Discover and read the best of Twitter Threads about #thanksdrambedkar

Most recents (24)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाची, संघर्षाची, मानवी क्रांतीची धगधगती मशाल…

महारिनिर्वाण दिनाच्या पुर्वसंध्येला त्यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई इथे पार पडला.

आपण #LetsReadIndia च्या माध्यमातून अत्याधूनिक तंत्रज्ञानयुक्त #Library ऊभारण्याकामी खारीचा

१/१२ Image
वाटा उचलला.

हे संपुर्ण स्मारकच अत्यंत आकर्षक असून त्यात बाबासांहेबांच्या जीवनप्रवासवर अत्यंत वेगळे आणि सुंदर संग्रहालय, तसेच इतर अनेक बाबींचा समावेश आहे.

इथे वाचनालयात बाबासाहेबांविषयी पाच हजारावर पुस्तके तसेच ऑडीयो , व्हीडीओ आणि इबुक्स तर आहेतच शिवाय या सर्वांचे नियमन
२/१२ Image
तसेच पुस्तकांचे आदानप्रदान करण्यासाठी आपण लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमचे स्पेशल सॅाफ्टवेअर, आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी बुक बारकोडींग यंत्रणा, तसेच इतर सर्व आधूनिक तांत्रिक बाबी दिलेल्या आहेत.

हे अशा प्रकारचे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांवरील पहिलेच स्मारक असेल जिथे इतक्या अत्याधूनिक
३/१२ Image
Read 12 tweets
कैसे अकेले बाबा साहेब ने करोड़ों लोगों की जिंदगी बदल दी-

फर्ज कीजिए बाबा साहेब इस दुनिया में आए ही नहीं होते तो..!! तो आज यहां महिलाओं की स्थिति क्या होती? वंचितों की स्थिति क्या होती? संविधान लागू होने से पहले इस देश में महिलाओं और शूद्रों की स्थिति जानवरों से भी बदतर थी. 1/1
सवर्ण जानवर को तो टच करता था, गौमूत्र और गोबर का सेवन भी करता था, लेकिन दलितों की परछाई पड़नेभर मात्र से उन्हें लिंच तक कर देता था. महिलाओं और शूद्रों को पढ़ने देने तक का अधिकार नहीं था क्योंकि यहां बीमार और दुष्ट व्यक्ति मनु का विधान चलता था. 2/2
दलितों को गांव से बाहर रखा जाता था, उनके पहनावे, खाने, रंग हर चीज से नफरत की जाती थी. उनपर तमाम तरह की गालियां बनाई गई, स्तन कर जैसे अमानवीय टैक्स लगाए गए, गर्दन में बर्तन और कमर पर झाड़ू लटकाना पड़ता था, ताकि सो कॉल्ड सवर्ण समाज 'अपवित्र' न हो जाए. 3/3
Read 11 tweets
☆ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज आपण सर्व ६१वा 'महाराष्ट्रदिन' साजरा करत आहोत.
"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या मागणीतून 'संयुक्त महाराष्ट्र समिती' ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय.
सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे 'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला'
Read 16 tweets
#Threadकर
#AmbedkarJayanti

