श्रीमान @rautsanjay61 विचारतायत की, नेहरूंशी वैर का? राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी या थ्रेडमध्ये देतोय,
नेहरूंनी त्यांच्या कारकीर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची अनेकदा गळचेपी केली. त्याची ही काही उदाहरणे (१/n)
#Nehru
#Modi
नेहरूंनी केंद्रीय कायदामंत्री #बाबासाहेब #आंबेडकर यांना डावलून गोपालस्वामी अय्यंगार यांच्या हातून कलम ३७०चा मसुदा तयार करून घेतला आणि लोकसभेत बळजबरीने मंजूरही करून घेतला. देशाच्या कायदामंत्र्याला डावलून घटनादुरुस्ती झाल्याची ही भारतातली एकमेव घटना आहे. (२/n)
कलम ३७० हे भारत आणि भारतीयांवर अन्याय करणारे आहे असे #बाबासाहेब #आंबेडकर यांचे ठाम मत होते. कारण, नेहरूंनी जम्मू-काश्मीर विधानसभेला अमर्याद अधिकार देऊ केले होते. (३/n)
त्यामुळे, जम्मू-काश्मीरचे नागरिक भारतीय नागरिक असतील. पण, भारतीय नागरिक जम्मू-काश्मीरचे नागरिक असतीलच असे नाही असे सांगणारा कायदा पुढे संमत झाला. (४/n)
नंतर, नेहरूंनी १४/५/५४ रोजी ३५(अ) ही #घटनादुरुस्ती करवून घेतली. त्याच्याचमुळे, जम्मू-काश्मीर विधानसभेला भारतीय राज्यघटनेतील ४२व्या घटनादुरुस्तीने घातले गेलेले #सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्षतेचे तत्व न स्वीकारण्याचे बळ मिळाले. (५/n)
#कलम३७०
#Article370
देशातला पहिला भ्रष्टाचार आणि तो ही लष्करी साहित्यात झाला तो नेहरूंच्या सरकारमध्ये. हा भ्रष्टाचार लष्करी जीप खरेदीत केला तो कृष्ण मेनन या नेहरूंच्या लाडक्या व्यक्तीने आणि तो ही संरक्षण मंत्री नसताना. (६/n)
#corruption
#JeepScam
मेनन यांनी १९४८ला ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त असताना परस्पर ८० कोटी रुपयात १५५ लष्करी जीप खरेदी केल्या. तिथून भारत सरकारला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले. (७/n)
#corruption
#JeepScam
#Nehru
नेहरूंनी मेननकडे थेट दुर्लक्ष केलं आणि मेनन भारतात आल्यावर त्यांना बिनखात्याचा केंद्रीय मंत्री बनवून कायद्याची कवचकुंडले प्रदान केली. (८/n)
#मेनन उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडून जाईपर्यंत बिनखात्याचे मंत्री होते आणि नंतर तेच मेनन नेहरू मंत्रिमंडळात थेट #संरक्षण_मंत्री झाले. म्हणूनच #काँग्रेस पक्षाला भ्रष्टाचाराची गंगोत्री म्हटलं जातं. (९/n)
#Congress
@INCIndia
#Nehru
#Corruption
.#अभिव्यक्ती_स्वातंत्र्य याच्या गळचेपीत तत्कालीन #नेहरू सरकारचा हात कुणीही धरू शकणार नाही. याबाबतची उदाहरणे आता देतोय. ती आजच्या पिढीला अज्ञात आहेत. म्हणूनच सांगणे गरजेचे आहे. (१०/n)
#FOE
#Nehru
#Congress
नेहरूंनी 'प्रसारमाध्यमे मजकूर प्रसारण प्रतिबंधक कायदा' लागू केला. यामुळे, हिंदुस्थान टाइम्सचे संपादक दुर्गादास आणि स्तंभलेखक विवेक यांना कामावरून काढले गेले. या दोघांनीही नेहरूंच्या धोरणावर टीका केली होती. (११/n)
#FOE
#Nehru
#Congress
नेहरूंच्या धोरणावर टीका केली म्हणून टाइम्स ऑफ इंडियाच्या सरकारी जाहिराती बंद केल्या गेल्या. नियतकालिक 'क्रॉसरोड'चा प्रकाशन परवाना रद्द केला. प्रल्हाद केशव अत्रे यांना नेहरू यांच्यावर टीकेसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. (१२/n)
#FOE
#Nehru
#Congress
.#क्रॉसरोड या नियतकालिकाचा प्रकाशन परवाना रद्द केला. प्रल्हाद केशव #अत्रे यांना #नेहरू यांच्यावर टीकेसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली.
#राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे भाषण नेहरूंनी माध्यमांना वितरित होऊ दिले नाही.
(१३/n)
#केरळ विधानसभेत निवडणूक लढून जिंकलेले #कम्युनिस्ट सरकार नेहरूंनी बरखास्त केले. नेहरु यांनी घोषित केले की, कम्युनिस्टांना देशात निवडणूक लढण्यापासून रोखले पाहिजे.
(१४/n)
#Nehru
#CommunistParty
#Kerala
#नेहरू यांच्यावर टीका केली म्हणून #गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना नेहरूंनी एक वर्ष तुरुंगात टाकले. एककल्ली, हट्टी आणि हेकेखोर वागत असल्याबद्दल नेहरू यांना #मजरुह_सुल्तानपुरी यांनी 'हिटलर का चेला' असे संबोधले होते.
(१५/n)
#MajroohSultanpuri
#नेहरू यांनी #आकाशवाणी या सरकारी रेडिओवर #हार्मोनियम वाजवायला बंदी घातली.
नेहरूंनी आकाशवाणीवर पाश्चात्य #पॉप_संगीत ऐकवायला बंदी घातली. नेहरूंनी तशीच बंदी काही हिंदी गाण्यांवरही घातली.
(१६/n)
#Nehru
#AIR
#AllIndiaRedio
#नेहरू यांनी बंदी घातलेली #पुस्तके अशी आहेत - नाईन अवर्स टू रामा, चंद्रमोहिनी, द हार्ट ऑफ इंडिया, द लोटस इन द रोबोट, कॅप्टीव कश्मीर, अनआर्मड विक्ट्री, अ डार्क हर्ड, व्हॉट रिलीजन डन फॉर मॅनकाइंड, द रामा री टोल्ड इत्यादी
(१७/n)
#Nehru
#NehruBanBooks
#FOE
नेहरूंशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या देशातील सरकारांच्या विरोधातली प्रकाशने भारतात आयात करण्यास बंदी घालण्यात आली.
नेहरूंनी मुक्त चित्रकलेच्या अंतर्गत येणाऱ्या कलाविष्काराला असभ्य ठरवत आयातबंदी लागू केली. (१८/n)
#NehruBansPaintings
#नेहरू यांनी 'गोकुळ शंकर, पार्थसारथी, नास्तिक, गंगाजमुना, जुगनु, झरना हे #चित्रपट प्रदर्शित होऊ दिले नाहीत. नेहरूंनी 'फिर सुबह होगी' या चित्रपटातील २ #गाणी स्वतःच्या विरोधात गेल्यासारखी वाटल्याने हटवायला लावली.
(१९/n)
#Nehru
#NehruBansFilms
#NehruBansTheatre
#नेहरू यांनी गुरुदेव #रवींद्रनाथ #टागोर लिखित 'गोरा' आणि 'विसर्जन' तसेच, #शरतचन्द्र #चटोपाध्याय लिखित 'महेश', #बलराज #साहनी लिखित 'जादू की कुर्सी' या नाटकांवर बंदी घातली. पीपल्स थिएटर असोसिएशन या नाट्य चळवळीवरही बंदी घातली. (२०/n)
#NehruBansTheatre
#Tagore
#नेहरू यांनी युद्धविषयक धोरणावर टीका केली म्हणून भारत-चीन युद्धानंतर #इतिहासकार #धर्मपाल यांना तुरुंगात टाकले.
नेहरूंनी #१९६२ सालच्या युद्धातील पराभवावर बनलेला चित्रपट 'भूल न जाना' प्रदर्शित होऊ दिला नाही. (२१/n)
#Nehru
#1962War
#Indo_China_1962_War
#नेहरू यांच्या हट्टापायी कृष्ण #मेनन या निर्बुद्ध संरक्षणमंत्र्याने लढाईच्या डावपेचात थेट हस्तक्षेप केले आणि भारत-चीन युद्धात त्याची जबर किंमत आपण मोजली. याची चर्चा होऊ नये म्हणून 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणं ऐकून #नेहरू_रडले हा बनाव रचला गेला.
(२२/n)
#नेहरू यांनी #पाकिस्तान सोबतच्या युद्धात भारतीय सैन्याला घुसखोरांनी गिळंकृत केलेला भूभाग संपूर्णपणे परत मिळवायला होकार दिला नाही.
