यांची नावं आत्ताच जाहीर करत नसतात पण ३-४ बिडर्स असावेत असा अंदाज आहे.
बिडींग २ टप्प्यात होतं ते खालीलप्रमाणे:-
१)हा टप्पा पूर्ण
झाला असुन यात सगळ्या टेक्निकल बाबी तपासल्या जातात..म्हणजे जर समजा २०-३० कंपन्यांनी बिडींगसाठी इच्छा व्यक्त केलीय तर त्यातील आर्थिकदृष्ट्या किती कंपन्या सक्षम आहेत व विकत घेण्यासाठी पात्र आहेत हे तपासले जाते..समजा त्यातील १० कंपनी पात्र आहेत तर
२)या टप्प्यात त्यातील सर्वात जास्त
बोली लावणारी कंपनी बिडींग जिंकते!!

**शुक्रवारी शेअर मार्केट बंद होताना #BPCL #Share_price ४१२.७० रु. होता ज्यातुन सरकारला ४७,४३० करोड रू. मिळु शकतात.(५२.९% शेअर)
हे ५२.९% शेअर घेतल्यावर त्या कंपनीला BPCL चे अतिरिक्त २६% शेअर विकत घ्यावे लागतील ज्यातुन सरकारला अतिरिक्त
२३,२७६ करोड रु. मिळतील.
आत्ता गुगल केल तर BPCL च्या शेअरची किंमत ३८२/३८३ रु. झाली असुन जेवढ्या लवकरात लवकर ही डील होईल तेव्हढा जास्तीत जास्त नफा सरकारला मिळेल.🙏🏻👍
**आता BPCL विकत घेणार्या कंपनीला फायदा काय होईल ते पाहु:-
१)भारतीय ऑईल मार्केटमधील जवळपास ११% हिस्सा #BPCL चा आहे.
२)भारतातील एकुण तेल शुद्धीकरण क्षेत्रातील १५.३३% हिस्सा #BPCL चा आहे.
#BPCL कडे खालील ४ तेल शुद्धीकरण केंद्रे आहेत..
मुंबई (महाराष्ट्र),कोची(केरळ),बिना(मध्यप्रदेश) व नुमालीगढ(आसाम)
३)२२% Fuel Marketing #BPCL कडे आहेत.
४)#BPCL कडे सध्या १७,१३८ पेट्रोल पंप,६१५१ LPG Mumbai refinery
वितरण केंद्र व देशभरातील जे २५६ विमान इंधन केंद्र आहेत त्यातील ६१ इंधन केंद्र आहेत.
५)#BPCL मार्केटिंगमध्ये देशात २ नंबरला असुन वार्षिक उलाढालीत देशात ६ नंबरला आहे.
#म #मराठी #रिम #bpcl #privitisation #Modi #modigovernment #finance #financeministry #FinanceMinister
@me_swanandi