आज एका कायदेतज्ञाची जयंती आपण साजरी करीत आहोत. वेळोवेळी सामाजिक न्यायासाठी वारंवार आपली भूमिका निर्विवादपणे मांडणाऱ्या आणि समतेवर आधारित देशाचं भविष्य पाहणाऱ्या महामानवाचं स्वप्न अजून तरी पूर्ण झालेलं दिसत नाही.
1/14
#म #रिम
न्यायाची प्रकर्षाने बाजू मांडणाऱ्या भिमरावांचं कायदेतज्ञाच्या रूपाचं दर्शन आपल्याला १९२६ सालच्या दिनकरराव जवळकर खटला, १९२७ सालचा फिलीप स्प्रॅट या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचा खटला आणि १९३४ सालचा रघुनाथ धोंडो कर्वेंचा खटला असो तीनही वादग्रस्त खटल्यांमधून आंबेडकर यांनी…
2/14
...न्यायाची विद्रोही भुमिका घेतलेली दिसून येते. कायदा आणि वकिली हा त्यांचा आवडीचा विषय होता. न्यायालयीन कामकाजांबद्दल पाहणी करण्याची पण त्यांना विलक्षण आवड होती. २३ जुलै १९५० रोजी त्यांनी औरंगाबाद सेशन्स कोर्टाला भेट दिली होती.
3/14
Read 14 tweets
📌१२. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता :
मुंबई मध्ये सुरुवातीला बरीचशी वर्तमानपत्र अस्तित्वात होती परंतु अस्पृश्यांची सुख दुःख त्यामध्ये कधीच मांडली जायची नाहीत. त्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या वेदना ,
प्रश्न, प्रकट करण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरू केले. आणि आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता तेवढीच प्रेरक आणि तेवढीच प्रगतशील आहे. याच त्यांच्या पत्रकारितेची ओळख करून देण्यासाठी आजचा मी हा विषय " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता "निवडला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका निश्चित भूमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते . विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी सरकारने 1917 साली साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने दलितांच्या सामाजिक तसेच राजकीय
Read 25 tweets
📌⓫ परराष्ट्रीय धोरण आणि देशाचा सन्मान....

डाॅ. आंबेडकरांनी राजीनामा दिल्यानंतर 10आॅक्टों 1951 रोजी आपल्या राजीनाम्याची कारणे सभागृहात मांडण्यासाठी ते उपस्थित झाले होते. परंतु त्यांना त्यांचे म्हणने मांडू दिले गले नाही.
[1/n]

#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain
म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा त्याग करुन बाहेर पडले.
डाॅ. आंबेडकरांनी एक पत्रक काढून आपल्या राजीनाम्याची कारणे त्यांत मांडली होती. त्यात अनेक कारणाबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्वाचे कारण होते.

#ThanksDrAmbedkar
[2]
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा राजीनामा प्रस्तुत करत असताना म्हणतात की, मला खरी चिंता आहे ती देशाच्या परराष्ट्र धोरणाची. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपल्या बद्दल वाईट विचार करणारा किंवा आपले वाईट चिंतनारा एकही देश नव्हता.

#ThanksDrAmbedkar
[3]
Read 23 tweets
📌➓ जातिव्यवस्थेवर प्रहार व बौद्ध धर्मांतर.....

बाबासाहेबांनी प्रत्येक मार्गाने अस्पृश्यता निवारण करून पाहिले परंतू दरवेळेस भारतातील जातीय मानसिकतेने बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेच्या एकुण एक प्रयत्नांना सुरूंग लावला.
[1]
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain
हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे.
#ThanksDrAmbedkar
[2]
बाबासाहेबांचा हिंदू धर्म नि समाजव्यवस्थेला असा सवाल होता की,‘जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?

[3]
#ThanksDrAmbedkar
Read 16 tweets
📌➒ लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन....

बाबासाहेबांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करायचे असेल तर "कुटुंबनियोजन" हा एकच प्रभावी पर्याय आहे हे ठासून सांगितले;

[1/n]
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain
@MarathiRT Image
उपलब्ध साधन सामग्रीचे समान वितरण हे गरिबी दूर करण्याचा पर्याय होऊ शकत नाही जोपर्यंत लोकसंख्या आटोक्यात येत नाही आणि तसाही ठराविक समाजाला समान वितरणाचा फायदाच होणार आहे त्यामुळे गरीब आणि शोषित समाजाला जर आर्थिक प्रगती करायची असेल

[2]
#ThanksDrAmbedkar
तर कुटुंब नियोजन हा एकमेव पर्याय आहे असे बाबासाहेब सुचवतात, ३ अपत्यच्यावर जर जन्मदर गेला तर गरिबीदर आणि मृत्यूदर सुद्धा वाढेल असे त्यांचे ठाम मत होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी लोकसंख्यावाढीसारख्या