(२३/n)
#Nehru
#IndianArmy
#Indo_Pak_War
#नेहरू यांनी #काश्मीर अब्दुल्ला घराण्याच्या ताब्यात रहावे यासाठी तेव्हाच्या विधानसभेतल्या ७५ पैकी ४३ जागा काश्मीर भूभागात ठेवल्या आणि तत्कालीन स्थितीत जम्मूला मुद्दाम डावलत विधानसभेत काश्मीरच्या तुल्यबळ होऊ दिले नाही.
(२४/n)
#Nehru
#Kashmir
जनगणना न करताच नेहरूंनी #जम्मू आणि #काश्मीर विधानसभेची निवडणूक होऊ दिली आणि #नॅशनल_कॉन्फरन्स विजयी असा ठराव, विरोधकांना उडवून लावत लोकसभेतील पाशवी बहुमताच्या जोरावर संमत करून घेतला. तेव्हा, नेहरूंकडे लोकसभेत ३६४ खासदार होते.
(२५/n)
#Nehru
#Kashmir
#नेहरू यांनी #काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेला आणि कायमचा किचकट बनवला. भारताच्या संरक्षण समितीचे प्रथम अध्यक्षपद कुणा भारतीयाला न देता लॉर्ड #माउंटबॅटनला दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी चीनला पाठिंबा दिला. (२६/n)
#NehruAtUN
@rautsanjay61, #नेहरू स्वतःला भारताहून श्रेष्ठ समजत. त्या अहंकारातून केलेल्या घोडचुकांची अशी अनेक उदाहरणे अजूनही देता येतील. तेव्हा, नेहरू-गांधी घराण्याच्या उदात्तीकरण ब्रिगेडमध्ये जाऊ नका. कारण, बाळासाहेबांनी आपल्या माथी #अस्मिता हे गोत्र गोंदवले आहे. (२७/n)
वाचकहो, #नेहरू यांच्याप्रमाणे #नरेंद्र_मोदी खुनशी नसल्याने @rautsanjay61 यांना आजही वाटेल ते लिहायची मुभा आहे आणि त्यात ज्या तथ्यात्मक चुका पेरल्या जात असतील त्याचा प्रतिवाद करायचा अधिकार आम्हालाही आहे.
(२८/n)
@narendramodi
@BJP4India
@INCIndia
@INCMaharashtra
बाकी, @RahulGandhi यांनी खांद्यावर हात ठेवल्यापासून पत्रकार संजय राऊत यांची भाषाच बदललीय. हे खेदजनकच. (२९/n)
#Nehru
@SaamanaOnline
@INCMaharashtra
#RahulGandhi
नेहरू यांच्याशी वैर का? असं जनतेला विचारण्याआधी जुने संदर्भ धुंडाळले असते तर? @ShivSena @rautsanjay61
ndtv.com/india-news/udd… (३०/n)
नेहरू यांच्याशी वैर का? असं जनतेला विचारण्याआधी जुने संदर्भ धुंडाळले असते तर? @SaamanaOnline @ShivSena @rautsanjay61
ndtv.com/india-news/aut…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Prasad Kathe

Prasad Kathe Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PrasadVKathe

21 May
Thread
More shocking details on #MVA propaganda against #ventilators by #PMCaresFunds at Govt. Medical College & Hospital, Aurangabad, Maharashtra, are as follows,
@PMOIndia
@narendramodi
#PMCares
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या खुलाशात अनेक बाबी गायब. खुलाशात सरकारी व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात लावल्याची बाब का दडवण्यात आलीय?
खासगी रुग्णालयात सरकारी व्हेंटिलेटर कुणाच्या आदेशाने लावले? यावर खुलाशात मौन का? विभागाचे मंत्री पण का गप्प?
Read 9 tweets
17 May
Thread
The lies of #MVA over faulty #Ventilators at Aurangabad Medical College is exposed in an audit report. @PIB_India has shared the details. Read the thread
@PMOIndia
@narendramodi
#PMCaresFund
१९ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला १०० व्हेंटिलेटर पुरवले गेले.
यापैकी, २३ व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात वळवले गेले.
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वापरात असलेले २० व्हेंटिलेटर गुपचूप एमजीएम रुग्णालयात लावले गेले.

एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर लावताना उत्पादक कंपनीला कसलीही कल्पना दिली गेली नाही.
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(