नमस्कार. आज, ४ मे. एका वर्षा पूर्वी, भारतातील पहिले पुस्तकांचे गाँव, भिलार, (ता. महाबळेश्वर, जि.सातारा), याचे लोकार्पण झाले.
भिलार हे महाबळेश्वर आणि पाचगणी च्या मधे वसलेले गाव. प्रकल्पाची संकल्पना मराठी भाषा विभागाची होती.
राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ जवळ असलेले गाव जिथे किमान २० घरांचे मालक स्वेच्छेने सहभागी होत होते, असे गाव निवडले.
प्रकल्पात सहभागी घरे विनाशुल्क जागा उपलब्ध करून देत आहेत.
घरे, लॉज, शाळा, मंदिरे अश्या २५ सार्वजनिक व खासगी ठिकाणी पुस्तकांची विविध प्रकारांची दालने आहेत.
सध्या गावात १५,००० मराठी पुस्तके आहेत. आपण जाऊन, निवांत दिवसभर वाचू शकता. पुस्तके न्यायची सोय नाही पण विकत घेऊ शकता.
लोकसाहित्य, इतिहास, शिवकालीन इतिहास, कादंबरी, कथा, कविता, स्त्री साहित्य, ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी विजेते आदी साहित्य प्रकार आहेत.
लवकरच इंग्रजी आणि हिंदी पुस्तकं ठेवण्यात येतील आणि आपणही गावाला पुस्तके भेट देऊ शकता.
Cc: @TawdeVinod @Dev_Fadnavis