[3]
#ThanksDrAmbedkar
Read 9 tweets
दिनकरराव जवळकर आणि र. धो कर्वेंच्या वादग्रस्त खटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढवलेल्या तिसर्‍या खटल्याबाबत खूपच कमी जणांना ठाऊक आहे. तर खटला चालला होता फिलीप स्प्रॅट या ब्रिटिश लेखकावर! फिलीप स्प्रॅट ( २६ सप्टेंबर १९०२ - ८ मार्च १९७१ ) हा ब्रिटिश लेखक होता. (1/11) Image
फिलीप हा कम्युनिस्ट होता, फिलीपला ब्रिटिश आर्म ऑफ कम्युनिस्ट इंटरनॅशनल ने भारत आणि मॉस्को येथे कम्युनिझमचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलं होतं. फिलीप हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक मनबेंद्रनाथ रॉय यांचे मित्र आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सभासद होते. (2/11)
भारतीय कम्युनिस्ट चळवळीत चैतन्य उत्पन्न करण्यासाठी ते भारतात आले. फिलीप स्प्रॅट यांनी 'इंडिया अँड चायना' या मथळ्याखाली 'नॅशनल हेरॉल्ड' मधुन लेख लिहीण्याचं कार्य केलं. या लेखांचं संपादन 'क्रांती' या नियतकालिकाचे संपादक श्री मिरजकर यांनी प्रसिद्ध केलं होतं. (3/11)
Read 11 tweets
📌➏ डॉ.बा.आंबेडकर यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी......

‘न शूद्राय यतिविद्ध्यात’ (शुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही) या मनुस्मृतीच्या कायद्याला धिक्कारून, बाबासाहेबांनी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था, चळवळीच्या बलबुत्यावर निर्माण केली.

#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
[1/n]
भारतीय शिक्षणाच्या परिप्रेक्षात बाबासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात, मानवतावादी मूल्ये वर्धीत करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षण संस्थेचे निर्माते, असा चढता आलेख त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात राहिलेला आहे.
#ThanksDrAmbedkar
[2]
बाबासाहेब हे स्वत: उच्च विद्या विभूषित होते. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा महत्वाचा संदेश दिला. भारतातील बहुजन वर्ग अज्ञानात व गुलामगिरित जगत होता. शिक्षणामुळे मनुष्य जागृत होतो .
#ThanksDrAmbedkar
[3]
Read 13 tweets
#ThanksDrAmbedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समाजातल्या अन्यायग्रस्त, मागास, मुख्यप्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांची व त्यांच्या समस्यांची पूर्ण जाणिव होती. त्यांनी आयुष्यभर या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी
खूप संघर्ष केला, खूप सारे प्रयत्न केले. डॉ.आंबेडकर हे आदिवासी समजाच्या, ट्रायबल्सच्या समस्या ओळखून होते, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती आंबेडकरांना माहिती होती. आदिवासी हे त्यांच्या विशेष संस्कृतीनुसार जगणारे लोक आहेत. त्यांचा जंगलातील संसाधनांवर पुर्ण...
हक्क असायचा. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्याकरिता अन्यायकारक फोरेस्ट कायदे आणि लँड रेग्युलेशन द्वारे आदिवासी लोकांच्या या स्वायत्त अधिकारांचे हणन केले, त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले हि सगळी परिस्थिती डॉ.आंबेडकरांना माहिती होती.
Read 11 tweets
#ThanksDrAmbedkar
OBC चे जन्मदाता,कोण आणि कसे?
डॉ.बाबासाहेब आणि OBC च नात:या देशात ओबीसींचे 'संवैधानिक जन्मदाता' आणि 'संवैधानिक रक्षणकर्ते' दुसरं कोणी नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत.१९२८ साली बॉम्बे प्रांताचे गर्वनर 'स्टार्ट' या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली
(१/११)👇
एक मागासवर्गीय(OBC)समूहाची समिती नेमण्यात आली होती.या समितीत बाबासाहेबांनीच शुद्र वर्णातील काही समूहाला Other Backward Class या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला होता.या शब्दाचा shortform OBC होतो.त्या समूहाला आपण आज सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने मागासलेले ओळखतो.(२/११)👇
त्यांची आज ओळख ही OBC म्हणून आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी #स्टार्ट कमिटीसमोर बोलताना देशातील लोकसंख्येचे तीन भागात विभागले:
(१) अप्पर कास्ट
ज्या मध्ये ब्राह्मण,क्षत्रिय आणि वैश्य यांसारख्या उच्च वर्णीय जाती समूहाचा समावेश होता.
२)मागासवर्गीय(Backward Cast):
(३/११)
Read 11 tweets
Thread,
Dr. Babasaheb Ambedkar's massage to OBC's.
Dr. Ambedkar said, "This principle will apply not only to Marathas but all Backward Castes. If they do not wish to be under the thumb of others they should concentrate on two things, one is politics and the other is education.”
“One thing I like to impress on you is that the community can live in peace only when it has enough moral but indirect pressure over the rulers. Even if a community is numerically weak, it can keep its pressure over the rulers and create its dominance as is seen by the example of
the status of present day Brahmins in India. It is essential that such a pressure is maintained, as, without it, the aims and policies of the state can not have proper direction, on which depends the development and progress of the state.”
“At the same time, it must not be
Read 13 tweets
📍 ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून
#ThanksDrAmbedkar #JaiBhim
तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते.

तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात.

१] " अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा
सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदन, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्‍या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात
Read 15 tweets
📌➎ ओबीसी आणि आदिवासींसाठी योगदान....

‘डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून सगळ्यात मोठे उपकार केले आहे.
‘मनुस्मृती’सारख्या प्राचीन ग्रंथांत ज्यांना ‘शूद्र’ संबोधले आहे त्या ‘सेवा करणाऱ्या गावकुसाच्या आत रहाणाऱ्या
[1/n]
#ThanksDrAmbedkar
@LetsReadIndia
@MarathiBrain
@MarathiRT
जाती म्हणजे ओबीसी’, असे ढोबळमानाने म्हणता येईल. त्यामुळे साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, धोबी, कुणबी, आगरी, कोळी, भंडारी, सुतार, लोहार, तांबट अशा सेवाकर्मी शूद्र जाती ओबीसी ठरतात. संविधानाच्या मते,
महाराष्ट्रात वा इतर काही राज्यांत

#ThanksDrAmbedkar
[2]
ज्यांना भटके विमुक्त समजले जाते ते देश पातळीवर ओबीसीच आहेत.या सर्व शूद्र ओबीसींसाठी भारतीय संविधानात कलम३४० आहे.डॉ.आंबेडकरनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यामागे हिंदू कोड बिलासह याच कलम ३४०अन्वये ओबीसी समाजासाठी मागासवर्गीय आयोग न नेमण्याचेही एक प्रमुख कारण होते.
[3]
Read 12 tweets
Thread,
In December last year, the BBC released rare footage of a 1953 interview it conducted with B.R. Ambedkar. The interviewer began with a simple yet profound question: “Dr Ambedkar do you think democracy is going to work in India?”
Ambedkar, without skipping a beat, replied “No.”
Later on in the interview, he elaborated ‘‘Democracy will not work for the simple reason, we have got a social structure which is totally incompatible with parliamentary democracy'
During the Constitution-making process, Ambedkar,
on various occasions, warned members of the Constituent Assembly that “democracy in India is only a top-dressing on an Indian soil, which is essentially undemocratic” But at the same time he was optimistic about constitutional democracy working in India.

