जेव्हढं लागत त्यापेक्षा जास्त संचय करणे हा मनुष्याचा स्वभाव गुणधर्मचं.आपली व आपली येणारी पिढी जास्तीत जास्त प्रमाणात निश्चिंत कशी राहील ह्यासाठीचा सगळा खटाटोप.उपलब्ध क्षेत्रात उत्पादनाला मर्यादा यायला लागल्या की माणसाने विस्तारीकरण अंगिकारले व स्वतामध्ये बाकीच्या @faijalkhantroll
प्राण्यांपेक्षा जास्त असलेल्या उपजत बुद्ध्यांकाचा वापर करून प्रगती साधली.हे सगळे करताना दुसर्या बाजुला समांतरपणे चालु असलेले निसर्गाचे नुकसान जाणीवपूर्वक डोळेझाक करुन टाळत आला.पण म्हणतात ना जखमेवर आवश्यक ते दवापाणी न करता ती तशीच झाकली तर एक दिवस ती चिघळणारच.. @AtulAmrutJ
'मीच श्रेष्ठ आविर्भाव' विनाशाकडे घेऊन जातो हे अगदी प्राचीन काळापासून सउदाहरण दिसत आले आहे.
'Karma is real'. कर्मा ही संकल्पना माहित असेलच...कर्मा समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो.रामायणामध्ये बाली/वाली नावाचा वानर होता.त्याला हरवणे खुप अवघड होते परंतु
रामाने त्याचा वध केला(त्रेता युग).जेव्हा महाभारत घडुन गेले तेव्हा कृष्णाचा वध(अवतार पुर्ण करण्यासाठी औपचारिकता) 'जरा' नावाच्या शिकारीने केला, तो 'जरा' म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन रामायणामधला 'वालीच'.(द्वापार युग)
सांगायच तात्पर्य म्हणजे कर्मा देवालाही चुकला नाही आपण तर मनुष्य.
पृथ्वी सगळ्यांसाठी समान असुन सगळ्या पशु पक्षांची(माणसाची सुद्धा) प्राथमिक गरजा भागविण्याची क्षमता हिच्यात आहे परंतु क्षमतेपेक्षा जास्त झाले की संतुलन बिघडायला चालु होते.अलिकडे हा प्रकार जरा जास्तच दिसत आहे.(महापुर,जागतिक तापमानवाढ इ.) @me_swanandi @
शेवटी महात्मा गांधींचे एक वाक्य खुप काही सांगुन जातं,"Earth provides enough to satisfy every man's needs but not every man's greed."
त्यामुळे गरजेपेक्षा जास्त गोष्टीचा हव्यास विनाशाला कधीही आमंत्रण देऊ शकतो.. #म#मराठी#रिम#पर्यावरण#environment#ParisAgreement @ImLB17
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
१)#BPCL खासगीकरण,कंपनी माहिती
२)#share सरकारला फायदा
३)BPCL अस्तित्व
२०२०-२१ बजेटनुसार सरकारला खासगीकरणातुन २.१लाख करोड रु. उभे करायचे आहेत पण सध्या ते अशक्यच आहे..सरकारने #BPCL विकायला काढलीय पण आश्र्चर्याची गोष्ट #RelianceIndustries ने बिडींगमध्ये सहभाग घेतला नाही.रिलायन्स सोबत
जगभरातील नावाजलेल्या कंपन्या जसेकी #saudi_aramco,इंग्लंडची #BP(british petroleum) व फ्रांन्सची #total यांनीही बिडींगमध्ये निरूत्साह दाखवला आहे.
**BPCL बद्दल थोडी माहिती:-
१८८६ साली भारत पेट्रोलियमची नोंद स्काॅटलॅंडमध्ये करण्यात आली कारण तेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते..
आज आपण जी भारत पेट्रोलियम (BPCL) पाहतोय तिचे सुरूवातीचे नाव 'Rangoon(रंगुन) oil and exploration company' असे होते.त्यावेळीस आसाम व बर्मा(आजचा म्यानमार) मध्ये तेलाच्या खाणी शोधण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली होती.आज कंपनीत १२,१५७ कामगार काम करतात.#BPCL मध्ये सरकारची ५२.९%
महाराष्ट्रात विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असुन येत्या १ डिसेंबर ला मतदान होईल!