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🔥वसुसेन 🔥

🔥वसुसेन 🔥 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @realkunal7

18 Nov
जेव्हढं लागत त्यापेक्षा जास्त संचय करणे हा मनुष्याचा स्वभाव गुणधर्मचं.आपली व आपली येणारी पिढी जास्तीत जास्त प्रमाणात निश्चिंत कशी राहील ह्यासाठीचा सगळा खटाटोप.उपलब्ध क्षेत्रात उत्पादनाला मर्यादा यायला लागल्या की माणसाने विस्तारीकरण अंगिकारले व स्वतामध्ये बाकीच्या @faijalkhantroll
प्राण्यांपेक्षा जास्त असलेल्या उपजत बुद्ध्यांकाचा वापर करून प्रगती साधली.हे सगळे करताना दुसर्या बाजुला समांतरपणे चालु असलेले निसर्गाचे नुकसान जाणीवपूर्वक डोळेझाक करुन टाळत आला.पण म्हणतात ना जखमेवर आवश्यक ते दवापाणी न करता ती तशीच झाकली तर एक दिवस ती चिघळणारच.. @AtulAmrutJ
'मीच श्रेष्ठ आविर्भाव' विनाशाकडे घेऊन जातो हे अगदी प्राचीन काळापासून सउदाहरण दिसत आले आहे‌.
'Karma is real'. कर्मा ही संकल्पना माहित असेलच...कर्मा समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो.रामायणामध्ये बाली/वाली नावाचा वानर होता.त्याला हरवणे खुप अवघड होते परंतु
Read 6 tweets
9 Nov
महाराष्ट्रात विधानपरिषद ‌पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असुन येत्या १ डिसेंबर ला मतदान होईल!
खालील धाग्यात
१)विधानपरिषदेची स्थापना
२) विधानपरिषदेची रचना
३)एकुण किती राज्यात वि.प.असुन उमेदवार पात्रता
४)पदवीधर व शिक्षक मतदार पात्रता
५)मतदान पद्धत
#म #threadकर Image
महाराष्ट्रातील जी विधानपरिषद आहे तसा तिचा इतिहास हा स्वातंत्रपुर्व काळातील आहे.विधानपरिषद अथवा परिषदेसारखी सामाईक संरचना असलेली परिषद 'इंडियन कौन्सिल ॲक्ट-१८६१' नुसार बाॅंम्बे प्रांतात स्थापन करण्यात झाली.
टीप:-त्यावेळी मुंबईला बाॅंम्बे म्हणायचे.
१९३५ ला जो कायदा आला @irajratna
त्यानुसार राज्यात जुलै १९३७ ला विधानपरिषद अस्तित्वात आली.स्थापनेनंतर जी पहिली बैठक झाली ती पुणेमध्ये कौन्सिल हॉल ला २० जुलै,१९३७ ला घेतल्या गेली.दुपारी २ वाजता ही बैठक पार पडली.१९५५ पर्यंत परिषदेचे जे पावसाळी अधिवेशन होते ते पुण्यातच भरायचे..पण ज्यावेळीस 'नागपुर करार' झाला Image
Read 13 tweets
8 Nov
आजच्या थ्रेडमध्ये चीन ने जॅक मा यांच्या ॲंटग्रुप IPO‌ बद्दल जी कठोर पाऊलं उचलली आहेत त्याबद्दल लिहीलं आहे..
थ्रेडमध्ये
१)IPO,FPO आणि त्याची ऐतिहासिक किंमत
२)ॲंट ग्रुप,सौदी अरामको व अली पे
४)IPO suspend करण्यामागे नक्की कारणं काय असु शकतात इ..
#म #मराठी #रिम #threadकर #alibaba Image
तुम्हाला मुळात चीनचे असणारे व जगातील इ-काॅमर्स क्षेत्रातील महाबलाढ्य नाव म्हणजेच 'जॅक मा' माहित असतीलच!!
तर विषय असा आहे की त्यांची #alibaba नावाची इ-काॅमर्स कंपनी आहे.इ-काॅमर्स कंपनी म्हणजे भारतात जशी ॲमेझोन आहे अगदी तशीच ती चीनमध्ये आहे..पण तिच्यासोबत जॅक मा यांची Image
आणखी एक कंपनी आहे.तिच नाव आहे #ANTGROUP..या ॲंटग्रुपचे जे IPO बाजारात येणार होते त्यावर चीनने बंदी घातली आहे.प्रथम आपण IPO(Initial Public Offering)म्हणजे काय समजुन घेऊ.
जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारात विस्तार करायचा असेल तेव्हा तिला पैसा लागतो..त्यावेळीस ती एकतर बॅंकेकडुन पैसे घेऊ Image
Read 12 tweets
4 Nov
आजच्या या थ्रेडमध्ये #Tata कंपनी व #Apple कंपनीबद्दल माहिती सांगितली आहे..tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खालील धाग्यात
1)डील बद्दल..
2)#Titan चा सहभाग
3) तमिळनाडूच का?
इ..

जाणुन घेऊ
#म #रिम #threadकर
टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड
Read 14 tweets
3 Nov
आता लवकरच अमेरिकेचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष घोषित होतील..मी काल ट्रंप आणि बिडेन यांच्यामधील प्राथमिक फरक सांगितला होता..त्या धाग्याची लिंक खाली आहेच! आज आपण त्या दोघांचा भारताप्रती नक्की काय दृष्टिकोन आहे याबद्दल जाणुन घेऊया..
#म #मराठी #रिम #USAElections2020 #Trump2020 #Biden2020
१)अमेरिकेतील भारतीय कायम डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देतात ज्याचे उमेदवार सध्या #Biden आहेत.पण ह्यावेळीस #corona पार्श्र्वभूमीवर #trump यांनी चीनला ज्याप्रकारे धारेवर धरले..त्यात कोरोनाला सरळ सरळ चीनी वायरस संबोधणे अथवा ट्रेड वाॅर इ. यामुळे भारतीय ट्रंपच्या बाजुने झुकलेले असावेत
दुसरीकडे बिडेन पाकिस्तान च्या बाजुने कृती करत असल्याचे दिसुन आले ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला ६०० मिलीयन$ ची मदत घोषित केली जी मदत ट्रंपनी आर्ध्यावरच आणलीय.पाकिस्तानच्या मते त्यांना ते पैसे दहशतवाद व आतंकवाद विरोधात वापरायचेत पण वस्तुस्थिती आपणा सर्वांनाच माहीती आहे🙏🙏
Read 17 tweets
21 Oct
आजच्या थ्रेडमध्ये #Airtel ने #oneweb सोबत केलेल्या ऐतिहासिक डीलबद्दल जाणुन घेऊया..ज्यामध्ये ही डील नक्की काय आहे, #Satellite_internet,one web बद्दल सविस्तर माहिती,Airtel च भविष्य,#jio,#brexit,satellite internetमध्ये गुंतलेली नावे,#sharemarket..हे जाणुया..#म #धागा @dreamzunite
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची‌ ऐतिहासिक ४५%‌‌ भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी‌ चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!