However, by 1953, he had
Read 17 tweets
#ThanksDrAmbedkar

"Measure the progress of a community by the degree of progress which women have achieved" हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत. या एका वाक्यावरूनच त्यांनी 100 वर्षांपूर्वी महिलां सक्षमीकरणाची गरज ओळखली होती हे लक्षात येते.
डॉ.आंबेडकरांनी आयुष्यभर महिलांना सक्षम करण्यासाठी, पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, संघर्ष केला. त्यांना महिलांच्या क्षमतेची आणि त्यांच्या सामाजिक सुधारनांमधील भूमिकेची पूर्ण जाणिव होती. डॉ. आंबेडकर म्हनाले होते कि 'माझा महिलांनी उभारलेल्या चळवळीमधे..
पूर्ण विश्वास आहे. जर महिलांना खऱ्या अर्थाने विश्वासात घेतले तर त्या समाजाचे चित्र नक्की बदलू शकतात'. ऐतिहासिक महाड सत्याग्रह मधे डॉ.आंबेडकरांबरोबर महिलांनी लक्षणीय सहभाग घेतला होता.
महिला सक्षमीकरणाची सुरुवात डॉ.आंबेडकरांनी स्वत:च्या घरापासून केली होती. जानेवारी 1928 मधे..
Read 14 tweets
ताई चांगली शिकली उच्चशिक्षित झाली,
बालविवाह न करता वयाच्या पंचविशीत
२-४ पोरांना नापसंद करून ताई ने तिला आवडेल अश्या मुलाशी लग्न केलं,
एकपत्नीत्वाची तरतूद असल्याने ताईच्या जीवनाला स्थैर्य आहे,
घर सोडून सासरी आली पण आई वडिलांच्या संपत्तीत वारसा हक्क घ्यायला विसरली नाही,
उच्चशिक्षणाने ताई ला चांगली नौकरी आहे,
ताई पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून नौकरी करते व तितकंच वेतन घेते,
बोनस आणि PF मुळे ताई च बरं चाललंय,
ताई एक सुजाण कर्मचारी आहे ,
ताईला वुमन & चाईल्ड लेबर प्रोटेक्शन ऍक्ट, मॅटर्निटी बेनिफिट फॉर वुमन लेबर्स आणि वुमन लेबर वेल्फेअर फंड
सारखे कायदे माहीत आहेत.
म्हणूनच तर ताई सध्या गर्भवती आहे आणि घरी बसून पगार घेऊन चांगल्या पद्धतीने तिची व होणाऱ्या बाळाची काळजी घेते.
ताईच्या काही मैत्रीणींनीच नवऱ्यासोबत जमत नाही तर ताई त्यांना घटस्फोट, पोटगी, पुनर्विवाह वर चांगले सल्ले देते.
Read 4 tweets
📍 स्त्रीयांचे पुनरूत्थान :- समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो हे बाबासाहेबांचे वाक्य त्यांच्या मनात स्त्रियांबाबत असलेला आदर स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांचे कार्य,
#ThanksDrAmbedkar #JaiBhim
त्यांची चळवळ, दलितांना मिळवून दिलेले हक्क अधिकार याबाबत नेहमी बोलले जाते.हिंदू कोडबिलाच्या संबंधात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांतील
निगडीत कायदे संमत करीत जाणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करणे होय. शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रसाद बांधण्यासारखे होय. हिंदू संहितेला मी हे महत्त्व देतो.
‌हिंदू धर्मात अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाकरिता व ‌स्त्रियांची विविध प्रकारच्या शोषणातून सुटका व्हावी यासाठी हिंदू कोड बिल,
Read 18 tweets
📌 ➍ स्त्रीयांचे पुनरूत्थान......

"समाजातील स्त्रीची कितपत प्रगती झाली आहे त्यावरून मी त्या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा आलेख ठरवतो."
~ डॉ. बा. आंबेडकर

#ThanksDrAmbedkar
#थ्रेड #Thread
@LetsReadIndia
@MarathiBrain
@MarathiRT
@TUSHARKHARE14
[1/n]
महामानव डॉ. बा. आंबेडकरांनी २०जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स'मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात.

#ThanksDrAmbedkar
[2]
“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा”