खालील धाग्यात
१)विधानपरिषदेची स्थापना
२) विधानपरिषदेची रचना
३)एकुण किती राज्यात वि.प.असुन उमेदवार पात्रता
४)पदवीधर व शिक्षक मतदार पात्रता
५)मतदान पद्धत #म#threadकर
महाराष्ट्रातील जी विधानपरिषद आहे तसा तिचा इतिहास हा स्वातंत्रपुर्व काळातील आहे.विधानपरिषद अथवा परिषदेसारखी सामाईक संरचना असलेली परिषद 'इंडियन कौन्सिल ॲक्ट-१८६१' नुसार बाॅंम्बे प्रांतात स्थापन करण्यात झाली.
टीप:-त्यावेळी मुंबईला बाॅंम्बे म्हणायचे.
१९३५ ला जो कायदा आला @irajratna
त्यानुसार राज्यात जुलै १९३७ ला विधानपरिषद अस्तित्वात आली.स्थापनेनंतर जी पहिली बैठक झाली ती पुणेमध्ये कौन्सिल हॉल ला २० जुलै,१९३७ ला घेतल्या गेली.दुपारी २ वाजता ही बैठक पार पडली.१९५५ पर्यंत परिषदेचे जे पावसाळी अधिवेशन होते ते पुण्यातच भरायचे..पण ज्यावेळीस 'नागपुर करार' झाला
आजच्या थ्रेडमध्ये चीन ने जॅक मा यांच्या ॲंटग्रुप IPO बद्दल जी कठोर पाऊलं उचलली आहेत त्याबद्दल लिहीलं आहे..
थ्रेडमध्ये
१)IPO,FPO आणि त्याची ऐतिहासिक किंमत
२)ॲंट ग्रुप,सौदी अरामको व अली पे
४)IPO suspend करण्यामागे नक्की कारणं काय असु शकतात इ.. #म#मराठी#रिम#threadकर#alibaba
तुम्हाला मुळात चीनचे असणारे व जगातील इ-काॅमर्स क्षेत्रातील महाबलाढ्य नाव म्हणजेच 'जॅक मा' माहित असतीलच!!
तर विषय असा आहे की त्यांची #alibaba नावाची इ-काॅमर्स कंपनी आहे.इ-काॅमर्स कंपनी म्हणजे भारतात जशी ॲमेझोन आहे अगदी तशीच ती चीनमध्ये आहे..पण तिच्यासोबत जॅक मा यांची
आणखी एक कंपनी आहे.तिच नाव आहे #ANTGROUP..या ॲंटग्रुपचे जे IPO बाजारात येणार होते त्यावर चीनने बंदी घातली आहे.प्रथम आपण IPO(Initial Public Offering)म्हणजे काय समजुन घेऊ.
जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारात विस्तार करायचा असेल तेव्हा तिला पैसा लागतो..त्यावेळीस ती एकतर बॅंकेकडुन पैसे घेऊ
आजच्या या थ्रेडमध्ये #Tata कंपनी व #Apple कंपनीबद्दल माहिती सांगितली आहे..tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खालील धाग्यात
1)डील बद्दल..
2)#Titan चा सहभाग 3) तमिळनाडूच का?
इ..
टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड
आता लवकरच अमेरिकेचे अधिकृत राष्ट्राध्यक्ष घोषित होतील..मी काल ट्रंप आणि बिडेन यांच्यामधील प्राथमिक फरक सांगितला होता..त्या धाग्याची लिंक खाली आहेच! आज आपण त्या दोघांचा भारताप्रती नक्की काय दृष्टिकोन आहे याबद्दल जाणुन घेऊया.. #म#मराठी#रिम#USAElections2020#Trump2020#Biden2020
१)अमेरिकेतील भारतीय कायम डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देतात ज्याचे उमेदवार सध्या #Biden आहेत.पण ह्यावेळीस #corona पार्श्र्वभूमीवर #trump यांनी चीनला ज्याप्रकारे धारेवर धरले..त्यात कोरोनाला सरळ सरळ चीनी वायरस संबोधणे अथवा ट्रेड वाॅर इ. यामुळे भारतीय ट्रंपच्या बाजुने झुकलेले असावेत
दुसरीकडे बिडेन पाकिस्तान च्या बाजुने कृती करत असल्याचे दिसुन आले ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला ६०० मिलीयन$ ची मदत घोषित केली जी मदत ट्रंपनी आर्ध्यावरच आणलीय.पाकिस्तानच्या मते त्यांना ते पैसे दहशतवाद व आतंकवाद विरोधात वापरायचेत पण वस्तुस्थिती आपणा सर्वांनाच माहीती आहे🙏🙏
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची ऐतिहासिक ४५% भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..