एक स्त्री म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास प्रत्येक स्त्रीने आवर्जून म्हणावंच
#ThanksDrAmbedkar
[3]
Read 23 tweets
#ThanksDrAmbedkar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे 1942-46 या काळात व्हॉईसरॉयच्या कौन्सिल मधे श्रम, सिंचन व ऊर्जा विभागाचे मंत्री होते. या काळात त्यांनी देशातील जल संसाधनांच्या वापराबाबत, त्यांच्या विकासाबाबत नवीन जलनिती तयार केली होती. देशाच्या एका भागात दुष्काळ तर दूसरीकडे...
नद्यांना येणारे पूर, ऊर्जेची कमतरता, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी ई. समस्यांवर मल्टीपर्पज प्रकल्प उभारणे हाच उपाय असल्याचे डॉ. आंबेडकरांनी ओळखले होते. अनेक प्रांतातून वाहणाऱ्या नद्यांवर बहुउपयोगी प्रकल्प उभे करणे जेणेकरून पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन होईल, सिंचनाची सोय होईल...
जलविद्युत निर्मिती करता येईल,दुष्काळी भागात पाणी पोहचवता येईल असे डॉ. आंबेडकरांचे व्हिजन होते. याच प्रयत्नांतुन पुढे दामोदर नदी प्रकल्प, सोन नदी प्रकल्प, हिरकुड प्रकल्प यासारखे बहुउपयोगी प्रकल्पांची निर्मिती झाली.

या बहुउपयोगी प्रकल्प उभारण्यात एक मोठी अडचण होती ती म्हणजे...
Read 18 tweets
एप्रिल महिन्याला Dalit history month म्हणणं म्हणजे ही बाबासाहेब दलित उद्धारक होतेची sophisticated line आहे. हा सवर्णवादी खोडसाळपणा थांबणारा नाहीच. गांधी, नेहरु ज्या महिन्यात जन्माला आले तो महिना काही बनिया, किंवा सारस्वत ब्राह्मण history month बनत नाही मग एप्रिल कसा काय
dalit history month बनतो ? ज्याला दलितत्व मान्य नव्हतं, ज्या विरुद्ध ज्याचं बंड होतं त्यांना परत त्याच संज्ञा संकल्पनेत बंदिस्त करायचं ? बाबासाहेबाचं कार्य राष्ट्रीय व मानवतावादी कार्य होतं, त्यांची ध्येय धोरणं वैश्विक, सर्वव्यापी असताना, तसं त्याचं योगदान असताना, दलित महिना
साजरा करनं ब्रामणी मानसिकतेचं नीच लक्षण आहे. बाबासाहेबांचे कार्यव्यापकता लक्षात घेता हा एप्रिल महिना dalit history month ऐवजी... month of fight for equality, month of social revolution, month of human rights, month of fight against discrimination, etc असे कितीतरी साजेसे संकल्पना
Read 5 tweets
#ThanksDrAmbedkar
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला काय दिलं?
विद्युत जोड प्रकल्प (power grid system)
मध्यवर्ती जलसिंचन आयोग
नदी जोड प्रकल्प
दामोदर खोरे प्रकल्प
हिराकुंड धरण
भाक्रा-नांगल धरण
सोनेक नदी प्रकल्प
आणि महत्वाचं म्हणजे,संपूर्ण राष्ट्राला एकसंघ बांधणारे #संविधान.👇(१/१३)
दामोदर नदी ही "बंगालचे दुःख" म्हणून ओळखले जात असे,प्रत्येकवर्षी पूर स्थिती ला इथले लोक बळी पडत असे. अशा परिस्थितीत नदीच्या पत्रावर नियंत्रण करून पाण्याचा उपयोग जल विद्युत उर्जा,नौ संचालन,विद्युत प्रकल्प अशा विविधांगी प्रकल्पात करता यावा या करिता तत्कालीन मजूर मंत्री (२/१३)👇
बाबासाहेबांना विचारणा झाली,बाबासाहेबांनी अभ्यास करून प्रकल्पांबद्दल आपले भाषण केले आणि सभागृहातील टाळ्यांचा आवाज खूप वेळ चालू राहिला होता.पाण्याचा योग्य वाटप आणि पूर परस्थिती टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावर नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी सुचवला होता परंतु कावेरी नदीच्या (३/१३)👇
Read 13 tweets
📍 पाणी ऊर्जा धोरण आणि नियोजन :-एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या.
#ThanksDrAmbedkar
@MyselfViraj Image
१७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. ११ हजार घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्बवर्षाव होत होते
. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. पंचवीस हजार लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला.

दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हाइसरॉय कौन्सिलचे सभासद
Read 15 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!